Join us  

'फॅमिलीच आमची टॉप फॅन,' अभि आणि नियूच्या 'डिजिटल' प्रवासाच्या व्हायरल गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 7:53 PM

हे दोन कंटेंट क्रिएटर्स जे लोकांची देशाप्रती असलेली लोकांच्या मनातील नकारात्मकता दूर करतात आणि लोकांना भारतातील चांगल्या गोष्टी सांगतात, लोकांसोबत माहिती शेअर करतात.

सोशल मीडियाची क्रेझ पाहून आजकाल प्रत्येकालाच सोशल मीडिया ब्लोगिंद्वारे यशस्वी व्हायचं असतं, काहीतरी करून दाखवायचं असतं, नाव कमवायचं असतं. काही वर्षांपासून यूट्यूबच्या माध्यमातून अनेक लोक प्रसिद्ध झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे  अभि आणि नियू. लोकमत सखीनं या प्रसिद्ध जोडीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी आपल्या नात्याबद्दल आणि डिजिटल प्रवासाबद्दल अनेक गोष्टीं सांगितल्या.

हे दोन कंटेंट क्रिएटर्स जे लोकांची देशाप्रती असलेली लोकांच्या मनातील नकारात्मकता दूर करतात आणि लोकांना भारतातील चांगल्या गोष्टी सांगतात, लोकांसोबत माहिती शेअर करतात. अभिचे पूर्ण नाव अभिराज राजाध्यक्ष आणि नियूचे पूर्ण नाव नियती माविनाकुर्वे आहे. अभिराज राजाध्यक्ष एक भारतीय YouTuber आणि चित्रपट निर्माता आहे. अभिराज आणि नियती हे कंटेट क्रिएटर्स आहेत आणि त्यांना अभि आणि नियू म्हणून ओळखले जाते.

अभिराज राजाध्यक्ष आणि नियती माविनाकुर्वे त्यांच्या #100ReasonsToLoveIndia या सिरिजसाठी खूप प्रसिद्ध आहेत. या मालिकेत त्यांनी भारतातील 100 वेगवेगळ्या ठिकाणी फिरून भारतातील सकारात्मक, प्रेरणादायी कथा सांगितल्या आहेत. यासाठी त्यांनी भारतभर प्रवास करून भारताच्या लहान लहान भागातील सकारात्मकतेवर काम केलं तर काही दुर्लक्षित प्रश्नांवरसुद्ध व्हिडिओज केले. 

जन्म आणि प्रारंभिक जीवन

अभिराजचा जन्म 6 सप्टेंबर 1993 रोजी मुंबई, महाराष्ट्रात झाला. अभिराजचे वय २९ वर्षे आहे. अभिराजचे शालेय शिक्षण आठवीपर्यंत मराठी माध्यमातून झाले आहे. अभिने RD नॅशनल कॉलेज वांद्रे येथून जाहिरात आणि मास मीडियामध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिने अनेक कंपन्यांमध्ये जाहिरातीचे काम केले आहे.

नियतीचा जन्म 9 डिसेंबर 1990 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. नियतीने तिचे महाविद्यालयीन शिक्षण एनएम कॉलेजमधून पूर्ण केले. नियतीनं बी.कॉम.नंतर खाजगी कंपनीत नोकरी केली. आज ती व्हिडिओ कंटेंट क्रिएटर आहे.

घरच्यांचा प्रतिसाद कसा होता 

नियू सांगते की, ''अनिश्चित  ठिकाणी काम करावं असं कोणत्याही पालकांना वाटत नाही. आम्ही २०० दिवस फिरणार असल्याचं सांगताच त्यांच्या काळजीनं प्रतिक्रिया येत होत्या. त्यांनी बरेच प्रश्न विचारले. हळूहळू त्यांना आमचं काम, व्हिडिओज आवडत  गेले. आमची फॅमिलीच टॉप फॅन आहे. कारण प्रत्येक व्हिडिओ शेअर केल्यानंतर ते ग्रुप्समध्ये शेअर करतात. व्हिडिओसाठी विषय निवडताना हे आपल्याला आई वडिलांना अभिमानास्पद वाटेल की नाही हा विचार डोळ्यासमोर ठेवला जातो.''   अभि सांगतो की, ''आम्ही दोघंही फॅन्सना मित्र मानतो कारण त्यांची मत जाणून घेता येतं. याशिवाय त्याच्याशी बोलताना जबाबदारीची जाणीवही ठेवावी लागते. त्यांना भेटून खूप छान वाटतं, त्यांच्या भावना समजून घेता येतात.'' 

चाहत्यांना संदेश

अभि आणि  नियू  सांगतात की, ''तुम्ही कोणत्याही विषयावर सोशल मीडियावर बोलत असाल तर त्यात सातत्य ठेवा. आपला एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की पुढचे सगळेच व्हिडिओ व्हायरल होतील असं नाही.  यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.  कोणतीही नवीन गोष्ट करताना आपले मित्र आपल्याला खूप पाठींबा देतील असं आपल्याला वाटतं,  मित्र प्रत्येक व्हिडिओला लाईक करतील अशी अपेक्षा ठेवू नका. मित्रांकडून तुम्ही सल्ला घेऊ शकता पण एक ट्रांजेक्शनल वॅल्यूसाठी तुमचे मित्र नसतात. त्यांना तुम्ही टॉप फॉलोअर्स किंवा टॉप फॅनप्रमाणे ट्रिट करू नका. तुमचा फोकस तुमचं काम सुधारण्याकडे असायला हवा. जेव्हा त्यांना तुमचं काम मनापासून आवडेल तेव्हा ते स्वत:हून व्हिडिओवर मत व्यक्त करतील.''

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया