Lokmat Sakhi >Inspirational > लक्ष्मीपूजन: पैशाचे व्यवहार मला नाही बाई जमत, असं बायका का म्हणतात?

लक्ष्मीपूजन: पैशाचे व्यवहार मला नाही बाई जमत, असं बायका का म्हणतात?

दिवाळी-लक्ष्मीपूजन हे सारं महिला मनापासून साजरं करतात पण अनेकजणी पैशाचे व्यवहार म्हंटलं की मागे सरतात असं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2022 02:12 PM2022-10-24T14:12:48+5:302022-10-24T14:21:50+5:30

दिवाळी-लक्ष्मीपूजन हे सारं महिला मनापासून साजरं करतात पण अनेकजणी पैशाचे व्यवहार म्हंटलं की मागे सरतात असं का?

Diwali 2022 : Lakshmi puja, do you financially independent? how to learn money matters? | लक्ष्मीपूजन: पैशाचे व्यवहार मला नाही बाई जमत, असं बायका का म्हणतात?

लक्ष्मीपूजन: पैशाचे व्यवहार मला नाही बाई जमत, असं बायका का म्हणतात?

Highlightsगदी लहान गोष्टींपासून सुरुवात करा पण पैशाचे व्यवहार करायला शिकाच

खोटं वाटेल पण अनेक कमावत्या, उत्तम आत्मविश्वास असणाऱ्या अनेक बायकाही पैशाचे व्यवहार म्हंटलं की आपलं काही चुकलं तर काय असं म्हणत बॅकफूटवर जातात. साधे ऑनलाइन व्यवहार करायला घाबरतात किंवा आपण फसवले गेलो तर काय म्हणत बँकेत जाणं टाळतात. पैशाचे निर्णय नवरा किंवा वडिलांनीच घेतलेले बरे असे अनेकींना वाटते. हे असं कशानं होतं, चुकत पुरुषांचंही नाही का? पण चुका होतील म्हणून आर्थिक स्वातंत्र्यच नाकारायचं हे काही बरं नाही. त्यामुळे अगदी लहान गोष्टींपासून सुरुवात करा पण पैशाचे व्यवहार करायला शिकाच, ते ही आत्मविश्वासाने. आपला पैसा आपल्याला वापरताच यायला हवा.

(Image : Google)

त्यासाठी काय करायचं?

१. एटीममध्ये जाऊन पैसे काढणं, भरणं, पासबूक भरणं हे शिकून घ्या.
२. ऑनलाइन व्यवहार सुरक्षितपणे कसे करायचे हे शिका, ते वापरुन पहा.
३. पासबूक वाचायला शिका, त्यातून दरमहिन्याचा जमा खर्च लिहून किती पैसा कुठं जातो हे पहा.
४. आपल्या खर्चाची यादी करा. पैशाचा हिशेब ठेवा.
५. चेक भरणे, डीडी काढणे, ऑनलाइन ट्रान्सफर हे सारं शिका.
६. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
७. तुमचं एसआयपी आहे का? नसेल तर का नाही? एसआयपी कसं करतात ते शिका.
८. विमा, वैद्यकीय विमा, हे सारं आपलंही हवं, नसेल तर काढा.
९. नवऱ्याच्या नावावर किती आणि कुठं कर्ज आहे ते विचारा.
१०. नवऱ्याचे पैशाचे व्यवहार तुम्हाला माहिती आहेत का? तुम्ही नॉमिनी आहात का, हे पहा.
११. तुम्ही दोघे एकमेकांना नॉमिनी आहेत का, तपासा. नसेल तर लावून घ्या.
१२. आपलं इच्छापत्र करुन ठेवा. वय मग तुमचं कितीही तरुण का असेना.
१३. आपले आर्थिक व्यवहार आपल्या हातात घ्या. त्यासाठी घरातल्यांची मदत घ्या.

Web Title: Diwali 2022 : Lakshmi puja, do you financially independent? how to learn money matters?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.