श्वेता आनंद नाईक
मी नवऱ्याला म्हणजे आनंदला म्हणाले की मला आणि मुग्धाला(लेक वय वर्षे ८) सायकल वारीला यायचे आहे. तो म्हणाला ख्वाब बहोत अच्छा है! पण मार्च संपत आला आहे तरी तुझ्याकडे सायकल नाही. तू कधी सायकल घेऊन प्रॅक्टिस करणार, त्यासाठी लागणारे कपडे कधी घेणार, राईडला तुला पहाटे लवकर जायला जमणार का, मुग्धाला आतच सायकल घेतली आहे तिची शाळा परीक्षा,सुट्टी मधली शिबिरे पाहता प्रॅक्टिस कधी कशी होणार, तिला एवढे मोठा पल्ला जमणार का, ऊन प्रचंड आहे त्रास व्हायला नको! -अशी प्रश्नपत्रिका समोर आल्यावर मी एका वाक्यात उत्तर दिले, अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुम से मिलाने में लग जाती है!त्याला म्हंटले डायलॉग नाही मारत तू आम्हाला फक्त गिअर रेशो बाकी टेक्निकल काही गोष्टी समजावून सांग आणि सपोर्ट कर राईडसाठी बाकी मी सगळे सांभाळते. कारण मी पण शाळा आणि कॉलेज चे पाहिलेवर्षं सोडल्यानंतर सायकल चालवली नव्हती.
इथून सुरवात झाली आमच्या सायकलीच्या पर्वाला. मुग्धाला आम्ही नुकतीच मार्च मध्ये सायकल घेतली होती आणि परीक्षा आणि शाळा यामुळे छोट्या 2,3 20,30 किलोमीटरच्या राईड केल्या होत्या पण त्या केल्यानंतर तिलाही कॉन्फिडन्स आला की आपण दमत नाहीये आणि आजून मोठी राईड जमेल. माझी तर सुरवात होती सायकल रेंटवर घेण्यापासून! कुठून घ्यायची, हायब्रीड मिळेल का, MTB च राहुदे वगैरे. मग मला आमचा मित्र महेश निंबाळकर याने रेंट वर सायकल घेण्यासाठी नंबर दिला आणि माझे काम सोपे झाले. आणि मग मे मध्ये फायनली मी हायब्रीड सायकल हातात आली. व्यायामाची सवय असली तरी उन्हामुळे, ट्रॅफिकमुळे सायकलिंग ची सवय नसल्याने गिअर रेशो कधी चुकल्याने, ५० किलोमीटरच्या राईडस ने नक्कीच थोडे दमायला झाले होते. त्यामुळे पुणे पंढपुर सायकलवरी हा पेपर इतकाही सोपा नसणार याची कल्पना आली होती. राईडला तर सुरवात झाली होती तरी आमचा स्पीड कमी पडत होता कारण आम्ही दोघी मायलेकि आजून सायकलिंगची पाटी गिरवत होतो! रोज प्रॅक्टिस होत नव्हती ती प्रॅक्टिस कशी वाढवता येईल याचा प्रयत्न चालू होता पण काही ना काही अपरिहार्यकारणमुळे रोजची प्रॅक्टिस होतच नव्हती. त्यात आम्ही ज्या आयएएस ग्रुपसोबत राईडला जाणार होतो त्यांच्याबरोबर एकपण राईड करण्याचा योग येत नव्हता. पण चालणे,सूर्यनमस्कार असा व्यायाम चालू होता.अखेरीस मे महिना उजाडला. मनाशी पक्का निश्चय केला होता की एकाच महिना राहिला आहे तर मुग्धा शिबिराहून आल्यावर जास्तीत जास्त सायकलिंग सराव करून एक शंभर-दिडशे किलोमीटरची तर करूया. पण तो ही डाव फसला काही अपरिहार्य कारणामुळे दोन वेळा गावाला जावे लागले. त्यामुळे परत ब्रेक झालाच रोजचा सराव झाला नाहीच पण जमेल तशा मध्ये मध्ये आम्ही दोघी २०-३० किमीच्या सायकल राईड करत होतो. अखेरीस आमच्या ग्रुपची 22 मे 2023 ला पहिली पुणे यवत पुणे अशी शंभर किलोमिटरची राईड झाली! त्या राईड मध्ये मी पहाटेची शांततेत सायकलिंगची मजा, टेल विंड मुळे मिळणार स्पीड आणि एकमेकांना चिअरअप, हे सगळे एन्जॉय केले! या राईडमुळे माझा आणि मुग्धाचा पंढरपूर राईडसाठीचा कॉन्फिडन्स वाढला!
अखेरीस सगळी तयारी करून ३ जूनला २ वाजताचा गजर लावून ३-४ तासकरता झोपलो पण फक्त नावाला! ,कारण एक्साइटमेण्ट, विचारांनी झोप लागलीच नव्हती. साडेतीनला निघालो. हडपसर ला पोचलो फ्लॅग ऑफ पॉईंटला पोचलो सगळी कडे लूक लुकणारे हेड लाईट टेल लाईट (काजवा महोत्सवाचा फील आला)घेऊन सायकलिस्ट तयार होते, सगळयांना बाय करत शुभेच्छा घेत आम्ही पुढे कूच केले.सकाळच्या वेळात जास्त जास्त अंतर कापत गेलो, येणार प्रत्येक सायकलिस्ट मुग्धला न विसरता चिअर अप करुन पुढे जाते होते. आणि अखेरीत कष्टानं ही राईड पूर्ण झाली. हा सगळा सायकलिंगचा सुरू झालेला प्रवास बघता एवढेच म्हणावे वाटते, हेची दान देगा देवा, कधी तुझा विसर न व्हावाआणि दोन महिन्यापासून सुरू झालेली ही सायकलवारी अशीच पुढे चालू राहावी हीच पांडुरंगाकडे इच्छा.