(Image Credit- The Better India)
केरळच्या कोडिकोडमध्ये सुब्रमनिया आणि गीता दास यांच्या २ मजली घराचं बील १२०० रुपयांपेक्षा जास्त कधीच येत नाही. (Eco Friendly House) कारण त्याचं इको फ्रेंडली घर नैसर्गिक गारवा आणि प्रकाश देते. घरात गार वातावरण राहण्यासाठी कृत्रिम वस्तूंऐवजी नैसर्गिक टेक्निकचा वापर करण्यात आला आहे. (Eco friendly house in kerala with mud plaster)
पोलिस फोर्समध्ये नोकरी करत असलेले सुब्रमनिया अनेक वर्षांपासून क्रॉक्रीटच्या घरात राहत होते. उन्हाळ्याच्या दिवसात नेहमीच एसी, पंख्याचा वापर करत असतं. अचानक त्यांनी आपल्या केरळच्या घराला पारंपारीक घरांप्रमाणे सुंदर बनवण्याचा विचार केला. जे अधुनिक आणि पर्यावरणास अनुकूलही असेल.
इको फ्रेंडली घर बघता बघता तयार झालं. कोडीकोडचे आर्किटेक्ट यासिर यांची मदत घेऊन त्यांनी आपलं आलिशान घर तयार केलं. यासिर Earthen Sustainable Habitats नावानं आपलं फर्म चालवतात. पर्यावरणास अनुकूल घर बनवण्यासाठी ते ओळखले जातात.
सुब्रमनिया यांची मुलगी अंजू यांनी द बेटर इंडियाशी बोलताना सांगितलं, ''माझ्या वडीलांना निसर्ग खूप प्रिय आहे. म्हणूनच त्यांनी पर्यावरणास अनुकूल घर बनवण्याचं ठरवलं. जेणेकरून त्यांना निसर्गाशी जोडलेले असल्याचं वाटेल आणि छान झाडंही लावता येतील.'' अंजू या दुबईत राहतात पण लॉकडाऊन दरम्यान त्यांना वडीलांसह गावच्या घरी राहण्याची संधी मिळाली.
घर कसं तयार झालं?
सुब्रमणिया आणि गीता यांना घरात नैसर्गिक थंडावा हवा होता. त्यामुळे हे घर बनवताना हवा आणि प्रकाशाकडे पूर्ण लक्ष दिले गेले. सुमारे 1000 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या, या घराच्या मध्यभागी एक अंगण देखील आहे, जे क्रॉस व्हेंटिलेशनमध्ये खूप मदत करते. या घराची खासियत वाढवणारी गोष्ट म्हणजे घराच्या आतील आणि बाहेरील भिंतींवरचे मातीचे प्लास्टर. सिमेंट प्लास्टर लावण्याऐवजी मातीच्या प्लास्टरचा वापर करण्यात आला आहे. चूना, माती आणि भूश्याचे मिश्रण एकत्र करून हे बनवलं आहे.
अंजू यांच्या म्हणण्यानुसार या घरात गावाच्या पारंपारीक घरात राहण्याची अनुभूती येते. मातीच्या प्लास्टारमुळे तापमान बाहेर जास्त असतानाही आजूबाजूच्या घरांच्या तुलनेत आमचं घर थंड राहतं. मातीच्या प्लास्टरमध्ये सिमेंटचा वापर कमी प्रमाणात करण्यात आला. संपूर्ण घर तयार होण्यासाठी जवळपास ३५ लाखांचा खर्च आला. घराच्या फरश्या मार्बलच्या असून छतावर पडणारं पाणी खालच्या बाजूला पडतं. घराच्या मधल्या अंगणात एक खड्डा तयार करण्यात आला आहे जिथे पाणी जिरतं. या कुटुंबाकडून सोलार वॉटर हिटरचा वापर केला जातो. ज्यामुळे विजेचीही बचत होते.