Lokmat Sakhi >Inspirational > सलग तिसऱ्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवत गायिका अलका याज्ञिक ठरल्या अव्वल.. 

सलग तिसऱ्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवत गायिका अलका याज्ञिक ठरल्या अव्वल.. 

Alka Yagnik is most streamed singer in the world : beats Taylor Swift, BTS by a mile : गायिका अलका याज्ञिक यांनी सलग तिसऱ्या वर्षी यूट्यूबच्या (You Tube) स्ट्रिम लिस्टमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2023 04:50 PM2023-02-02T16:50:03+5:302023-02-02T17:01:38+5:30

Alka Yagnik is most streamed singer in the world : beats Taylor Swift, BTS by a mile : गायिका अलका याज्ञिक यांनी सलग तिसऱ्या वर्षी यूट्यूबच्या (You Tube) स्ट्रिम लिस्टमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे.

Alka Yagnik is most streamed singer in the world : beats Taylor Swift, BTS by a mile | सलग तिसऱ्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवत गायिका अलका याज्ञिक ठरल्या अव्वल.. 

सलग तिसऱ्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवत गायिका अलका याज्ञिक ठरल्या अव्वल.. 

नव्वदच्या दशकांतील हिंदी बॉलिवूड गाण्यासाठीं सुप्रसिद्ध असलेला आणि आजही सगळ्यांच्या लक्षात असलेला सुमधुर आवाज म्हणजे अलका याज्ञिक. अलका याज्ञिक यांनी नव्व्दच्या दशकात आपल्या करियरला सुरुवात केली होती. गेली चार दशकं त्या पार्श्वगायन करत आहेत. त्यांच्या करियरमध्ये त्यांनी तब्बल २० हजार गाणी गायली आहेत. अलका यांचा जन्म २० मार्च १९६६ रोजी कोलकाता येथील गुजराती कुटुंबात झाला. त्यांची आई शोभा याज्ञिक या गायिका होत्या.

प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik) या त्यांच्या आवाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अलका यांची गाणी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षक आवडीनं ऐकतात. अलका याज्ञिक यांनी आजवर अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आपल्या गोड आवाजाने त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. आजही त्यांची गाणी प्रेक्षक विसरले नाहीत. त्यांची गाणी आजही आवर्जून ऐकली जातात. अशातच त्यांनी एक नवा विक्रम केला आहे(Alka Yagnik is most streamed singer in the world : beats Taylor Swift, BTS by a mile).  

नक्की काय आहे त्यांचा नवा विक्रम... 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अहवालानुसार, गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डने दिलेल्या माहितीनुसार, २०२२मध्ये अलका याग्निक यांची यूट्यूबवरील गाणी १५.३ मिलियन पेक्षा जास्त वेळा ऐकली गेली आहेत. या गाण्यांमध्ये त्यांचे 'एक दिन आप' हे गाणे २०२१ आणि २०२०मध्ये यूट्यूबवर सर्वाधिक ऐकले गेले. यूट्यूबवर २०२०मध्ये त्यांच्या गाण्याला १६.६ बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्यापाठोपाठ साउथ कोरियन सुपरस्टार बीटीएस यांच्या गाण्यांना ७.९५ बिलियन व्ह्यूज आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट आहे. तिच्या गाण्यांना ४.३३ बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

समोर आलेल्या या यादीमध्ये ५० गायकांची नावे आहेत. त्यामध्ये अलका याग्निक यांच्यासोबतच भारतातील उदित नारायण, अरिजित सिंह आणि कुमार सानू या गायकांचा देखील समावेश आहे. उदित नारायण यांची १०.८ बिलियन, अरिजित सिंह यांच्या गाण्यांना १०.८ बिलियन आणि कुमार सानू यांच्या गाण्याला ९.०९ बिलियन व्ह्यूज आहेत. चार्टमास्टरने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास २० टक्के यूट्यूब सब्सक्रायबर्स हे भारतातील आहेत.


अलका याज्ञिक यांच्या समोर टेलर स्विफ्ट आणि बी.टी.एस (BTS) पण फिके... 

बॉलिवूड गायिका अलका याज्ञिक यांनी त्यांच्या मधुर आवाजात अनेक अप्रतिम गाणी गायली आहेत जी सुपर-डुपर हिट ठरली आहेत. अलका यांच्या आवाजाचे जगभरात चाहते आहेत जे त्यांची गाणी ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. दुसरीकडे, गायिका अलका याज्ञिक यांनी सलग तिसऱ्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. टेलर स्विफ्ट, ड्रेक आणि बेयॉन्से यांसारख्या जगातील सर्वात मोठ्या गायकांना मागे टाकत अलका यांनी हे यश संपादन केले आहे आणि यूट्यूबवर २०२२ मधील सर्वाधिक ऐकलेल्या गेलेल्या गायिका बनल्या आहेत.


 

९० च्या दशकातील प्रसिद्ध गायिका... 

अलका याज्ञिक या ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यांनी माधुरी दीक्षित, जुही चावला, श्रीदेवी यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींसाठी गाणी गायली आहेत. अगर तुम चाहो,परदेसी परदेसी, गजब का है दिन, ताल से ताल मिला, चुरा के दिल मेरा, गजब का है दिन, सूरज हुआ मद्धम, अगर तुम साथ हो आणि एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे... या अलका यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 
 

Web Title: Alka Yagnik is most streamed singer in the world : beats Taylor Swift, BTS by a mile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.