Join us  

नासाची फेलोशिप मिळाली नाही, पण फिजिक्सचा अभ्यास करण्याची तिची जिद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 7:18 PM

दीक्षाने ‘ब्लॅक होल्स अँड गॉड’ हा लेख नासाला पाठवला होता. परंतु यावर आता नासानं स्पष्टीकरण दिलं असून तिला फेलोशिप देण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

ठळक मुद्देपॅनलिस्टची निवड करण्याची प्रक्रिया तिसऱ्या पक्षाकडून होते. दीक्षाबाबत देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे ही निवड करण्यात आली होती.

दिक्षा शिंदे. वय वर्षे फक्त १४. स्टीफन्स हॉकिन्स यांची पुस्तके वाचण्याचा तिचा छंद. याच पुस्तकातून नासा समजत गेलं नासाबद्दल तिला जबरदस्त ॲट्रॅक्शन निर्माण झालं. अगदी तिसरी- चौथीत असल्यापासून नासाबद्दल जे काही कळतंय, जे काही जाणून घेता येतंय यासाठी ती प्रचंड धडपड करायची. आजकालची मुलं मोबाईल, लॅपटॉप असं काही हातात आलं की आधी वेगवेगळे गेम डाऊनलोड कसे करता येतील,  याचा प्रयत्न करतात. पण दिक्षा मात्र मोबाईल, लॅपटॉप घ्यायची आणि गुगलवर सरळ नासाचा शोध  घेत बसायची. नासाच्या वेबसाईटला भेट देऊन तेथे नविन काय सुरू आहे, कोणते उपक्रम राबविण्यात येत आहे, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी काय कार्यक्रम आहे, याची माहिती घेण्याचा तिचा छंदच होता. असाच शोध घेताना मागच्यावर्षी तिला एमएसआय या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलविषयी माहिती समजली.

दहावीतील विद्यार्थिनी दीक्षा शिंदेची नासा (NASA ) या जगप्रसिद्ध या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेत एमएसआय या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलवर पॅनलिस्ट म्हणून निवड झाली असल्याचं वृत्त समोर आलं होतं. दीक्षाने ‘ब्लॅक होल्स अँड गॉड’ हा लेख नासाला पाठवला होता. परंतु यावर आता नासानं स्पष्टीकरण दिलं असून तिला फेलोशिप देण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच तिची निवड थर्ड पार्टीनं दिलेल्या चुकीच्या माहितीच्या अधारावर देण्यात आल्याचंही नासानं म्हटलं आहे. 

पॅनलिस्टची निवड करण्याची प्रक्रिया तिसऱ्या पक्षाकडून होते. दीक्षाबाबत देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे ही निवड करण्यात आली होती. यासाठी केवळ अमेरिकेचेच नागरिक पात्र आहेत. दीक्षाचा पेपर स्वीकारण्यात आलेला नसून तिच्या अमेरिकेच्या प्रवासाचा खर्चही नासा करण्याचा दावा चुकीचा असल्याचं ब्राउन यांनी इमेलद्वारे म्हटलं आहे. या प्रकरणी आता पुढील तपास नासाच्या महानिरिक्षक कार्यालयाद्वारे करण्यात येणार आहे. 

यात सहभागी होण्यासाठी तिने तिचा अभ्यासपुर्ण लेख पाठवला. पण तो नाकारला गेला. काही हरकत नाही, असं म्हणून दिक्षाने काही महिन्यानंतर पुन्हा एकदा एक लेख पाठवला. पण त्या लेखालाही नासाकडून मान्यता मिळाली नाही. पण तरीही नासाविषयी असलेलं प्रचंड कुतूहल तिला शांत बसू देत नव्हतं. तिने सप्टेंबर २०२० मध्ये पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि "ब्लॅक होल्स ॲण्ड गॉड" हा लेख पाठवला.

दिक्षाची करिअरची लाईन पुर्णपणे ठरलेली असून नॅशनल फिजिक्स याविषयात तिला उच्च शिक्षण घ्यायचे आहे. दिक्षाचे वडील कृष्णा शिंदे हे बदनापुर येथील एका शाळेत मुख्याध्यापक आहेत, तर आई रंजना शिंदे या गृहिणी आहेत. पोरीच्या पंखात बळ देण्यासाठी आम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे दिक्षाच्या पालकांनी सांगितले. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीनासाऔरंगाबादविद्यार्थीसंशोधन