Join us

शाब्बास पोरी! आईची कॅन्सरशी झुंज, परिस्थिती बेताची; टॉपर होताच लेकीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:51 IST

अंशु कुमारीने 489 गुण (97.8%) मिळवले. तिला डॉक्टर व्हायचं आहे आणि हे स्वप्न पाहण्यामागे एक भावनिक गोष्ट आहे.

अंशु कुमारीने बिहार बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. ती १६ वर्षांची आहे. परीक्षेत पहिला क्रमांक मिळवून राज्याचं नाव मोठं केलं आहे. अंशु कुमारी म्हणाली की, तिला कॅन्सर रुग्णांना मदत करायची आहे. तिच्या आईलाही कॅन्सर आहे. तिला डॉक्टर (ऑन्कोलॉजिस्ट) व्हायचं आहे. अंशु कुमारी पश्चिम चंपारणच्या नौतन ब्लॉकमधील भारतीय इंटर कॉलेज गहिरी येथे शिकते.

अंशु कुमारीने 489 गुण (97.8%) मिळवले. तिला डॉक्टर व्हायचं आहे आणि हे स्वप्न पाहण्यामागे एक भावनिक गोष्ट आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना अंशू म्हणाली, "माझं ध्येय कधीच टॉप रँक मिळवणं नव्हतं, पण मला फक्त परीक्षेत चांगली कामगिरी करायची होती. माझ्या कुटुंबासाठी काळ खूप कठीण होता." 

"माझी आई सबिता देवी कॅन्सर ग्रस्त आहे. आम्हाला भावनिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षण आणि कठोर परिश्रम हाच आपल्या नशिबाशी लढण्याचा एकमेव मार्ग आहे हे मला समजायला जास्त वेळ लागला नाही. मला डॉक्टर (ऑन्कोलॉजिस्ट) व्हायचं आहे कारण आई आजाराने ग्रस्त आहे."

"माझी आई सेकंड स्टेज कॅन्सरची रुग्ण आहे. रुग्णाला किती वेदना होत असतात हे माझ्यापेक्षा कोणालाच समजू शकत नाही. मानवतेची सेवा करण्याचा ऑन्कोलॉजिस्ट म्हणजेच कॅन्सर रुग्णांवर उपचार करणारा डॉक्टर होण्याचा चांगला मार्ग आहे. मला माझं आयुष्य कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित करायचं आहे" असं अंशू कुमारीने म्हटलं आहे.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी