Lokmat Sakhi >Inspirational > वापरून कंटाळा आलेल्या साडीचं तुम्ही काय करता? वाचा औरंगाबादच्या अनोख्या साडी बँकेची गोष्ट

वापरून कंटाळा आलेल्या साडीचं तुम्ही काय करता? वाचा औरंगाबादच्या अनोख्या साडी बँकेची गोष्ट

Saree Bank For Needy Women: त्याच त्या साड्या नेसण्याचा कंटाळा येतो आणि मग अशा कितीतरी साड्या घरात पडून असतात. बघा असा काही छान उपयोग करता येईल त्या साड्यांचा.. (best reuse of old saree)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 03:59 PM2022-06-11T15:59:40+5:302022-06-11T16:00:36+5:30

Saree Bank For Needy Women: त्याच त्या साड्या नेसण्याचा कंटाळा येतो आणि मग अशा कितीतरी साड्या घरात पडून असतात. बघा असा काही छान उपयोग करता येईल त्या साड्यांचा.. (best reuse of old saree)

Best reuse of old saree: Dr. Aaratishyamal Joshi in Aurangabad started "Saree Bank" for needy women | वापरून कंटाळा आलेल्या साडीचं तुम्ही काय करता? वाचा औरंगाबादच्या अनोख्या साडी बँकेची गोष्ट

वापरून कंटाळा आलेल्या साडीचं तुम्ही काय करता? वाचा औरंगाबादच्या अनोख्या साडी बँकेची गोष्ट

Highlightsआपल्या घरात पडून पडून खराब होणाऱ्या साड्या जर दुसऱ्या कुणा महिलेला समाधान देऊ शकत असतील, तर तोच त्या साडीचा खरा आनंद नाही का??

प्रत्येकीकडे अशा कितीतरी साड्या असतात, ज्या नेसून आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो. पण तरीही केवळ साडीचा मोह सुटत नसल्याने आपण त्या साड्या नेसत नसलो तरी वर्षानुवर्षे जपून ठेवतो. दुसऱ्या काही साड्यांचा गठ्ठाही आपल्याकडे जमलेला असतो. त्या साड्या म्हणजे आहेरात मिळालेल्या देण्या- घेण्याच्या साड्या. या साड्या नव्या कोऱ्या असतात. पण आपल्याला त्याचा रंग, पोत, प्रकार आवडत नसल्याने आपण त्यांना हातही लावत नाही. अशा सगळ्या साड्या उपयोगात आणण्याचा एक स्तुत्य उपक्रम ओरंगाबाद (Aurangabad) शहरात राबविला जात आहे. मुक्त पत्रकार डॉ. आरतीश्यामल जोशी (Dr. Aaratishyamal Joshi) यांनी २०१६ साली आस्था जनविकास संस्थेतर्फे शहरात साडी बँक हा उपक्रम सुरु केला. 

 

कशी झाली साडी बँकेची सुरुवात?
साड्यांची बँक ही कल्पनाच मुळात भन्नाट आहे. ही त्यांची साडी बँक समाजातील गरजू, उपेक्षित महिलांना साड्या पुरविते आणि त्यांच्या चेहऱ्यावर नवे हास्य फुलविते. या उपक्रमाची नेमकी सुरुवात कशी झाली याविषयी सांगताना डॉ. आरतीश्यामल म्हणतात की, एका संशोधन प्रकल्पासाठी त्या कचरा वेचक महिलांविषयी काम करत होत्या. त्यावेळी बराच वेळ या महिलांसोबत घालवावा लागायचा. त्यावेळी त्यांनी असं कितीदा पाहिलं की एखादा चांगला कपडा कचऱ्यात दिसला की त्या बायका तो उचलायच्या आणि घरी नेऊन धुवून वापरात आणायच्या. कपड्याचं मोल काय असतं, ते त्यांच्याकडे पाहून समजलं. म्हणून मग एके दिवशी आरतीश्यामल यांनी घरातल्या न वापरलेल्या साड्या त्या महिलांसाठी नेल्या. नव्या कोऱ्या साड्या पाहून तर कित्येक जणींच्या डोळ्यात पाणीच आले. चेहरा आनंदाने फुलून गेला. तिच खरी या उपक्रमाची सुरुवात.

 

आज या उपक्रमांतर्गत जवळपास २५ हजार साड्यांचे वाटप करण्यात आले आहे. साड्यांचं संकलन करणे आणि त्या साड्या गरजू महिलांपर्यंत पोहोचविणे, हे त्या उपक्रमाचं स्वरुप. जसं जसं साड्यांचं वाटप सुरू झालं, तसं तसं गरजू महिलांची संख्या समोर येऊ लागली आणि साड्यांची गरज वाढू लागली. सहावारी सोबतच नऊवारी साड्याही मागितल्या जाऊ लागल्या. आस्था जनविकास संस्थेच्या सगळ्या सदस्या या उपक्रमात सहभागी झाल्याच होत्या. पण तरीही साड्यांची गरज वाढतच होती.

 

त्यामुळे मग समाज माध्यमांवरही याविषयी आवाहन करण्यात आले. त्यानंतर संस्थेकडे साड्यांचा ओघ सुरु झाला. या उपक्रमाची व्याप्ती आता एवढी वाढली आहे की औरंगाबाद शहराच्या बाहेरही कित्येक शहरांमध्ये, गावांमध्ये साडी बँकेतर्फे साड्या पुरविल्या जात आहेत. पुरस्थिती, दुष्काळी भाग अशा ठिकाणीही साडी बँकेची मदत पोहोचली आहे.

आपल्या घरात पडून पडून खराब होणाऱ्या साड्या जर दुसऱ्या कुणा महिलेला समाधान देऊ शकत असतील, तर तोच त्या साडीचा खरा आनंद नाही का??

 

Web Title: Best reuse of old saree: Dr. Aaratishyamal Joshi in Aurangabad started "Saree Bank" for needy women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.