Lokmat Sakhi >Inspirational > छकडा एक्सप्रेस झुलनची कर्तबगारी, या ‘बाबूल’च्या हिमतीची खरंच माहिती आहे का?

छकडा एक्सप्रेस झुलनची कर्तबगारी, या ‘बाबूल’च्या हिमतीची खरंच माहिती आहे का?

अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीचा बायोपिक घेऊन येतेय, झुलनची कर्तबगारी त्यानिमित्ताने तरी साऱ्या जगाला कळेल. chakdaha express jhulan goswami biopic anushka sharma

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 04:41 PM2022-01-07T16:41:29+5:302022-01-07T17:48:59+5:30

अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीचा बायोपिक घेऊन येतेय, झुलनची कर्तबगारी त्यानिमित्ताने तरी साऱ्या जगाला कळेल. chakdaha express jhulan goswami biopic anushka sharma

chakdaha express jhulan goswami biopic anushka sharma, story of a great passion | छकडा एक्सप्रेस झुलनची कर्तबगारी, या ‘बाबूल’च्या हिमतीची खरंच माहिती आहे का?

छकडा एक्सप्रेस झुलनची कर्तबगारी, या ‘बाबूल’च्या हिमतीची खरंच माहिती आहे का?

Highlightsझुलनचा संघर्ष तिची जिद्दी आणि तिचं सातत्यपूर्ण पॅशन, हे सारं अत्यंत प्रेरणादायी आहे.

भारतीय महिला क्रिकेटची शान असलेली झुलन गोस्वामी, एक अत्युत्तम क्रिकेटपटू. आपलं करिअर उत्तम सांभाळणारी, दुखापतींवर वारंवार मात करुन भारतीय संघात पदार्पण करणारी आणि संघाचा आधारस्तंभ बनणारी झुलन गोस्वामी. तिचा आता बायोपिक येतो आहे. छकडा एक्सप्रेस. अनुष्का शर्मा त्यात झुलनचा रोल करते आहे. भारतीय महिला क्रिकेटच्या आधारस्तंभ असलेल्या दोघी झुलन  आणि मिताली राज. या दोघींची दीर्घ कारकीर्द, महिला क्रिकेटला त्यांनी दिलेला चेहरा हा सारा संघर्षाचा प्रवास अद्भूत आहे. बायोपिकच्या निमित्ताने झुलनचं काम लोकांसमोर येईल हे महत्त्वाचं. (chakdaha express jhulan goswami biopic anushka sharma)

(Image : Google)

अलीकडे भारत -बांग्लादेश डे-नाईट सामन्याच्यावेळी अनेक नामांकित क्रिकेपटूंसह झुलनचाही सत्कार करण्यात आला. सौरव गांगुलीचे आभार मानत तिनं कृतज्ञताही व्यक्त केली. मात्र हे सारं होत असताना आपला प्रवास आणि त्यापूर्वीची खडतर तपश्चर्याही तिला नक्की आठवली असेल.  तिच्या जिद्दीची गोष्ट नुस्ती वाचली तरी महिला क्रिकेटचा पाया घालण्यासाठी या मुलीनं काय काय केलं आणि किती खडतर प्रवास केला हे कळतं.
झुलनला तिच्या संघसहकारी ‘गुझी’ म्हणतात. बाबूल असंही तिचं एक निकनेम आहे. तिचं ते सुंदर स्माईल आणि सदैवर हसतमुख चेहरा ही तिची ओळख आहे. आणि दुसरी ओळख आहे तिचं गाव. पश्चिम बंगालमधल्या नादिया जिल्ह्यातील ‘छकडा’ हे तिचं गाव. त्याच नावानं ती छकडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. वयाच्या १५ व्या वर्षी या मुलीनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आईवडील मध्यमवर्गीय. क्रिकेटचं स्वप्नही पाहू नये आणि मुलीनं तर अजिबात क्रिकेट खेळू नये असंच एकूण वातावरण. मात्र झुलनला क्रिकेटने वेडं केलं. शिक्षण आणि क्रिकेट एकत्र जमावं म्हणून ती कोलकात्याला गेली. अत्यंत कष्टानं दोन्ही तिनं साधलं.


(Image : Google)

२००२ साली तिचं भारतीय संघात पदार्पण झालं. आणि एक उत्तम ऑलराउण्डर म्हणून तिचा उदय झाला. ती उत्तम बॉलर तर होतीच पण तिची बॅटही झकास काम करते. २००७ साली आयसीसीच्या उत्तम खेळाडूंच्या यादीत एकही भारतीय पुरुष क्रिकेटपटू नव्हता, त्यावेळी आसीसी प्लेअर ऑफ द इयर म्हणून गौरवलेली झुलन ही एकमेव क्रिकेटपटू.
झुलनचा संघर्ष तिची जिद्दी आणि तिचं सातत्यपूर्ण पॅशन, हे सारं अत्यंत प्रेरणादायी आहे. तिच्या कारकिर्दीनं भारतीय महिला क्रिकेटची पायाभरणीच केली आहे. ६०० बळी घेण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे.

https://www.google.com/cameos/jOlGlYCm/qV79Bh?hl=en

Web Title: chakdaha express jhulan goswami biopic anushka sharma, story of a great passion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.