स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करायला वयाची बंधनं नसतात किंवा ती नसावीत. वयानुसार शरीर थकतं हे जरी खरं असलं तरी आपण मनानं तरुण असलो की आपल्याला कोणतीही गोष्ट करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. हे सगळं बोलायला ठिक वाटणारं असेल कदाचित. पण भगवानी देवी डागर वयाच्या ९४ व्या वर्षी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर देशाचे नाव जगात उंचावले आहे. फिनलंड येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक मास्टर्स अॅथलेटीक स्पर्धेत (World Masters Athletics championships 2022) त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी देशाला १ सुवर्ण तर २ कांस्य पदकं जिंकून दिली (Won 3 Medals For India In Finland). मूळ हरीयाणाच्या असलेल्या भगवानी यांनी या वयात केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे (94 Year Old Haryana Sprinter Bhagwani Devi).
युक्रेन-रशिया युद्धात ठार झालेली ब्राझिलीयन मॉडेल थलिता डो वले नक्की कोण? ती युक्रेनला का गेली होती?
१०० मीटर स्प्रिंट स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले असून ही रेस पूर्ण करण्यासाठी त्यांना केवळ २४.७४ सेकंदांचा कालावधी लागला. तर शॉट पुटमध्येही त्यांनी कांस्य पदक पटकावत आपल्यातील जिगर दाखवून दिली. वय वर्ष ३५ हून अधिक असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी ही जागतिक स्पर्धा २९ जून ते १० जुलैदरम्यान आयोजित करण्यात आली होती. याआधी चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल मास्टर्स अॅथलेटीक्स चॅम्पियनशीपमध्ये भगवानी देवी यांनी ३ सुवर्णपदकं मिळवली होती. या स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीमुळे फिनलंड येथील स्पर्धेत त्यांची भारताकडून निवड करण्यात आली. ही निवड त्यांनी आपल्या कामगिरीने सार्थ करुन दाखवली.
94-year-old Bhagwani Devi Dagar won a gold and 2 bronze for India at the World Masters Athletics championships 2022 in Finland, yesterday pic.twitter.com/JRPZrBDSAK
— ANI (@ANI) July 11, 2022
‘तान्हं बाळ घरी एकटं ठेवून मी..’- सैन्यात सेवा ते ब्यूटी कॉण्टेस्ट; प्रीती शेरावत यांची जिद्द
वयाच्या या टप्प्यावरही ही आजी इतकी ठणठणीत कशी असा प्रश्न आपल्या सगळ्यांना साहजिकच पडेल. तर मनाची तयारी आणि फिटनेस हेच त्यामागचे खरे गमक आहे. वय झाले की आपल्याकडे अनेक जण आयुष्यातील शेवटचे दिवस म्हणून कुढत जगत राहतात. पण या वयातही तरुणांना लाजवेल असा उत्साह असलेल्या भगवानी देवी खरंच आदर्श आहेत. एखादी गोष्ट करण्यासाठी तुमची मनाची तयारी असेल आणि तुम्ही जिद्द आणि चिकाटीने त्यासाठी प्रयत्न करत असाल तर यश तुमच्यापासून फार दूर नसते हेच भगवानी यांनी आपल्या कामगिरीतून दाखवन दिले आहे.