Lokmat Sakhi >Inspirational > शेतकऱ्याच्या १० वर्षाच्या लेकीने केली कमाल! तिची मेडल पाहून तर विराट कोहलीही झाला चकित..

शेतकऱ्याच्या १० वर्षाच्या लेकीने केली कमाल! तिची मेडल पाहून तर विराट कोहलीही झाला चकित..

Pooja Bishnoi athlete: Pooja Bishnoi Jodhpur: Young Indian sportsperson: Indian child athlete: Pooja Bishnoi Virat Kohli: विराटला आपला रोल मॉडल मानणारी पूजा बिष्णोई आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2025 12:07 IST2025-04-04T12:05:45+5:302025-04-04T12:07:02+5:30

Pooja Bishnoi athlete: Pooja Bishnoi Jodhpur: Young Indian sportsperson: Indian child athlete: Pooja Bishnoi Virat Kohli: विराटला आपला रोल मॉडल मानणारी पूजा बिष्णोई आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला.

Farmer's 10 years daughter pooja Bishnoi jodhpur sportsperson inspiration all youth player performance as athlete makes virat kholi surprised | शेतकऱ्याच्या १० वर्षाच्या लेकीने केली कमाल! तिची मेडल पाहून तर विराट कोहलीही झाला चकित..

शेतकऱ्याच्या १० वर्षाच्या लेकीने केली कमाल! तिची मेडल पाहून तर विराट कोहलीही झाला चकित..

२०२२ च्या आयपीएल मॅचेस सुरु असताना विराट कोलहीचा पडता फॉर्म पाहून चाहत्यांची मन मोडले जात होती.(Pooja Bishnoi athlete) परंतु, त्याचा फॉर्म नीट व्हावा यासाठी प्रार्थना करणाऱ्यांमध्ये, त्याला चिअर अप करणाऱ्यांमध्ये १० वर्षांची चिमुकली पूजा बिष्णोई होती.(Pooja Bishnoi Jodhpur) मे मध्ये तिचा रिझल्ट लागल्यानंतर तिने विराटला ट्विवटरवरुन धन्यवाद दिले. विराटला आपला रोल मॉडल मानणारी आणि त्याच्या फाउंडेशनमधून प्रशिक्षण घेणारी पूजा बिष्णोई आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला. 
पूजा बिष्णोई १० वर्षांची ॲथलेटिक असून आतापर्यंत तिने अनेक मेडल जिंकले आहेत.(Indian child athlete: Pooja Bishnoi Virat Kohli) पाचव्या वर्षी सिक्स पॅक ॲब्स, आठव्या वर्षी धावण्याचा विश्वविक्रम तिने मोडला. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील गुडा बिष्णोई गावात शेतकरी कुटुंबात पूजाचा जन्म झाला.(Pooja Bishnoi Virat Kohli) ती आपल्या मामाकडे राहाते. सरवन बुडिया पूजाचे मामा असून तिचे कोच देखील आहेत. ज्या वयात मुले नीट चालायला शिकू शकत नाही, त्या वयात पूजाने धावण्याची खेळाडू बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिने खेळाडू बनण्यासाठी प्रशिक्षण सुरु केले. 

७ लेकी म्हणजे शाप, लोकांनी हिणवले त्याला; आज तोच बाप ताठ मानेने सांगतोय...


खेळण्याबाबतची तिची आवड पाहून भारताचा क्रिकेटपट्टू विराट कोहलीच्या फाउंडेशनने तिचा खेळाडूचा खर्च उचलला. वयाच्या ५ व्या वर्षी तिने सिक्स पॅक ॲब्स बनवले. ८ व्या वर्षी पूजाने १२.५० मिनिटांत ३ किमीची शर्यत पूर्ण करुन १० वर्षाखालील विश्वविक्रम रचला. वयाच्या ६ व्या वर्षी १० किमीची शर्यत ४८ मिनिटांत तिने पूर्ण केली. दुबई सरकारकडून तिला आयर्न पुरस्कार मिळाला. २०१९ साली तिला वीर दुर्गादास राठोड पुरस्कार मिळाला. २०१९ मध्ये पूजाने दिल्ली येथील स्पोर्टिगो टुर्नामेण्टमध्ये १४ वर्षाखालील वयोगटात भाग घेतला होता. तिने ३ किमी अंतर १२ मिनिटं ५० सेकंदात पूर्ण करुन नवीन रेकॉर्ड तयार केला. या स्पर्धेत तिने सुवर्ण पदक जिंकले. तसेच १५०० मीटर, ८०० मीटर स्पर्धेतही पूजाने सुवर्ण पदकं जिंकली आहेत. 

एवढ्या लहान वयात पूजाचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. तिची मेहनत आणि जिद्दीला पाहून विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि अमिताभ बच्चन यांना देखील तिचं कौतुक वाटतं आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात तिचं आपल्या ध्येयाविषयी, खेळाबद्दल असणारं प्रेम अनेकांना मोहून टाकतंय. तिच्या मागे तिचा मामा खंबीर उभा आहे असे सरवन बुडिया म्हणतात. माझ्या बहिणीने म्हणजेच पुजाच्या आईने आपण ॲथलेटिक बनावं म्हणून मदत केली होती. त्याचीच परतफेड करण्याची ही योग्य संधी आहे असे ते म्हणतात. पुजाच्या घरची परिस्थिती अधिक बेताची असल्यामुळे आई-वडिल आर्थिक मदत करु शकत नाहीये. असं तिच्या मामाने म्हटलं. पूजा तिच्या ध्येयामध्ये आणखी यश मिळवेल आणि अनेक सुवर्ण पदक जिंकेल असा विश्वास त्यांना वाटतो.  

 

Web Title: Farmer's 10 years daughter pooja Bishnoi jodhpur sportsperson inspiration all youth player performance as athlete makes virat kholi surprised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.