Join us  

मी ऑलिम्पिक मेडल जिंकायला आले आहे, केस दाखवायला नाही! - ' ती ' असं म्हणू शकते कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 2:27 PM

Simone Biles Paris Olympic 2024 : सध्या सुरू असणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकमधलं एक चर्चेतलं नाव म्हणजे अमेरिकेची जिमनॅस्टिकपटू सिमॉन बाईल्स.. पायाला दुखापत झाली, पण जिद्द नाही सोडली- २७ वर्षांच्या सिमॉन बायल्सची गोल्ड मेडलसाठी कसून तयारी...

ठळक मुद्देआजवर कित्येक पदकं स्वत:च्या नावे करून कितीतरी स्पर्धांची चॅम्पियन ठरलेली सिमॉन आजही अमेरिकेच्या जिमनॅस्टिक जगाचा एक चकाकता हिरा आहे. 

ऑलिम्पिकमधली ३ सुवर्णपदकं तिच्या नावे आहेत. आता चौथं सुवर्ण पदक स्वत:च्या नावे करण्यासाठी तिची म्हणतेच अमेरिकन जिमनॅस्ट सिमॉन बाईल्सची कसून तयारी सुरू आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच सरावादरम्यान तिच्या एका पोटरीला बरीच दुखापत झाली. पण तरीही तिने त्या वेदना बाजूला ठेवून रविवारी खेळादरम्यान जे काही सादरीकरण केले ते सगळ्यांचीच वाहवा मिळविणारे आणि तिच्यातला लढवय्या गूण दाखवून देणारे ठरले. वयाच्या ६ वर्षापासून तिने जिमनॅस्टिक शिकायला सुरुवात केली. आज २७ व्या वर्षीही ती नेटाने जिमनॅस्टिक करते आहे. या वयात हा खेळ करणे सोपे नाही. म्हणूनच तर ती खेळणार कशी हे पाहण्यासाठी अनेकांच्या नजरांचा स्पॉटलाईट आताही तिच्यावरच आहे.

 

मंगळवारी रात्री सिमॉन सुवर्णपदक जिंकण्यासाठी तिच्या टीमसोबत जाणार आहे. स्पर्धेपुर्वी झालेल्या क्वालिफाईंग सेशन्समध्ये दुखऱ्या पायाने खेळूनही सिमॉन ५९.६५६६ पॉईंट्स मिळवून सगळ्यात पुढे आहे.त्यामुळेच तर तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

D3, B12 तेव्हाच वाढेल जेव्हा 'हा' पदार्थ खाल, बघा सप्लिमेंट्स घेऊनही D3, B12 कमी का असतं

त्या सेशनमधला तिचा खेळ पाहून "It's incredible," अशा शब्दांत अमेरिका टीमने टेक्निकल हेड चेल्सी मेमल यांनी तिचं कौतूक केलं. तिचा तो खेळ पाहून तिच्या पायात वेदना आहेत, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला येऊ नये, एवढ्या सहजतेने, लालित्याने ती खेळत होती. 

 

आणि आता तेवढ्याच उत्साहात तिची सुवर्ण पदकासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. पायाची दुखापत, काही वर्षांपुर्वी झालेला मानसिक त्रास असं सगळं असलं तरी तिची पदक जिंकण्याची जिद्द थोडीशीही कमी झालेली नाही,

मासिक पाळीविषयी आपल्या लेकीला कधी आणि कशी माहिती द्यावी? पाळीची भीती वाटू नये म्हणून...

असं तिच्या प्रशिक्षक लॅण्डी सांगतात. आजवर कित्येक पदकं स्वत:च्या नावे करून कितीतरी स्पर्धांची चॅम्पियन ठरलेली सिमॉन आजही अमेरिकेच्या जिमनॅस्टिक जगाचा एक चकाकता हिरा आहे. 

 

टॅग्स :पॅरिस ऑलिम्पिक २०२४