Lokmat Sakhi >Inspirational > भांड्याची बँक सुरु करणारी एक तरुणी! प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी ‘तिने’ काय केलं पाहा..

भांड्याची बँक सुरु करणारी एक तरुणी! प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी ‘तिने’ काय केलं पाहा..

Faridabad Mother Opens Crockery Bank To Fight Disposable Plastic Menace : प्लास्टिक वापरु नका असे सांगून कुणी ऐकत नाही, पर्याय काय हा प्रश्न, त्या पर्यायी उपक्रमाचीच ही भन्नाट गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 07:24 PM2023-03-24T19:24:41+5:302023-03-24T19:37:29+5:30

Faridabad Mother Opens Crockery Bank To Fight Disposable Plastic Menace : प्लास्टिक वापरु नका असे सांगून कुणी ऐकत नाही, पर्याय काय हा प्रश्न, त्या पर्यायी उपक्रमाचीच ही भन्नाट गोष्ट

Faridabad Mother Opens Crockery Bank To Fight Disposable Plastic Menace | भांड्याची बँक सुरु करणारी एक तरुणी! प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी ‘तिने’ काय केलं पाहा..

भांड्याची बँक सुरु करणारी एक तरुणी! प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी ‘तिने’ काय केलं पाहा..

सध्या जगभरात 'प्लास्टिक प्रदूषण' ही खूप मोठी समस्या आपल्या समोर उभी ठाकली आहे. एकदा वापरल्यावर परत वापरात न येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू  टाकायच्या कुठे आणि त्यांची विल्हेवाट कशी लावायची ही समस्या जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे आपल्या पर्यावरणाला खूप वेगाने हानी पोहोचत आहे. प्लास्टिक पिशव्या, भांडी, आणि फर्निचरच्या वाढत्या वापरामुळे प्लास्टिक कचऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, यामुळेच प्लास्टिक प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. 

फरीदाबादच्या तूलिका सुनेजा यांनी या सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तूंच्या वापराला आळा बसावा यासाठी एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. मोठमोठे लग्नसमारंभ, सण, उत्सव यात बऱ्याचदा जेवणासाठी प्लाटिकच्या ताट, वाट्या, चमच्यांचा वापर केला जातो. हे सिंगल युज प्लास्टिक एकदा वापरून फेकून दिले जाते. याचे आपल्या पर्यावरणावर खूपच हानिकारक परिणाम पाहायला मिळतात. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी तूलिका सुनेजा यांनी सुरु केली अनोखी 'क्रॉकरी बैंक'(Faridabad Mother Opens Crockery Bank To Fight Disposable Plastic Menace).      

क्रॉकरी बैंक म्हणजे नेमकं काय ? 

मोठमोठे सण, समारंभ, उत्सव, पार्ट्या यामध्ये मोठ्या संख्येने लोक सामील होतात. एवढ्या सगळ्या लोकांच्या जेवणाचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण बहुतेकवेळा युज अँड थ्रो करता येतील अशा प्लास्टिकच्या ताट, वाटी, चमच्यांचा वापर करतो. या प्लास्टिकच्या भांड्यांचा एकदाच वापर करुन मग ते फेकून दिले जातात. अशा सिंगल युज प्लास्टिकचा पुनर्वापर करता येत नाही, त्यामुळे हे कचऱ्यात फेकून दिले जातात. यामुळे पर्यावरणातील प्लास्टिक कचरा वाढत आहे. परिणामी, या वाढत्या  प्लास्टिक कचऱ्यामुळे आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हा पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी आपल्याला सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर थांबवला पाहिजे. सिंगल युज प्लास्टिकच्या भांडयांना वापरण्यापासून आळा बसावा यासाठी तूलिका यांनी 'क्रॉकरी बैंक' सुरु केली. या उपक्रमांमार्फत, आपल्या घरी जर काही सण, लग्नसमारंभ, उत्सव असेल तर जेवणाच्या भांड्यांसाठी प्लास्टिकची भांडी न वापरता आपण स्टीलच्या भांड्यांचा वापर करु शकतो. या शुभकार्यांसाठी तूलिका स्टीलची पुनर्वापर करता येतील अशी भांडी मोफत देतात. आपण त्या भांड्यांचा वापर करुन, मग ती स्वच्छ करुन परत त्यांना द्यायची.          


क्रॉकरी बैंक सुरु करण्याची ही कल्पना कशी सुचली ? 

फरीदाबादच्या तूलिका सुनेजा यांनी सर्वप्रथम २०१८ साली आपल्या घरातूनच क्रॉकरी बैंकची सुरुवात केली होती. सुरुवातीला तिला आपल्या मित्र - मैत्रिणींना सोबत घेऊन या क्रॉकरी बैंकची सुरुवात करायची होती. परंतु तिच्या या कल्पनेवर सुरुवातीला कोणीच विश्वास ठेवला नाही. जेव्हा तिने ही कल्पना तिच्या मित्र  मैत्रिणींना सांगितली तेव्हा कोणीही तिला साथ दिली नाही. 

कोणीही साथ दिली नाही म्हणून हिरमोड न करता त्यांनी आपल्या पतीची मदत घेत आपल्या कल्पनेतील व्यवसायाला सत्यात उतरवले. आपल्या जवळील काही बचत केलेले पैसे आणि पतीचा भक्कम पाठिंबा याच्या जोरावर तूलिका यांनी आपला व्यवसाय सुरु केला. सर्वप्रथम त्यांनी केलेल्या बचतीतून क्रॉकरी बँकेसाठी काही भांडी खरेदी केली. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना याची माहिती दिली आणि आपल्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. कालांतराने हळूहळू त्यांना लोकांचा पाठिंबा मिळू लागला आणि त्यांच्यासारखे अनेक पर्यावरणप्रेमी त्यांच्या या प्रयत्नात सहभागी झाले.     

घ्या हो घ्या, भाजीची पिशवी भाड्याने घ्या! प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी एक भन्नाट प्रयोग...


त्यांच्या या कल्पनेमागचा नेमका हेतू काय ? 

येणाऱ्या पुढच्या पिढीला चांगले प्रदूषणमुक्त पर्यावरण व वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तूलिका यांनी क्रॉकरी बँकेची सुरुवात केली. तूलिका एका सामान्य गृहिणीप्रमाणेच, आपल्या कुटुंबाच्या आरोग्याबाबत नेहमीच जागरूक असते. यासोबतच ती एका शाश्वत जीवनशैली जगण्यावरही विश्वास ठेवते. पण पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण आणखी काहीतरी करायला हवे, असे तिला नेहमीच वाटत असे.

प्लास्टिकची भांडी किंवा इतर वस्तूं आजकाल आपल्यासाठी अगदी सहज उपलब्ध होतात. प्लास्टिकची होणारी सहज उपलब्धता आणि त्यामुळे आपली चटकन होणारी सोय व आपली गरज यामुळे आपण पर्यावरणाचा विचार करणे सोडून दिले आहे. सरकारने वेळोवेळी सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठीचे नियम काढले असले तरी आपण तेही मनापासून पाळत नाही. अशा परिस्थितीत, पर्यावरणाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी तूलिकासारख्या सामान्य गृहिणीचे हे पाऊल अभिमानास्पद आहे, असेच म्हणावे लागेल.

Web Title: Faridabad Mother Opens Crockery Bank To Fight Disposable Plastic Menace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.