रविवारचा दिवस खरोखरंच भारतासाठी खास ठरला. बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांची लयलूट तर केलीच पण भारतीय महिला हॉकी (victory of Indian women's hockey team) संघाने दमदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकले. न्युझिलंडचा २- १ या फरकाने पराभव करत भारतीय महिला संघाने ही विजयश्री खेचून आणली. महिला संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth games 2022) कांस्य पदक (bronze medal) जिंकणे ही देखील एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. कामगिरी मोठी तर मग विजयोत्सवाचा आनंदही मोठा असणारच ना.. म्हणूनच तर जबरदस्त डान्स करत सगळ्याच टिमने दणक्यात सेलिब्रेशन (dance celebration) केले.
विजय मिळविल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भारताच्या महिला हॉकी टिमने जे काही सेलिब्रेशन केले, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 'सुनो गौर से दुनियावालो...' हे अंगावर रोमांच उभं करणारं गाणं.. हेच गाणं या विजयी टिमने सेलिब्रेशनसाठी निवडलं आणि त्यावर मनसोक्त नृत्य करून विजयाचा आनंद साजरा केला. भारतीय टिमची कॅप्टन सविता पुनिया हिच्यासह सगळ्याच जणी यावेळी प्रचंड आनंदात दिसून आल्या.
Celebration after victory....#CWG2022India#CWG2022#CommonwealthGames2022#Hockey#indiapic.twitter.com/P8rbeaCYkl
— Aditya Kumar (@adityavaisya) August 7, 2022
विजयी झाल्यावर सगळ्या खेळाडू आधी कॅप्टन सविताच्या गळ्यात पडल्या. हा खरोखरंच खूपच भावनिक प्रसंग होता. बहुतांश जणी यावेळी इमोशनल झाल्या होत्या. सवितासह अनेकींच्या डोळ्यात अश्रू होते. त्यानंतर सगळे खेळाडू कोच जाॅनेक शोपमैन यांना जाऊन भेटले. त्यांच्यासह आनंद साजरा केला. यानंतर त्यांनी ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश करताच मोठ्या आवाजात सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हे गाणे लावण्यात आले आणि त्यावर सगळ्यांनी मिळून जोरदार डान्स केला.. भारतीय महिला हॉकी संघासह सगळ्या देशासाठीच आनंदाचे असणारे हे क्षण सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.