Lokmat Sakhi >Inspirational > Daughter's Day 2021: पुरूष प्रधान संस्कृतीतूनही वेगळंपण सिद्ध करत यशाचं शिखर गाठणाऱ्या 'या' ८ महिला

Daughter's Day 2021: पुरूष प्रधान संस्कृतीतूनही वेगळंपण सिद्ध करत यशाचं शिखर गाठणाऱ्या 'या' ८ महिला

Daughter's Day 2021: प्रियंका चोप्रा जोनास सर्वात यशस्वी आणि प्रभावी अभिनेत्री, मॉडेल आणि चित्रपट निर्मात्यापैकी एक आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर अभिनेत्रीने हॉलिवूडमध्येही स्वत: साठी विशेष ओळख निर्माण केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 06:33 PM2021-09-26T18:33:20+5:302021-09-26T19:00:22+5:30

Daughter's Day 2021: प्रियंका चोप्रा जोनास सर्वात यशस्वी आणि प्रभावी अभिनेत्री, मॉडेल आणि चित्रपट निर्मात्यापैकी एक आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर अभिनेत्रीने हॉलिवूडमध्येही स्वत: साठी विशेष ओळख निर्माण केली आहे.

Daughters day 2021 : 5 indian daughters who established themselves as achievers in male dominated zones | Daughter's Day 2021: पुरूष प्रधान संस्कृतीतूनही वेगळंपण सिद्ध करत यशाचं शिखर गाठणाऱ्या 'या' ८ महिला

Daughter's Day 2021: पुरूष प्रधान संस्कृतीतूनही वेगळंपण सिद्ध करत यशाचं शिखर गाठणाऱ्या 'या' ८ महिला

Highlightsहा दिवस मुलींमधील भेदभावाविरोधात जागरूकता वाढवतो आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देतो कारण आजच्या युगात महिला सर्व बंधने तोडून मोठी उंची गाठत आहेत.

भारतात सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी कन्या दिन साजरा केला जातो. यावर्षी हा विशेष दिवस 26 सप्टेंबर रोजी साजरा केला जात आहे. काही समाजातील लोक अजूनही मुलींपेक्षा  मुलांना प्राधान्य देतात, हा दिवस प्रत्येकाला आठवण करून देतो की मुलीही काही कमी नाहीत. आज प्रत्येक क्षेत्रात मुलींना आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हा दिवस मुलींमधील भेदभावाविरोधात जागरूकता वाढवतो आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देतो कारण आजच्या युगात महिला सर्व बंधने तोडून मोठी उंची गाठत आहेत. मुलींना समान संधी उपलब्ध करून देण्यावरही सध्या भर असतो. मग ते शिक्षण असो किंवा नोकरी. या लेखात अशा महिलांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी पुरूषांसाठी राखीव असलेल्या ठिकाणी स्वत:चं स्थान मिळवलं. 

किरण बेदी

देशाची पहिली महिला IPS हा किताब हा गौरव प्राप्त करणाऱ्या किरण बेदींचा जन्म अमृतसर येथे 9 जून 1949 रोजी झाला. बेदी यांनी अनेक पदांवर काम केले आणि संयुक्त राष्ट्र नागरी पोलिस सल्लागार म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.  1994 मध्ये, त्यांना प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्या अशा महिलांपैकी एक आहेत ज्याचे आपण निश्चितच कौतुक करतो.

प्रियांका चोप्रा जोनास

प्रियंका चोप्रा जोनास सर्वात यशस्वी आणि प्रभावी अभिनेत्री, मॉडेल आणि चित्रपट निर्मात्यापैकी एक आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर अभिनेत्रीने हॉलिवूडमध्येही स्वत: साठी विशेष ओळख निर्माण केली आहे. तिच्याकडे दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होण्यापासून ते जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नाव मिळवण्यापर्यंत तिने हे सर्व केले आहे. फोर्ब्सने तिला जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये मान दिला.

इंद्रा नूई 

जेव्हा आपण देशभरातील शक्तिशाली महिलांबद्दल बोलतो, तेव्हा इंद्रा नूई यांचे नाव आवर्जून नमूद केले पाहिजे. पेप्सिकोचे माजी सीईओ तिच्या नेतृत्व कौशल्याबद्दल कौतुक करतात. जरी त्यांनी या पदावरून पायउतार केले असले तरी त्यांनी  तिथून सर्वांना प्रेरणा देत राहिली आहे. त्यांनी सातत्याने जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

अरूंधती रॉय

लेखिका अरुंधती रॉय यांनी द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीतून करीअरमध्ये पदार्पण केले. त्यांना मॅन बुकर पुरस्कारही मिळाला होता आणि त्या मानवाधिकार आणि पर्यावरणविषयक समस्यांशी संबंधित सामाजिक कारणांसाठी आवाज उठवत आहे. 

रोशनी नादर मल्होत्रा

एचसीएलचे संस्थापक शिव नादर यांची मुलगी रोशनी नादर एचसीएल एंटरप्राइजच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. फोर्ब्स वर्ल्डच्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्या 54 व्या क्रमांकावर होत्या. त्यांना व्यवसाय आणि उत्कृष्ट समाज कार्यासाठी त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

कर्णम मल्लेश्वरी

भारतीय वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारतातील पहिली महिला खेळाडू आहे. हा सन्मान 2000 साली त्यांना मिळाला. सिडनी 2000 ऑलिम्पिकमध्ये कर्णमने ही कामगिरी केली. एकूण 240 किलोमध्ये तिने स्नॅच प्रकारात 110 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 130 किलो वजन उचलून ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.

अंजूम चोप्रा

अंजुम चोप्रा ही भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती आजवर १२ कसोट्या आणि ११६ एकदिवसीय सामने खेळली आहे. जगभरातील यशस्वी महिलांच्या यादीत अंजूम चोप्राचे नाव आवर्जून घेतले जाते. 

मिताली राज

२००२ जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी मिताली राज आजही सातत्याने खेळतच आहे. तिच्यातील ऊर्जा, इन्स्पिरेशन, खेळाची भूक, स्वतःतील बेस्ट देण्याची धडपड आजही वाढतेच आहे. ती गेली जवळपास २० वर्षे भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते आहे. सर्वाधिक धावा करणारी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू आहे. 
 

Web Title: Daughters day 2021 : 5 indian daughters who established themselves as achievers in male dominated zones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.