Lokmat Sakhi >Inspirational > तांदूळ आणि नागलीच्या पिठाचे चहाचे कप कोण बनवते? भेटा टी. जयलक्ष्मीला, ती म्हणते - चहा प्या, कप खा...

तांदूळ आणि नागलीच्या पिठाचे चहाचे कप कोण बनवते? भेटा टी. जयलक्ष्मीला, ती म्हणते - चहा प्या, कप खा...

Edible Tea Coffee Cup T Jayalaxmi : २ महिन्यांच्या प्रयत्नानंतर सापडला परफेक्ट फॉर्म्युला, त्या जिद्दीची कहाणी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2023 04:54 PM2023-02-21T16:54:06+5:302023-02-21T16:55:41+5:30

Edible Tea Coffee Cup T Jayalaxmi : २ महिन्यांच्या प्रयत्नानंतर सापडला परफेक्ट फॉर्म्युला, त्या जिद्दीची कहाणी....

Edible Tea Coffee Cup T Jayalaxmi : Who makes a cup of tea out of rice and gram flour? Meet T. To Jayalakshmi, she says - drink tea, eat cup... | तांदूळ आणि नागलीच्या पिठाचे चहाचे कप कोण बनवते? भेटा टी. जयलक्ष्मीला, ती म्हणते - चहा प्या, कप खा...

तांदूळ आणि नागलीच्या पिठाचे चहाचे कप कोण बनवते? भेटा टी. जयलक्ष्मीला, ती म्हणते - चहा प्या, कप खा...

चहा हे भारतासारख्या देशात आजही अमृताप्रमाणे प्यायली जाणारी गोष्ट. कोणत्याही वेळेला चहा पिणारे आपल्या आजुबाजूला असतात. झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपल्यातील कितीतरी जण चहा पितात. चहा घेण्यासाठी वापरला जाणारा कप धुणे हे आणखी एक काम होऊन बसते. नाहीतर थर्माकोल किंवा कागदाच्या कपने कचऱ्याची समस्या वाढते. इतकेच नाही तर अमृततुल्यमध्ये चहासाठी दिले जाणारे कप कितपत स्वच्छ असतात सांगता येत नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आंध्र प्रदेशमध्ये राहणाऱ्या टी जयलक्ष्मी यांनी खाता येतील अशा कपांची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे हे कप अतिशय हेल्दी सामग्रीपासून तयार करण्यात आले असल्याने यामुळे आरोग्याला कोणताही त्रास होण्याची शक्यता नाही (Edible Tea Coffee Cup T Jayalaxmi). 

मूळच्या शिक्षिका असलेल्या जयलक्ष्मी यांनी ही अनोखी संकल्पना शोधून काढली असून नाचणी आणि तांदळाच्या पीठापासून त्या या खायच्या कपांचे उत्पादन करतात. चहा पिऊन झाल्यावर आपण हे कप चावून खाऊन टाकू शकतो. बरेचदा प्लास्टीकच्या कपातूनही चहा प्यायला जातो. मात्र हे प्लास्टीकचे कप आरोग्यासाठी घातक असतात. त्यामुळे हा अतिशय उत्तम आणि सोपा पर्याय असल्याचे जयलक्ष्मी यांच्या कपांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जयलक्ष्मी दरमहा सुमारे 30,000 ते 40,000 कप तयार करतात, आणि वर्षाकाठी त्यातून 8 ते 10 लाख रुपये कमावतात. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे आपण कोन खाऊन टाकतो, त्याचप्रमाणे हा कप खाऊन टाकता येतो. या कपांसाठी नेमकं कोणत्या प्रकारचं मटेरीयल वापरता येईल याचा शोध घेण्यासाठी आपल्याला २ महिने लागल्याचे त्या सांगतात. 

(Image : Google)
(Image : Google)

नवऱ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची काळजी घेण्यासाठी जयलक्ष्मी यांनी आपली शिक्षिकेची नोकरी सोडली. त्यानंतर देशात कोरोनाचा उद्रेक झाला आणि आम्ही दोघेही जॉबलेस झालो. त्यानंतर आता आपण काहीतरी व्यवसाय सुरु करायला हवा असा विचार डोक्यात सुरू असतानाच मला चहाच्या कपांची कल्पना सुचली. मग अशा एखाद्या कंपनीची फ्रँचायजी घेण्यापेक्षा आपणच उत्पादन केले तर असा विचार आला आणि मी शोधाशोध करायला सुरुवात केली. मग युट्यूबवर याबाबतचे बरेच व्हिडिओ पाहिले आणि प्रयोग सुरु केले. बाजारात आधीपासून मिळणारे कपही पाहिले. मात्र त्यांची गुणवत्ता, त्यामध्ये वापरण्यात आलेल्या गोष्टी हे पाहून आपल्याला काय वेगळं आणि चांगलं करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. 

(Image : Google)
(Image : Google)

प्रधानमंत्री योजनेतून कर्ज घेऊन तसेच आपले सोन्याचे दागिने गहाण ठेवून जयलक्ष्मी यांनी कर्ज घेतले. विविध प्रयोग करण्यामध्ये त्यांचे साधारण १ लाख रुपये संपले. मात्र हार न मानता त्यांनी प्रयत्न चालू ठेवले आणि अखेर त्यांना त्यांच्या मनाजोगा फॉर्म्युला सापडला. मग त्यांनी आपल्या गरजेनुसार मशीनरी बनवून घेतली आणि ६० मिलिलीटर आणि ८० मिलिलीटरचे २ कप बनवले. यांची किंमत अनुक्रमे २.५ रुपये आणि ३.५ रुपये इतकी आहे. आता त्यांच्या या कपांना आंध्रप्रदेशमधूनच नाही तर इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे त्या सांगतात. यामध्ये साधारण २० मिनीटांपर्यंत गरम चहा राहू शकतो. येत्या काळात आपण अशाप्रकारे आईस्क्रीम बाऊल, चाट बाऊलही तयार करण्याचा आपला मानस आहे असे त्या म्हणाल्या. 
 

Web Title: Edible Tea Coffee Cup T Jayalaxmi : Who makes a cup of tea out of rice and gram flour? Meet T. To Jayalakshmi, she says - drink tea, eat cup...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.