काही व्यक्ती खरोखरच खूपच विलक्षण असतात. आपल्या कामाकडे त्या कधीही काम म्हणून पाहात नाहीत. तर त्यांचं काम हे त्यांच्यासाठी एक साधना असते, उपासना असते. असंच काहीसं आहे केरळमधील कासरगोड Kasaragod येथील रहिवासी असणाऱ्या के. व्ही. नारायणी यांचं. पेशाने त्या शिक्षिका. मागील ४५ वर्षांपेक्षाही अधिक काळापासून दररोज २५ किमीचा पायी प्रवास करून एका वस्तीत जातात आणि तेथील मुलांना शिकवतात. आज त्या ६५ वर्षांच्या असल्या तरी आजही त्यांचा हा प्रवास अखंड सुरूच आहे. शिक्षणापेक्षा तुमच्या आयुष्यात महत्त्वाचं काय, असं विचारताच त्या काहीच नाही असं उत्तर देतात. यावरून त्यांची तळमळ दिसून येते. (Kerala’s Narayani Teacher Walks 25 KM Everyday For teaching students)
thebetterindia.com यांनी त्यांच्याविषयीचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार त्या नारायणी टिचर म्हणूनच पंचक्रोशीत ओळखल्या जातात. १९७१ साली त्या १० वी पास झाल्या.
साधा चहा करण्यासाठी बघा किती कुटाणे केले! तुम्ही पाहिली का चहा करण्याची ही सगळ्यात अवघड रेसिपी
महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी घेतले नाही पण तरीही हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि मल्याळम या ४ भाषा त्यांना उत्तम येतात. सकाळी ४: ३० वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. यानंतर स्वत:चं आवरून त्या घराबाहेर पडतात आणि सकाळी ६ वाजता त्या शिकवणी घेण्यासाठी एका घरात पोहोचलेल्या असतात.
महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा, मसाला म्हणूनही भाज्यांमध्ये टाका- जेवणाची वाढेल रंगत
त्यानंतर असंच वस्तीतील मुलांची शिकवणी घेत घेत त्या प्रवास करतात आणि अखेरच्या वस्तीवरून त्या घरी येईपर्यंत बरीच रात्र झालेली असते. या शिकवणीच्या माध्यमातून जो पैसा मिळतो, त्यात त्या त्यांचा उदरनिर्वाह चालवतात आणि आजारी बेडरिडन असलेल्या पतीच्या औषधपाण्याचा खर्च करतात.