हाताने धनुष्यबाजी करता येते, हे माहिती आहे... प्रत्यक्षात खूप कमी लोकांनी ते पाहिलेलं असलं तरी टीव्हीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण धनुष्यबाजी नेहमीच बघत असतो. पण धनुष्यबाजीचा एक अगदीच वेगळा प्रकार एका तरुणीने करून दाखवला आहे. हॅण्डस्टॅण्ड पद्धतीचा व्यायाम करत तिने चक्क पायाने धुनष्यबाजी करत अचूक नेम साधला. तिच्या या कामगिरीची दखल गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली असून तिचा तो व्हिडिओ नुकताच व्हायरल (Viral video of archery with feet in handstand position) करण्यात आला आहे.
Shannen Jones 🇦🇺 हिने हा विक्रम केला आहे. ती वेलनेस आणि फिटनेस ट्रेनर असून ती एक प्रोफेशनल आर्चर आहे, असंही तिच्या इन्स्टाग्राम पेजवरून दिसून येतं.
Farthest arrow shot using feet हा किताब देऊन गिनिज बुकमध्ये तिची नोंद झाली आहे. तिने तिच्या पायाने बाण मारत तब्बल 18.27 मी. एवढ्या दुरवरचं लक्ष्य भेदलं आहे.
कसा मारला धनुष्यबाण?
यासाठी शॅनेनने सगळ्यात आधी हॅण्डस्टॅण्ड पद्धतीची पोझ घेतली. त्यानंतर एका पायामध्ये धनुष्य पकडले, तर दुसऱ्या पायाने अलगद बाण घेतला.
गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? घरच्याघरी करा दुरुस्ती, बर्नर स्वच्छ करण्याची बघा खास पद्धत
यानंतर ती हळूहळू कंबरेतून मागच्या बाजूने पुर्णपणे वाकत गेली आणि दोन्ही पाय समोरच्या बाजूला आणले. ती ज्या पद्धतीने वाकली, ते बघणे खरोखरच कमालीचे आहे. यावेळी दिसून आलेला तिचा फिटनेस बघणाऱ्यांना अचंबित करणारा आहे. जेव्हा दोन्ही पाय समोरच्या दिशेने आले, तेव्हा तिने एका पायाने धनुष्य धरला, दुसऱ्या पायाने त्यात बाण अडकवला, नजर समोरच्या लक्ष्यावर केंद्रित केली आणि अचूक नेम साधत बाण मारला. तिच्या धनुष्यबाजीचा हा भन्नाट व्हिडिओ एकदा बघायलाच हवा.