Lokmat Sakhi >Inspirational > #Breakthebias :जसं आहोत तसं जगू या ना मस्त.. कशाला हवाय काळं- गोरं, जाड- बारीक याचा न्यूनगंड... सांगतेय अभिनेत्री अन्विता...

#Breakthebias :जसं आहोत तसं जगू या ना मस्त.. कशाला हवाय काळं- गोरं, जाड- बारीक याचा न्यूनगंड... सांगतेय अभिनेत्री अन्विता...

Inspirational: अभिनेत्री कशी असावी, याची एक साचेबद्ध आकृती दुर्दैवाने आपल्या मनात अगदी घट्ट बसलेली असते. पण ही आकृती भेदून एक नव्या रूपातली अभिनेत्री आपल्या डोळ्यासमोर उभी केली अभिनेत्री अन्विता फलटणकर (Actress Anvita Phaltankar) हिने.. महिला दिनानिमित्त (International Women's Day 2022) लोकमत सखीने तिच्याशी साधलेला हा संवाद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 01:28 PM2022-03-08T13:28:26+5:302022-03-08T13:30:15+5:30

Inspirational: अभिनेत्री कशी असावी, याची एक साचेबद्ध आकृती दुर्दैवाने आपल्या मनात अगदी घट्ट बसलेली असते. पण ही आकृती भेदून एक नव्या रूपातली अभिनेत्री आपल्या डोळ्यासमोर उभी केली अभिनेत्री अन्विता फलटणकर (Actress Anvita Phaltankar) हिने.. महिला दिनानिमित्त (International Women's Day 2022) लोकमत सखीने तिच्याशी साधलेला हा संवाद...

Actress Anvita Phaltankar says, just leave the complex of how you look, be confident and enjoy what you are.... | #Breakthebias :जसं आहोत तसं जगू या ना मस्त.. कशाला हवाय काळं- गोरं, जाड- बारीक याचा न्यूनगंड... सांगतेय अभिनेत्री अन्विता...

#Breakthebias :जसं आहोत तसं जगू या ना मस्त.. कशाला हवाय काळं- गोरं, जाड- बारीक याचा न्यूनगंड... सांगतेय अभिनेत्री अन्विता...

Highlightsजाड- बारीक, काळं- गोरं असा विचार नकाच करू. कुणी नावं ठेवतं, म्हणून तर अजिबातच आपल्या आवडीची गोष्ट सोडू नका, असंही अन्विता म्हणाली.

बाई गं.. तु 'जाड', तु 'बारीक', तु ना जराशी 'काळी'च किंवा तु ना अगदी 'फट्ट पांढरट गोरी'... अशी लेबलं लावून आपण दरवेळी महिलांकडे का बघताे? ती जशी आहे, तशी आपण तिला का स्वीकारू शकत नाही? बरं नेमकं काय हवं हे ही आपल्या डोक्यात फिक्स नसतं. जाड मुलीला जेवढे टोमणे ऐकावे लागतात, तेवढेच ते बारिक मुलीलाही ऐकावे लागतात. मग काय चांगलं... जाड की बारीक? हेच जर समोरच्याला ठरवता येत नसेल तर त्याचा एवढा विचार आपण का करायचा,.. आपण जसं आहे तसं जगू या ना बिंधास्त (leave the complex of how you look).. असं सांगतेय 'स्वीटू' (Sweetu) ही प्रमुख भुमिका साकारून अभिनेत्री अशीही असू शकते, हे दाखवून देणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर...

 

अभिनेत्री म्हणून जेव्हा ती पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर आली, तेव्हा सुरुवातीला ती खूप ट्रोल झाली... कारण गोड चेहरा असला तरी इतर अभिनेत्रींप्रमाणे स्लिमट्रीम फिगर किंवा नाजूक- साजूक बांधा तिच्याकडे नव्हता.. या कारणावरून टोमणे ऐकावे लागणं तिला नवं नव्हतंच. या सगळ्या गोष्टींचा त्रास खूप आधीपासून व्हायचा आणि आताही होतो.. पण बोलणाऱ्यांवर आपला काहीही कंट्रोल नसतो.. त्यांना जे हवं ते बोलू द्या.. सोशल मिडियावर तर आपला काहीच कंट्रोल नाही. त्यामुळे तिथे मला ट्रोल करून, त्यांना शांत वाटत असेल, तर खुशाल करा.. मी या गोष्टींकडे आता दुर्लक्ष करायला शिकले आहे, असं सांगून अन्विताने जाड असण्याचा न्यूनगंड बाळगणाऱ्या प्रत्येकीलाच नवा विचार दिला आहे...

 

आपण जाड आहोत, मग आपण डान्स केला तर कसं वाटेल, जाड असल्याने अमूक कपडे आपल्याला अजिबातच शोभणार नाहीत, असे स्वत:भोवतीचे अनेक भ्रम महिलांच्या डोक्यात तयार असतात. अशा सगळ्याजणींनी एकदा अन्विताचा डान्स बघितलाच पाहिजे...  जाड असण्याचा कॉम्प्लेक्स छळतो? मग 'स्वीटू'चा हा डान्स पहा, फॅट-स्लिम विसरा, फ्लेक्झिबल व्हा! 

याविषयी बोलताना ती म्हणाली की डान्स माझं पहिलं प्रेम.. जाडपणामुळे मी ते सोडावं किंवा डान्स करू नये, असा विचार चुकूनही माझ्या मनाला शिवला नाही. जे आपल्याला आवडतं, ज्यातून आपल्याला खरोखर आनंद मिळतो, अशा गोष्टी आवर्जून करा.. ते करताना जाड- बारीक, काळं- गोरं असा विचार नकाच करू. कुणी नावं ठेवतं, म्हणून तर अजिबातच आपल्या आवडीची गोष्ट सोडू नका, असंही अन्विता म्हणाली.


 

Web Title: Actress Anvita Phaltankar says, just leave the complex of how you look, be confident and enjoy what you are....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.