एखाद्या आईसाठी मुलाबाळांचा सांभाळ करून कर्तव्यावर हजर राहणं वाटतं तितकं सोपं नव्हे! सोशल मीडियावर सध्या एका माऊलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. यानिमित्तानं महिलांची तारेवरची कसरत पुन्हा एकदा लोकांसमोर आलीये. व्हायरल होत सलेल्या या फोटोतील डीएसपी मोनिका सिंग (DSP monika singh) यांच्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह (shivraj singh chouhan) यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती.
कर्तव्यावर हजर राहण्यासाठी त्या आपल्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन डीएसपी मोनिका मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी हजर झाल्या. लोक काय म्हणतील, बाळाला घेऊन आपण कसं काम करणार, बाळाला जास्त भूक लागली किंवा रडू आले तर काय करावं, या सगळ्यांची पर्वा न करता त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली आणि सर्वांसाठीच आदर्श ठरल्या.
कोण आहेत मोनिका सिंग?
मोनिका सिंग मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून काम करतात.त्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडवर बंदोबस्तासाठी तैनात होत्या. डीएसपी मोनिका सिंग यांनी आपल्या छातीवर त्यांनी एक बॅग बांधली होती. त्या बॅगमध्ये दीड वर्षाच्या लेक होती. आईचं आणि खाकीचं कर्तव्य नेटाने बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याला पाहून शिवराज यांना राहवलं नाही. त्यांनी डीएसपी मोनिका सिंग यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचा फोटो काढून ट्विटवर शेअर केला. खूप कमी वेळात हा फोटो तुफान व्हायरल झाला आणि मोनिका यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.
म्हणून दीड वर्षांच्या लेकीला घेऊन जावं लागलं
मोनिका यांच्या यांनी पीआयशी बोलताना सांगितले की, ''मी लेकीसह मुख्यमंत्र्यांच्या सेवेला हजर झाली कारण मला धारपासून 145 किमी दूर अलीराजपूरला जायचे होते. मंगळवारी सकाळी जेव्हा मी आपल्या कामावर यायला निघाले तेव्हा लेक काही ऐकायला मागेना, तेव्हा ती खूप हट्ट करत होती. अशावेळी मला कर्तव्यावर हजर होणं गरजेचं होतं आणि बाळालाही सांभाळायचं होतं. म्हणून मी बाळाला घेऊन मुख्यमंत्र्याच्या सेवत हजर झाले.'' सोशल मीडियावर मोनिका यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून लोकांसाठी हा फोटो हृदयस्पर्शी ठरला आहे. नेटिझन्सनी या माऊलीला समाल ठोकत अभिमानास्पद कमेंट्सचा वर्षाव केला आहे.