Lokmat Sakhi >Inspirational > डाऊन सिंड्रोमसह जगणारी रिझा, चालणार ग्लोबल फॅशन शोमध्ये! तिच्या अफाट जिद्दीची गोष्ट

डाऊन सिंड्रोमसह जगणारी रिझा, चालणार ग्लोबल फॅशन शोमध्ये! तिच्या अफाट जिद्दीची गोष्ट

23 year old with Down syndrome is selected for premier fashion show : बंगळुरूच्या तरुणीची भरारी; विशेष जागतिक फॅशन शो स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 10:15 AM2022-07-13T10:15:49+5:302022-07-13T10:20:02+5:30

23 year old with Down syndrome is selected for premier fashion show : बंगळुरूच्या तरुणीची भरारी; विशेष जागतिक फॅशन शो स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व...

23 year old with Down syndrome is selected for premier fashion show : Riza, who lives with Down syndrome, will walk into the global fashion show! The story of her immense stubbornness | डाऊन सिंड्रोमसह जगणारी रिझा, चालणार ग्लोबल फॅशन शोमध्ये! तिच्या अफाट जिद्दीची गोष्ट

डाऊन सिंड्रोमसह जगणारी रिझा, चालणार ग्लोबल फॅशन शोमध्ये! तिच्या अफाट जिद्दीची गोष्ट

Highlightsऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवडचाचणीत रिझाची निवड झाली असून तिने या स्पर्धेसाठी इंडो वेस्टर्न लूकची निवड केली आहे.  भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळणे ही माझ्यासाठी अतिशय आश्चर्याची बाब आहे असे रिझा म्हणाली

फॅशन शो म्हटली की तुम्हाला अमुक एक फिगर हवी, तुम्ही सौंदर्यवान हव्या असा साधारण आपला समज असतो. पण फॅशन शो म्हणजे इतकेच नाही. तर तुमच्याकडे असलेली इतर कौशल्ये सादर करण्याचे ते एक ताकदवान माध्यम असते. विविध फॅशन ब्रँडचा किंवा सौंदर्य उत्पादनांचा फॅशन शो आपल्याला माहित असतो. पण डाऊन सिंड्रोम असणाऱ्या तरुणांच्या फॅशनशोबाबत आपण क्वचितच ऐकले असेल. विशेष म्हणजे जागतिक स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत भारतातील एक विशेष तरुणी सहभागी होणार आहे. बंगळुरूमधील रिझा रेजी असं या २३ वर्षीय तरुणीचं नाव असून ती जागतिक डाऊन सिंड्रोम फाऊंडेशनच्या वार्षिक संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. बी ब्युटीफूल-बी युवरसेल्फ अशी या कार्यक्रमाची थीम असून रिझा अशाप्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होणारी पहिली भारतीय तरुणी आहे (23 year old with Down syndrome is selected for premier fashion show) . 

(Image : Google)
(Image : Google)

या संमेलनात डाऊन सिंड्रोम हा आजार असलेल्या एकूण २० मॉडेल्स सहभागी होणार असून ते १२ नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील डेन्वर येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमातून विशिष्ट विषयात संशोधन करण्यासाठी फंड निर्माण करण्यात येणार आहे. रिझाला कलेच्या क्षेत्रात गती असून तिचे कुटुंबही तिला कलेसाठी कायम वाव देत असते. रिझा प्रिशिक्षित डान्सर असून तिला यामध्ये चांगली गती आहे. रिझा म्हणते, “नाटकाचीही माझ्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची भूमिका असून या माध्यमातून मी माझे विचार आणि भावना अतिशय मोकळेपणाने व्यक्त करु शकते. या जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुरू असणाऱ्या निवड प्रक्रियेतही मला याचा चांगला फायदा झाला. अशाप्रकारे भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळणे ही माझ्यासाठी अतिशय आश्चर्याची बाब आहे. स्पर्धेसाठी मी माझ्या बोलण्याच्या कौशल्यांवर आणि कार्यक्रमासाठी माझ्या फॅशनविषयीचा विचार करत आहे.” 

(Image : Google)
(Image : Google)

रिझाची आई अनिता रेजी या बंगळुरूमध्ये ब्युटीफूल टुगेदर नावाची संस्थेच्या सहसंस्थापक असून विशेष अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना सक्षम करण्यासाठी ही संस्था काम करते. त्या म्हणतात, रिझा बोलण्यात एकदम अॅक्टीव्ह असून ती तिच्या भावना चांगल्या पद्धतीने व्यक्त करत असल्याचे त्या म्हणाल्या. तिला लोकांसोबत गप्पा मारायला खूप आवडते आणि क्रिएटीव्ह गोष्टींमध्ये ती खूप चांगली रमते. अशाप्रकारचे फॅशन शो डाऊन सिंड्रोम असणाऱ्या तरुणींसाठी नक्कीच आशादायक ठरतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी या उपक्रमांचा निश्चितच उपयोग होईल. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवडचाचणीत रिझाची निवड झाली असून तिने या स्पर्धेसाठी इंडो वेस्टर्न लूकची निवड केली आहे.  


 

Web Title: 23 year old with Down syndrome is selected for premier fashion show : Riza, who lives with Down syndrome, will walk into the global fashion show! The story of her immense stubbornness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.