Lokmat Sakhi >Inspirational > पोहण्याच्या स्पर्धेतच 'ती' झाली बेशुद्ध, पाण्यात उडी घेत महिला कोचने दाखवलं अफाट धाडस; चुकेल काळजाचा ठोका..

पोहण्याच्या स्पर्धेतच 'ती' झाली बेशुद्ध, पाण्यात उडी घेत महिला कोचने दाखवलं अफाट धाडस; चुकेल काळजाचा ठोका..

Coach rescues US swimmer Anita Alvarez : जागतिक स्पर्धेत पोहता पोहता बेशुद्ध झालेल्या अनिताचे कोचने असे वाचवले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 11:02 AM2022-06-24T11:02:24+5:302022-06-24T11:13:49+5:30

Coach rescues US swimmer Anita Alvarez : जागतिक स्पर्धेत पोहता पोहता बेशुद्ध झालेल्या अनिताचे कोचने असे वाचवले प्राण

Coach rescues US swimmer Anita Alvarez : In the swimming competition, 'she' became unconscious, the female coach showed immense courage by jumping into the water | पोहण्याच्या स्पर्धेतच 'ती' झाली बेशुद्ध, पाण्यात उडी घेत महिला कोचने दाखवलं अफाट धाडस; चुकेल काळजाचा ठोका..

पोहण्याच्या स्पर्धेतच 'ती' झाली बेशुद्ध, पाण्यात उडी घेत महिला कोचने दाखवलं अफाट धाडस; चुकेल काळजाचा ठोका..

Highlightsकाही वेळासाठी एकदम भितीचे वातावरण निर्माण झाले होते.जागतिक स्पर्धेत तिसऱ्यांदा ती यशाच्या जवळ पोहोचली होती. मात्र या अपघातामुळे ती यश गाठू शकली नाही.

कोणत्याही खेळाच्या स्पर्धेत सहभागी व्हायचे तर खेळाडूंना खूप सराव करावा लागतो. इतकेच नाही त्यांच्या मनावर देशाला जिंकून देण्याचा एक प्रकारचा ताण असतोच. शारीरिक, मानसिक स्थिती चांगली ठेवून उत्तम कामगिरी करण्याचे दडपणही त्यांच्यावर येत असणारच. अशाच एका खेळाडूबाबत एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक जलतरण स्पर्धेदरम्यान अमेरिकेच्या अनिता अल्वारेज हिने एकल प्रकारात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मात्र अंतीम फेरीला सुरुवात झाल्यावर तिने पाण्यात डाइव्ह घेतल्यानंतर ती अचानक बेशुद्ध पडली. बेशुद्ध झाल्याने ती स्विमिंग पूलमध्ये खाली पूर्ण पाण्यात गेली. यामुळे उपस्थितांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. मात्र तिची प्रशिक्षक असलेल्या अँड्रीया फ्यूएंटस यांनी प्रसंगावधान दाखवत स्विमिंग पूलमध्ये उडी मारत तिला बाहेर काढले आणि तिचे प्राण वाचवले (Coach rescues US swimmer Anita Alvarez after she faints midway while competing at World Aquatics Championships). 

(Image : Google)
(Image : Google)

२५ वर्षांची अनिता पूलमध्ये असताना बेशुद्ध झाल्यावर तिचा श्वास काही वेळासाठी बंद पडल्याचे अँड्रीया यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, सुरुवातीला तिचा श्वास थांबल्याचे पाहून मी घाबरले होते. मात्र तिला बाहेर काढल्यानंतर वैद्यकीय टिमने दिलेल्या प्राथमिक उपचारानंतर तीचे श्वसन पूर्ववत झाले, त्यावेळी आमच्या जीवात जीव आला. तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरल्याने काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्राथमिक उपचारांनंतर ती ठिक झाली. स्पर्धेसाठी गेल्या काही दिवसांपासून अनिताचा सराव वाढवण्यात आल्याने त्याचा ताण येऊन ही घटना घडली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. याठिकाणी उपस्थित सुरक्षारक्षकांना आपण अनिताला बाहेर काढा सांगत होतो, मात्र त्यांचे त्याकडे लक्ष नसल्याने अखेर आपल्याला पाण्यात उडी मारावी लागली असेही त्या म्हणाल्या.

(Image : Google)
(Image : Google)

अनिताला २०२१ मध्ये अमेरीकेतील आर्टीस्टीक स्विमिंग अॅथलिट ऑफ द इयर होती. तर जागतिक स्पर्धेत तिसऱ्यांदा ती यशाच्या जवळ पोहोचली होती. मात्र या अपघातामुळे ती यश गाठू शकली नाही. आता तिची तब्येत चांगली असून तिचा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, शुगर लेव्हल, ऑक्सिजन लेव्हल सगळे ठिक आहे. मात्र त्याठिकाणी काही वेळासाठी एकदम भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अशाप्रकारे अनिताला वाचवण्याची अँड्रीया यांची दुसरी वेळ होती. अँड्रीया या स्पेनमधील प्रसिद्ध जलतरणपटू असून त्यांनी आतापर्यंत ४ वेळा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले आहे. 

Web Title: Coach rescues US swimmer Anita Alvarez : In the swimming competition, 'she' became unconscious, the female coach showed immense courage by jumping into the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.