Lokmat Sakhi >Inspirational > शाब्बास पोरी! आई वारल्यानंतर वडिलांनी घराबाहेर काढलं; दहावीला ९९ टक्के मार्क मिळवत पोरीनं रचला इतिहास

शाब्बास पोरी! आई वारल्यानंतर वडिलांनी घराबाहेर काढलं; दहावीला ९९ टक्के मार्क मिळवत पोरीनं रचला इतिहास

Inspirational Stories : आईच्या मायेचं छत्र नाही. नानानानीने सांभाळलं. श्रीजाने अभ्यास केला मनापासून आणि कोणतीही शिकवणी न लावता मिळवळं देदीप्यमान यश!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 01:58 PM2022-07-25T13:58:50+5:302022-07-25T15:17:28+5:30

Inspirational Stories : आईच्या मायेचं छत्र नाही. नानानानीने सांभाळलं. श्रीजाने अभ्यास केला मनापासून आणि कोणतीही शिकवणी न लावता मिळवळं देदीप्यमान यश!

CBSE 10th board abandoned by father after her mothers death sreeja becomes bihar latest tweet by ani | शाब्बास पोरी! आई वारल्यानंतर वडिलांनी घराबाहेर काढलं; दहावीला ९९ टक्के मार्क मिळवत पोरीनं रचला इतिहास

शाब्बास पोरी! आई वारल्यानंतर वडिलांनी घराबाहेर काढलं; दहावीला ९९ टक्के मार्क मिळवत पोरीनं रचला इतिहास

आयुष्यातली कोणतीही परिक्षा असो निकालाचा दिवस हा सगळ्यात खास असतो. प्रतिकुल परिस्थितीही मन लावून अभ्यास करत परिक्षेत टॉप करणं काही सोपं काम नाही. बिहारची असलेली श्रीजा इतक्या लहान वयात इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत तिने बिहारमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे.  (Inspirational Stories) 

श्रीजा चार वर्षांची असताना तिची आई देवाघरी गेली. इतक्या लहान वयात श्रीजानं आई नसल्याचं दु:ख सहन केलं. आई गेल्यानंतर वडिलांनीही कंपनी सोडली आणि दुसरं लग्न केलं. नंतर ती आजी आजोबांसोबत राहू लागली. सध्या दहावीच्या परिक्षेत ती राज्यात पहिली आल्यानं घरासह पूर्ण शहराचं नाव उज्जवल केल्याची प्रतिक्रिया घरातील लोक देत आहेत.  (CBSE 10th board abandoned by father after her mothers death sreeja becomes bihar latest tweet by ani)

श्रीजा पटनाच्या डीएवी बोर्ड कॉलनीची विद्यार्थीनी आहे. तिनं ९९.४ टक्के मिळवत दहावीला घवघवीत यश मिळवलं आहे. श्रीजाचे दोन मामा चंदन सौरभ आणि संकेत यांनी तिला मुलीसारखं वाढवलं, ते सांगतात, 'मुली कधीच ओझं नसतात.' तिचे आजोबा सुबोध कुमार गावी शेती करतात पण आठवड्यातून दोनवेळा नातीला भेटण्यासाठी घरी येतात आणि तिच्यासाठी गावाहून दूध घेऊन येतात कारण तिला पॅकेटमधलं दूध आवडत नाही.  (Mother died, the father threw her out of the house, got married again. Staying at maternal grandparents' house, Sreeja has topped Bihar in CBSE 10th)

टोल नाक्यावर ट्रकनं जोरदार धडक दिली; जीवाची बाजी लावून तरूणी मदतीला धावली, पाहा व्हिडिओ 

विशेष म्हणजे श्रीजाने आतापर्यंत कोणत्याही  ट्यूशन किंवा कोचिंग क्लासमध्ये शिकवणीसाठी गेलेली नाही. दहावीचा सगळा अभ्यास तिनं घरीच केला. तिला  आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश मिळवण्याची इच्छा आहे. श्रीजानं कोरोनाच्या संकटात नववी दहावीचा अभ्यास केला  हे खरोखरच कौतुकास्पद आहे.श्रीजाला ऑनलाईन, ऑफलाईन अभ्यासात काही समस्या येत होत्या. पण शिक्षकांच्या मदतीनं अभ्यासातील समस्या सोडवण्यास मदत झाली.  आज श्रीजा च्या या यशामुळे आजी-अजोबा आणि संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. कठिण परिस्थितीही खचून न जाता स्वत:ला सिद्ध केल्यानं  श्रीजा आज अनेकांसाठी आदर्श बनली आहे.

Web Title: CBSE 10th board abandoned by father after her mothers death sreeja becomes bihar latest tweet by ani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.