Lokmat Sakhi >Inspirational > भारतातली पहिली महिला सुमो पहिलवान कोण? सुमो दीदी हेतलची जगाला हिमतीने भिडण्याची कहाणी...

भारतातली पहिली महिला सुमो पहिलवान कोण? सुमो दीदी हेतलची जगाला हिमतीने भिडण्याची कहाणी...

All About India’s Only Female Sumo Wrestler Hetal Dave Whose Biopic 'Sumo Didi' Is In The Works : पुरुषांचे वर्चस्व व मक्तेदारी असलेल्या या खेळात एखाद्या स्त्रीने पाऊल ठेवणे काही सोपे नव्हते, पण तिनं हार मानली नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2023 04:21 PM2023-05-12T16:21:30+5:302023-05-12T16:34:33+5:30

All About India’s Only Female Sumo Wrestler Hetal Dave Whose Biopic 'Sumo Didi' Is In The Works : पुरुषांचे वर्चस्व व मक्तेदारी असलेल्या या खेळात एखाद्या स्त्रीने पाऊल ठेवणे काही सोपे नव्हते, पण तिनं हार मानली नाही.

Biopic ‘Sumo Didi’ follows story of India’s only female Sumo wrestler, Hetal Dave | भारतातली पहिली महिला सुमो पहिलवान कोण? सुमो दीदी हेतलची जगाला हिमतीने भिडण्याची कहाणी...

भारतातली पहिली महिला सुमो पहिलवान कोण? सुमो दीदी हेतलची जगाला हिमतीने भिडण्याची कहाणी...

सुमो हा जपानमध्ये खेळला जाणारा एक पारंपरिक खेळ आहे. कुस्ती क्रिडाप्रकारासारखा असलेल्या सुमो खेळामध्ये दोन खेळाडू एकमेकांना रिंगणाच्या बाहेर ढकलण्याचा किंवा खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. जपानमध्ये शतकानुशतके खेळल्या जात असलेल्या सुमो खेळामध्ये पुरुषांचेचे वर्चस्व असलेले आपल्याला पहायला मिळते. सुमो पैलवानाचे शरीर अतिशय वजनदार असते. शरीरावर अतीलठ्ठपणा म्हणजेच चरबी सुद्धा दिसत असते, परंतु ते कुस्ती खेळण्यात तितकेच माहीर व ॲक्टिव्ह असतात. पुरुषांचे वर्चस्व व मक्तेदारी असलेल्या या खेळात एखाद्या स्त्रीने पाऊल टाकणे म्हणजे सगळ्यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाही. 

हेतल दवे ही भारताची पहिली महिला सुमो रेसलर म्हणून ओळखली जाते. हेतलने भारतातील मुलींच्या साचेबद्धतेतील प्रतिमेला छेद देत कुस्तीला आपले पॅशन बनवले आहे. हेतलने वयाच्या पाचव्या वर्षापासून याची सुरुवात केली. लहानपणी, ती बार्बी डॉल किंवा सिंड्रेलाच्या कथा ऐकण्यापेक्षा जॅकी चॅन आणि ब्रूस लीचे चित्रपट पाहायची. हेतलने आधी मार्शल आर्ट आणि नंतर ज्युडोचे वर्ग घेतले. कालांतराने ती कुस्तीगीर झाली(All About India’s Only Female Sumo Wrestler Hetal Dave Whose Biopic 'Sumo Didi' Is In The Works).

कोण आहेत हेतल दवे ?

'सूमो पैलवान' म्हणून पुरुषांची मक्तेदारी तोडून आपल्या देशाचे नाव हेतल दवे या तरूणीने उज्ज्वल केले आहे. हेतल दवे हिने देशातील पहिली महिला 'सूमो पैलवान' असण्याचा मान पटकावला आहे. मुंबईत राहणाऱ्या सूमो पैलवान हेतल दवेने २००९ साली तैवानमध्ये झालेल्या विश्व सूमो कुस्ती स्पर्धेत ५ वे स्थान मिळवले होते. इतकेच नव्हे तर भारताची पहिली महिला सुमो पैलवान म्हणून हेतलचे नाव लिम्का बुक ऑफ रिकार्ड्समध्ये (Limca Book Of Records)  नोंदवले गेले आहे. ५.६ फूट उंचीच्या हेतलचे वजन सुमारे ७६ किलो आहे. ती सूमो कुस्तीच्या ६५ ते ८५ किलो गटात सहभाग घेते. हेतल सूमो कुस्ती शिकविण्यासोबतच विद्यार्थ्यांना कुस्ती आणि ज्युडोचे प्रशिक्षण देते. देशातील पहिल्या महिला सुमो फायटर असलेली हेतलला सहकारी महिला पैलवान मिळत नसल्याने तिला बिचारीला पुरुषांशीच भिडावे लागते. असे असले तरीही सरावाच्या वेळी हेतलने अनेक पुरुष सुमो रेसलरलाही हरवले आहे. महिला सुमो पैलवान नसल्याने तिला नाइलाजास्तव भाऊ अक्षयसोबत कुस्तीचा सराव करावा लागते जो ज्युडो खेळाडू आहे.

उत्तर प्रदेशची धाकड गर्ल बनली भारतातील पहिली महिला बाउन्सर, धीट मुलीचा प्रेरणादायी प्रवास...

'नमकवाली है हम'! उत्तराखंडातल्या पर्वत रांगांमधलं नैसर्गिक मीठ जगानं खावं म्हणून राबणाऱ्या महिलेची गोष्ट...

सुमो पैलवानकीला घरच्यांचा विरोध... 

एका सुशिक्षित ब्राह्मण परिवारात जन्म घेऊन सुद्धा हेतलला सुरुवातीला नातेवाईकांचा विरोध सहन करावा लागला. हेतल ६ वर्षाची असतानाच ज्युडोचे शिक्षण घेऊ लागली. जशी जशी ती मोठी होऊ लागली तस तसे तिला सुमो पैलवानकीची आवड निर्माण होऊ लागली. हेतलच्या वडिलांना तिच्या लग्नाची चिंता नेहमी सतावत असे. त्याचबरोबर सुमोच्या प्रशिक्षणादरम्यान हेतलला अनेक टिकांना सामोरे जावे लागले. या मुलीशी कोणी लग्न करणार नाही, असेही लोक म्हणायचे.

संबळपूरी साडी नेसून 'ती' धावली ब्रिटनमधील मॅरेथॉन, साडी नेसून ४२ किलोमिटर पळण्याची जिद्द...

हेतल यांना अजूनही काही अडचणींचा सामना करावा लागत आहे... 

भारतात सूमो कुस्तीला मान्यता प्राप्त खेळाचा दर्जा नाही. त्यामुळे हेतल यांना अनेक स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करता येत नाही. प्रायोजक मिळत नसल्याने हेतल यांना विदेशात होणा-या स्पर्धांमध्ये भाग घेता येत नाही. आवड व छंदामुळे घरातील परिवारांकडून जेवढी आर्थिक मदत होते त्यातूनच त्या स्पर्धेला जाण्याची तयारी करतात. देशात हा खेळ रूजावा अशी त्यांची मनोमन इच्छा आहे.

हेतल दवे यांचा जीवनपट उलगडणार 'सूमो दीदी'.... 

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा (Biopic) ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे जगभरातील वेगवेगळ्या व्यक्तींची आयुष्य प्रेक्षकांना आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळत आहेत. सत्य घटनांवर आधारित सिनेमा बनवण्यावर निर्मात्यांचा भर आहे. आता देशातील एकमेव महिला सुमो रेसलर (Sumo Wrestler) हेतल दवे (Hetal Dave) यांच्या आयुष्यावर वेब-सीरिज (Web Series) येणार आहे. हेतल दवे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सीरिजचं नाव 'सुमो दीदी' असल्याचं म्हटलं जात आहे. 'सुमो दीदी' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा जयंत रोहतगी सांभाळणार आहे. श्रीयमसह या सीरिजमध्ये नीतेश पांडे, चैतन्य शर्मा आणि राघव धीर दिसणार आहेत. या वेबसीरिजची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या वेबसीरिजची वाट पाहत आहेत. आता या वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली असून लवकरच ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जगायचं कधी स्वत:च्या मनासारखं! - लांब केस कापून बॉय कट करणाऱ्या कीर्ती कुल्हारीचा ‘बोल्ड’ लूक...

Web Title: Biopic ‘Sumo Didi’ follows story of India’s only female Sumo wrestler, Hetal Dave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.