Join us  

कौतुकास्पद! बेस्टमध्ये प्रथमच महिला बसचं स्टेअरिंग हाती घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 2:48 PM

Best gets its first woman driver women conductor : बेस्टमध्ये कंत्राटदारांकडून चालविण्यात येणाऱ्या बस सेवेसाठी त्या रुजू होणार आहेत. येत्या काही दिवसांतच त्या अधिकृतरित्या बसचे सुत्र हाती घेतील

बेस्टच्या माध्यमातून प्रवाश्यांच्या सेवेसाठी आता महिला चालकही येणार आहेत. पहिल्या महिला चालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मी जाधव यांची पहिल्या बसचालक पदी नियुक्ती करण्यात आली असून  जाधव यांच्यासह अन्य काही महिला चालकांचे प्रशिक्षण सुरू असून त्यात जाधव यांची पहिली निवड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. लक्ष्मी या मुलूंडच्या रहिवासी आहेत. (Best gets its first woman driver women conductors to join soon)

बेस्टमध्ये कंत्राटदारांकडून चालविण्यात येणाऱ्या बस सेवेसाठी त्या रुजू होणार आहेत. येत्या काही दिवसांतच त्या अधिकृतरित्या बसचे सुत्र हाती घेतील, असे सांगितले जात आहे. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण जवळपास पूर्ण झाल्याचं समोर आलं आहे. नवीन भरती झालेल्यांना सध्या सखोल प्रशिक्षण दिले जात आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्या राईडला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर जाधव 27 किंवा 28 मे रोजी सुरू होण्याची शक्यता आहे. जाधव धारावी बस डेपो ते दक्षिण मुंबई दरम्यान बस मार्गावर चालवतील.

बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक शहरात बस चालवणार आहेत. येत्या काही महिन्यांत आम्ही आणखी महिला ड्रायव्हर्सचीही ओळख करून देऊ,” असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले.  

टॅग्स :हेल्थ टिप्सप्रेरणादायक गोष्टी