दिनेश तुळशीदास भावसार, जळगाव.
तीन ते चार वर्षे मला त्रास होत होता पण मला वाटलं पाइल्सचा त्रास असेल. कारण संडासवाटे खूप रक्त जायचे. मात्र एकदा डिसेंबर महिन्यात खुप रक्त पडले. याच वर्षी जानेवारीतली गोष्ट. सहा जानेवारीचीच. सकाळी मी लघवी करायला गेलो तेव्हा मला खूप चक्कर आली. मी कसातरी बाहेर आलो व घरात जाऊन पडलो तर मी सात मिनिटे बेशुद्ध होतो. नंतर मी शुद्धीवर आलो तर मला माझ्या भावाने आमचे फॅमिली डॉक्टर शशीकांत गाजरे यांच्याकडे तपासायला आणले होते. त्यांनी सांगितले यांच्या शरीरात रक्त नाही. त्यांनी मला सहा बाटल्या रक्त चढवले. माझ्या शरीरात रक्तच तयार होत नाही की काय असं वाटून त्यांनी मला सोनोग्राफी करायला सांगितले.सोनोग्राफी, एंडोसस्कोपी झाली. त्यात कळले की मोठ्या आतड्याला गाठ आहे. डॉक्टर म्हणाले नाशिक नाही तर मुंबईला घेऊन जा, पेटसकॅन करावे लागेल. मग मी नाशिकला मानवता कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आलो.
डॉ. गजरेंनी माझ्या भावाला सांगितले की कॅन्सरची लक्षणं वाटतात. माझी बायको आशा, लहान भाऊ प्रमोद, मुलगा शुभम, मोठया भावाचा मुलगा पवन सगळे हादरले. रडत होते. मला काही कळू द्यायचे नाही म्हणून प्रयत्न करत होते. पण मला कळलेच. समजले की कॅन्सर झाला आहे. डॉ. गजरेंनी नाशिकला डॉ. नगरकरांसाठी पत्र दिले. मला डिसचार्ज मिळाला. मग आम्ही घरी आलो. मी सहा दिवसा पासून आंघोळ केली नव्हती. ते सगळं करुन नाशिकला निघालो. माझे मोठे भाऊ संजय, लहान भाऊ प्रमोद, मोठी वहिनी, बायको मुलं असे आम्ही सर्व आठ जण होतो.मध्यरात्री नाशिकला पोहोचलो. डॉ. नगरकर भेटले, म्हणाले कॅन्सर आहे. ऑपरेशन करावे लागेल. पहिले पेटसकॅन करावे लागेल नंतर ऑपरेशन. उपचार सुरु झाले. मग रात्री त्यानी मला पोट साफ होण्यासाठी औषध दिले. सकाळी मला पेटसकॅनला घेऊन गेले दुपारी बारा वाजता रीपोर्ट मध्ये कळाले की मोठ्या आतड्यात दोन गाठी आहे व लहान आतड्यात एक गाठ आहे लगेच त्यानी ऑपरेशनची तयारी केली. डॉ. जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑपरेशन केले. पुढे डिसचार्ज मिळाला.आम्ही घरी गेलो. घरी गेल्यावर त्यांनी नारळचे झाडावरुन नारळ उतरवण्यासाठी एका माणसाला बोलवले. त्यांच्याकडून दिडशे नारळ उतरवून घेतले. मला म्हणाले रोज दोन नारळ पीत जा. पुढे टाके काढले. सगळे नीट आहे हे पाहून जळगावला गेलो. माझा मुलगा नाशिकलाच थांबला. गाठीचा रीपोर्ट यायचा बाकी होता. डॉक्टर क्षूती काटे मॅडमनर भेटला. त्यांनी सांगितले ८ केमोथेरपी करावी लागेल. ते ही सुरु झाले.
(Image :google)
असा हा प्रवास चालू आहे. ६ केमोथेरपी घेतल्या. खुप त्रास होतो काय करणार, पुढे चालत रहावे. मला बरं व्हायचे आहे कारण माझ्यावर जबाबदारी आहे. मला माझ्या मुलांचे लग्न करायचं आहे. तीन वर्षे पासून मला हा त्रास होतो आहे, कारण मी समजायचो की पाईलचा त्रास आहे. पण मी पोटात गाठी घेऊन फिरत होतो. आता तर त्या गाठी शरीरातून निघून गेल्या. आता राहिले थोडे फार जंतू. तर त्यावरही मात करु. कारण मला बरं व्हायचं आहे.
अधिक माहिती आणि संपर्कHCG मानवता कॅन्सर सेंटर् उमेद पेशंट सपोर्ट ग्रुपumed.warriors@gmail.comफोन- 9145500381