Join us  

निखत तूने क्या किया... चॅम्पिअन होण्याच्या स्वप्नासह बॉक्सर निखतला सलमान खानही भेटतो.. तेव्हा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2022 3:22 PM

Boxing Champion Nikhat Zareen Dance Video With Salman Khan : निखत अवघ्या २५ वर्षांची असून ती इतर खेळाडूंपेक्षा नक्कीच वेगळी ठरते. याचे कारण म्हणजे ती तिच्या परंपराप्रिय भोवतालाला ते फारसे मान्य नव्हते.

ठळक मुद्देसमाजाचा विरोध होत असूनही वडीलांच्या पाठिंब्यामुळे निखत खेळत राहीली आणि आज तिने स्वत:ला सिद्ध केले. निखत नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती आपले फॅशनेबल फोटो शेअर करत असते.

भारतीय महिला बॉक्सर निखत झरीन खेळामध्ये तर उंचीवर आहेच पण तिच्या ठाम वक्यव्यांमुळेही ती अनेकदा चर्चेत असते. खेळाच्या मैदानात चॅम्पियन असलेली निखत सोशल मीडियावरही कायम अॅक्टीव्ह असते. मे २०२२ मध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये निखतने सुवर्णपदक पटकावत स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं, त्यानंतर निखतने कॉमनवेल्थ गेम्समध्येही बाजी मारली. खेळासाठी बऱ्याच पातळ्यांवर झगडत स्वत:ला सिद्ध करणारी निखत आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटते तेव्हा काय होतं हे नुकतंच पाहायला मिळालं. विशेष म्हणजे निखत या अभिनेत्यासोबत व्हिडिओ शूट करुन तो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करते. आश्चर्याची बाब ही की, तिच्या या व्हिडिओला एका दिवसांत ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळतात (Boxing Champion Nikhat Zareen Dance Video With Salman Khan). 

आता निखतच्या स्वप्नातला राजकुमार कोण असा प्रश्न जर आपल्याला पडला असेल तर तो म्हणजे बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान. निखतने सलमानसोबत "साथिया...तुने क्या किया.." या प्रसिद्ध गाण्यावर डान्स केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना निखत म्हणते, 'अखेर, वाट पाहणे संपले.' इतकेच नाही तर तिने या पोस्टला फॅनमोमेंट, ड्रीम कम ट्रू, सलमान खान असे हॅशटॅगही दिले आहेत. म्हणजे निखतला सलमान खान आवडतो हे यावरुन दिसून येते. निखत नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती आपले फॅशनेबल फोटो शेअर करत असते. निखत अवघ्या २५ वर्षांची असून ती इतर खेळाडूंपेक्षा नक्कीच वेगळी ठरते. याचे कारण म्हणजे ती तिच्या परंपराप्रिय भोवतालाला ते फारसे मान्य नव्हते. 

लहान लहान शॉर्ट्स आणि टी शर्ट्स घालून मुलगी खेळणार का? बॉक्सिंगसारख्या खेळामुळे चेहऱ्याला काही इजा झाली तर तिच्याशी लग्न कोण करणार असे प्रश्न निखतच्या नातेवाईकांनी अनेकदा विचारले. पण लेक चॅम्पिअन खेळाडू व्हावी असं स्वप्न असलेल्या निखतच्या वडिलांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष करत ते लेकीच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले. वडील मोहंमद जमील स्वत: फुटबॉल, क्रिकेट खेळत. घरातून, समाजातून होणारे अनेक आरोप धुडकावून लावत निखतनेही आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलं आणि स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं. वयाच्या १४ व्या वर्षी ती वर्ल्ड युथ चॅम्पिअन झाली. घरात तिचे काका बॉक्सर, त्यांची मुलं इथेशामुद्दीन आणि इमीशामुद्दीन दोघे बॉक्सर. तेलंगणामधील निजामाबादच्या या कुटुंबाला मात्र खेळाचं वेड होतं. त्यामुळे समाजाचा विरोध होत असूनही वडीलांच्या पाठिंब्यामुळे निखत खेळत राहीली आणि आज तिने स्वत:ला सिद्ध केले. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीबॉक्सिंगसलमान खान