Lokmat Sakhi >Inspirational > केरळच्या ११ वर्षांच्या मुलीची कमाल, डोळ्यांचे आजार झटकन सांगणारे ॲप तिने कसे बनवले...

केरळच्या ११ वर्षांच्या मुलीची कमाल, डोळ्यांचे आजार झटकन सांगणारे ॲप तिने कसे बनवले...

11 Year Old Girl Creates AI-Based App To Detect Eye Diseases; Netizens Amazed : लीना रफीक या ११ वर्षीय मुलीने डोळ्यांच्या आजारांचे निदान करणाऱ्या AI-बेस्ड अ‍ॅप तयार केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 06:48 PM2023-03-29T18:48:41+5:302023-03-29T18:57:43+5:30

11 Year Old Girl Creates AI-Based App To Detect Eye Diseases; Netizens Amazed : लीना रफीक या ११ वर्षीय मुलीने डोळ्यांच्या आजारांचे निदान करणाऱ्या AI-बेस्ड अ‍ॅप तयार केला आहे.

11-year-old Kerala girl develops AI-based to detect eye diseases, LinkedIn users shower her with praises | केरळच्या ११ वर्षांच्या मुलीची कमाल, डोळ्यांचे आजार झटकन सांगणारे ॲप तिने कसे बनवले...

केरळच्या ११ वर्षांच्या मुलीची कमाल, डोळ्यांचे आजार झटकन सांगणारे ॲप तिने कसे बनवले...

शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्वाचा असतोच, परंतु डोळे हा असा अवयव आहे की त्याचे महत्व अधिकच आहे. आपल्या डोळ्यांमुळे आपण हे सुंदर जग पाहू शकतो. यासाठीच डोळ्यांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे किंवा डोळ्यांना जपले पाहिजे. कधी कधी आपल्या डोळ्यांना काही कारणास्तव इजा होते किंवा डोळ्यांसंबंधित काही आजार, समस्या उद्भवतात. काहीवेळा आपण हे डोळ्यांचे आजार फारच दुर्लक्षित करतो. अशावेळी हे लहान आजार डोळ्यांना इजा पोहोचवून गंभीर स्वरूप प्राप्त करु शकतात. काहीवेळा या डोळ्यांच्या आजाराचे पटकन निदान केले जात नाही, परिणामी आजार अधिक वाढून भयंकर रुप धारण करु शकते. 

प्राथमिक स्तरावर उपचार सुरु असताना गंभीर आजारांवरसुद्धा मात करता येते. पण त्यासाठी त्या आजाराचे लगेच निदान होणे आवश्यक असते. योग्य वेळी निदान न झाल्याने बहुतांश रुग्णांची दृष्टी जाते. ही समस्या ओळखून केरळच्या लीना रफीक या ११ वर्षीय मुलीने डोळ्यांच्या आजारांचे निदान करणाऱ्या AI-बेस्ड अ‍ॅप तयार केला आहे(11-year-old Kerala girl develops AI-based to detect eye diseases, LinkedIn users shower her with praises).   

या अ‍ॅपद्वारे डोळ्यांच्या आजाराचे निदान कसे करता येते ?  

जन्मतः केरळची असलेली लीना रफीक सध्या दुबईमध्ये रहात आहे. लीनाला लहानपणापासूनच विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड होती. विज्ञान - तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे हा तिचा अतिशय आवडीचा विषय आहे. आपल्या या आवडीच्या विषयाचा अभ्यास करतानाच तिने ‘ओग्लर आयस्कॅन’ (Ogler EyeScan) हे अ‍ॅप तयार केले आहे. यामध्ये एका विशिष्ट स्कॅनिंग प्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे. याच्या मदतीने डोळ्यांच्या स्थितीबाबत माहिती मिळवता येते. त्यासह Arcus, Melanoma, Pterygium आणि Cataract अशा काही डोळ्यांच्या आजारांचे निदान देखील करता येते. आजार ओळखणे आणि डोळ्याच्या स्थितीची सविस्तर माहिती देणे यामध्ये या अ‍ॅपची अचूकता (Accuracy Rate) ७० % आहे अशी माहिती समोर आली आहे.

लीनाची लिंक्डइन पोस्ट....  

अ‍ॅप स्टोअरवर हे अ‍ॅप अ‍ॅड करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ११ वर्षीय लीना रफीकने लिंक्डइनवर तिच्या अ‍ॅपबद्दल आणि एकूण प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती शेअर केली. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. अनेकांनी या लहान मुलीचे कौतुक करत तिला शाबासकी दिली आहे. बऱ्याच जणांनी त्यावर कमेंट करत तिला प्रतिक्रिया कळवल्या आहेत. ओग्लर आयस्कॅनव्यतिरिक्त लीनाने ‘लहनास’ (Lahnas) ही वेबसाइट देखील तयार केली आहे. लहान मुलांना प्राणी-पक्षी, रंग आणि शब्द यांचा अभ्यास करताना या वेबसाइटची मदत होऊ शकते. लीनाची बहीण हाना रफीकदेखील अ‍ॅप डेव्हलपर आहे. ९ वर्षांची असताना हाना अ‍ॅप तयार करणारी जगातील सर्वात लहान व्यक्ती ठरली होती. अ‍ॅप्पलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांची भेट घेण्याची संधी हानाला मिळाली होती.

Web Title: 11-year-old Kerala girl develops AI-based to detect eye diseases, LinkedIn users shower her with praises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.