Lokmat Sakhi >Inspirational > शेतकऱ्याच्या 10 वर्षांच्या लेकीने जिंकले इतके मेडल्स , विराट कोहलीही झाला चकित; भेटा पूजा बिष्णोईला

शेतकऱ्याच्या 10 वर्षांच्या लेकीने जिंकले इतके मेडल्स , विराट कोहलीही झाला चकित; भेटा पूजा बिष्णोईला

पूजा बिष्णोई (pooja Bishnoi) ही 10 वर्षांची ॲथलिट (athlete) असून तिने आतापर्यंत अनेक पदकांची कमाई केली आहे. सध्या पूजा ही 2024 मध्ये दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या यूथ ऑलिम्पिकसाठी जीवतोड मेहनत करत आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकण्याचं स्वप्न वयाच्या दहाव्या वर्षी बघणारी हीच ती (who is Pooja Bishnoi) पूजा बिष्णोई.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 02:39 PM2022-07-16T14:39:54+5:302022-07-16T14:56:17+5:30

पूजा बिष्णोई (pooja Bishnoi) ही 10 वर्षांची ॲथलिट (athlete) असून तिने आतापर्यंत अनेक पदकांची कमाई केली आहे. सध्या पूजा ही 2024 मध्ये दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या यूथ ऑलिम्पिकसाठी जीवतोड मेहनत करत आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकण्याचं स्वप्न वयाच्या दहाव्या वर्षी बघणारी हीच ती (who is Pooja Bishnoi) पूजा बिष्णोई.

10 years Pooja Bishnoi from Jodhpur becomes inspiration for youth. Pooja Bishnoi performance as athlete makes Virat Kohli also surprised; | शेतकऱ्याच्या 10 वर्षांच्या लेकीने जिंकले इतके मेडल्स , विराट कोहलीही झाला चकित; भेटा पूजा बिष्णोईला

शेतकऱ्याच्या 10 वर्षांच्या लेकीने जिंकले इतके मेडल्स , विराट कोहलीही झाला चकित; भेटा पूजा बिष्णोईला

Highlightsवयाच्या सहाव्या वर्षी जोधपूर मॅरॅथाॅनमध्ये पूजा बिष्णोईनं सुवर्ण पदक जिंकलं होतं. विराट कोहली फाउंडेशन पूजा बिष्णोईला मदत करत आहे. पूजाचे मामा सरवण बुडिया हेच तिचे प्रशिक्षक आहेत. 

आयपीएल 2022 च्या मॅचेस सुरु असताना विराट कोहली त्याच्या मूळ फाॅर्माध्ये परत यावा यासाठी प्रार्थना करणाऱ्यांमध्ये, त्याला चिअर अप करणाऱ्यांमध्ये 10 वर्षांची चिमुकली पूजा बिष्णोईही होती.  मेमध्ये आपला 5 वीचा रिझल्ट लागल्यावर पुजाने ट्विटरवरुन विराटला धन्यवाद दिले. विराटला आपला रोल माॅडेल मानणारी ही पूजा बिष्णोई(Pooja Bishnoi)  आहे तरी कोण असा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर याचं उत्तर थोडं मोठं असून ते सर्वांना कौतुक वाटावं असं प्रेरणादायी आहे. पूजा बिष्णोई ही 10 वर्षांची ॲथलिट (athlete)  असून तिने आतापर्यंत अनेक पदकांची कमाई केली आहे. सध्या पूजा ही 2024 मध्ये दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या यूथ ऑलिम्पिकसाठी जीवतोड मेहनत करत आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकण्याचं स्वप्न वयाच्या दहाव्या वर्षी बघणारी हीच ती ( who is pooja Bishnoi)  पूजा बिष्णोई. 

Image: Google

राजस्थान राज्यातल्या जोधपूर जिल्ह्यातील  गुडा बिष्णोई या गावात एका शेतकरी कुटुंबात पूजाचा जन्म झाला. पूजा जोधपूर शहरात आपल्या मामाकडे  राहाते. पूजाचे मामा सरवन बुडिया हेच तिचे कोचही आहेत.  2014 मध्ये पूजा 3 वर्षांची होती. मैदानात तिनं मुलांना धावतान बघितलं. तिलाही धावण्याची इच्छा झाली. तिनं मामाला सांगितलं की या मुलांसोबत मलाही धावायचं आहे. मग मामाने त्या मुलांसोबत तिची रेस लावली. पूजा रेसमध्ये चांगली पळाली पण ती हरली. मामाकडे येवून अजिबात निराश न होता तिनं मामाला मला धावायला शिकवं असं सांगितलं. पुजाच्या धावण्यात सरवन यांना वेगळीच चमक जाणवली, तिच्यातली जिद्द त्यांनी ओळखून त्याला खतपाणी घालण्याचं ठरवलं. 23 वर्षांचे सरवन बुडिया हे स्वत: एकेकाळी ॲथलिट होते. पण गुडध्याच्या मागच्या स्नायुला झालेल्या जबर दुखापतीमुळे त्यांचं ॲथलिट म्हणून असलेलं करिअर मागे पडल. जोधपूर शहरात आपल्या मित्राच्या दुकानात बिझनेस मॅनेजर म्हणून ते नोकरी करतात आणि आता ते पुजाचे प्रशिक्षकही आहेत. सरवन यांनी पुजाला ॲथलिट म्हणून धडे द्यायला सुरुवात केली आणि महिन्याभरानंतर त्यांनी त्याच मुलांसोबत पुजाची रेस लावली. या रेसमध्ये पूजा आरामात जिंकली. 

Image: Google

2017मध्ये पूजा सहा वर्षांची असताना तिनं जोधपूर मॅरेथाॅनमध्ये भाग घेऊन 10 किमी अंतर 48 मिनिटात पूर्ण केलं. त्या कोवळ्या वयातच प्रशिक्षण  आणि व्यायामाद्वारे तिनं सिक्स पॅक्स ॲब्जही कमावले. जानेवारी 2019 पूजासाठी नवी उमेद घेऊन आल. पुजामधला जज्बा , तिचं खेळण्यावरचं प्रेम, त्याबद्दलची निष्ठा बघून पुजाला चांगली आर्थिक मदत मिळायला हवी असं सरवन यांना वाटलं. त्यांनी तिच्या प्रशिक्षणाचे आणि कामगिरीचे व्हिडीओ विराट कोहली फाउंडेशनला दाखवले. पूजाचे प्रशिक्षणाचे ते व्हिडीओ बघून, तिने तेव्हापर्यंत कमावलेली पदकं बघून स्वत: विराट कोहली प्रभावित झाला. ही मुलगी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी नक्की सुवर्ण आणेल असा विश्वास विराट कोहली फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनाही वाटला.  विराट कोहली फाउंडेशन पुजाची आर्थिक मदत करत आहे. या फाउंडेशननेच पुजाला जोधपूर येथील नामांकित शाळेत प्रवेश मिळवून दिला. नोव्हेंबर 2019मध्ये पुजने दिल्ली येथील स्पोर्टिगो टुर्नामेण्टमध्ये 14 वर्षाखालील वयोगटात भाग घेतला. या स्पर्धेत तिने 3 कि.मी अंतर तिनं 12 मिनिटं 50 सेकंदात पूर्ण करुन रेकाॅर्ड बनवलं. या स्पर्धेत तिनं सुवर्ण जिंकलं. पुजानं 1500 मीटर, 800 मीटर स्पर्धेतही सुवर्ण पदकं जिंकली आहेत. 

Image: Google

पूजाच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यानं आई वडिल तिला आर्थिक मदत करु शकत नाहीये. पण पुजाच्या मागे तिचा मामा खंबीरपणे उभा आहे. सरवन बुडिया म्हणतात आपल्या बहिणीनं म्हणजेच पुजाच्या आईनं आपण ॲथलिट बनावं म्हणून मदत केली होती. बहिणीनं केलेल्या मदतीचं ऋण चुकवण्याची हीच चांगली संधी आहे असं ओळखून आपण पुजाला प्रशिक्षण देत आहोत. आपलं ॲथलिट म्हणून अपूर्ण राहिलेलं स्वप्न पुजा नक्की पूर्ण करणार अस विश्वास एक प्रशिक्षक म्हणून सरवन याना वाटतो.

एवढ्या लहान वयात पूजाचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. तिला यूथ ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेऊन भारतासाठी सुवर्ण पदक जिंकायचं आहे. त्यासाठे पूजा कठोर मेहनतही घेत आहे. ती पहाटे तीनला उठते.  पहाटे 3 ते सकाळी 8 पर्यंत ती प्रशिक्षकांसोबत सराव करते. त्यानंतर शाळेत जाते. शाळेतून आल्यावर थोडा आराम करुन पुन्हा संध्याकाळी सराव करते. या सर्व शेड्यूलमध्ये मित्र मैत्रिणींसोबत खेळायला मिळत नाही याची तिला खंत वाटत नाही. कारण ती तिनंच ठरवलेल्या ध्येयासाठी मेहनत घेत आहे. अशा या दहा वर्षांच्या पूजा बिष्णोईच्या जिद्दीकडे बघून आज विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, अमिताभ बच्चन या दिग्गजांनाही तिचं कौतुक वाटत आहे  आणि 'ही मुलगी    2024 मधील यूथ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकेल' हा विश्वासही वाटत आहे!

  

Web Title: 10 years Pooja Bishnoi from Jodhpur becomes inspiration for youth. Pooja Bishnoi performance as athlete makes Virat Kohli also surprised;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.