वडील हे मुलींसाठी कायमच एखाद्या हिरोसारखए असतात. लहानपणापासून मुली आपल्या वडिलांकडे पाहून अनेक गोष्टी शिकत असतात. वडील आणि मुलीचे नाते अनेकदा मित्रत्वाचे असते. मोठे झाल्यावर आपला जोडीदारही वडीलांसारखाच असावा असेही अनेकींना वाटते. करिअरच्या बाबतीतही अनेकजणी आपल्या वडिलांना फॉलो करतात. आपल्याच क्षेत्रात नाव कमावणारी मुलगी त्या वडिलांसाठीही अभिमानाची बाब असते. अशाच एका बाप-बेटीच्या जोडीची चर्चा हवाईदलात सध्या होत आहे. त्यांचे नाव आहे एअर कमांडर संजय शर्मा (Sanjay Sharma)आणि फ्लाइंग ऑफीसर अनन्या शर्मा (Ananya Sharma). या दोघांनी पहिल्यांदाच हवाई दलात एकत्रित उड्डाण करुन इतिहास रचला आहे (Father Daughter Fighter Pilot Duo Create History).
‘तान्हं बाळ घरी एकटं ठेवून मी..’- सैन्यात सेवा ते ब्यूटी कॉण्टेस्ट; प्रीती शेरावत यांची जिद्द
भारतीय हवाई दलात कार्यरत असलेल्या या दोघांनी फायटर जेट उडवल्यामुळे या दोघांचे सर्वच स्तरात कौतुक होत आहे. इतिहासात वडील व मुलगी एकाचवेळी उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे समोर आले आहे. आपल्या वडिलांसोबत फ्लाइंज जेट उडवणारी पहिली महिला भारतीय आहे. या बाप- लेकीच्या जोडीने हवाई दलाचे हॉक- १३२ विमान चालवून इतिहास रचला आहे. संजय शर्मा यांना आपल्या फ्लाइंग ऑफीसर असलेल्या मुलीच्या या कामगिरीबाबत खूप अभिमान असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. १९८९ मध्ये भारतीय वायूदलात रुजू झालेल्या कमांडर संजय शर्मा यांना अनेक फायटर विमाने उडवण्याचा अनुभव आहे.
Father-daughter duo, Flying Officer Ananya & Air Commodore Sanjay Sharma,created history on May 30 when they flew in same formation of Hawk-132 aircraft at IAF Station Bidar,where Flying Officer Ananya is undergoing her training before she graduates onto superior fighter aircraft pic.twitter.com/dUW4zCmc9V
— ANI (@ANI) July 5, 2022
लहानपणापासून बाबांचे काम पाहत असलेल्या अनन्यासाठी तिचे बाबा हेच प्रेरणास्छान होते. बीटेक पर्यंतचे शिक्षण झाल्यावर अनन्याने वडील कार्यरत असलेल्या हवाई दलात काम करण्याचे स्वप्न बघितले. आपल्या हिमतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर तिने हवाई दलात रुजू होत वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवले. २०१६ मध्ये भारतीय वायूदलात महिला फायटर पायलट म्हणून रुजू होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे तिचा आत्मविश्वास आणखी वाढला आणि तिने याच क्षेत्रात काम करायचे ठरवले. विशेष म्हणजे आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनन्याने बरीच मेहनत घेतली. घरात वडीलांचा पाठिंबा असल्याने चांगला अभ्यास करत तिने मध्ये हवाईदलात फ्लाइंग ब्रांचमध्ये प्रवेश मिळवला आणि त्यासाठी आवश्यक असणारे ट्रेनिंगही पूर्ण केले. २०२१ मध्ये अनन्याची हवाई दलात फायटर पायलट म्हणून नियुक्ती झाली. पहिल्यांदाच या दोघांनी एकत्रितरित्या फायटर विमान चालवल्याने या दोघांनाही विशेष आनंद झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसत होते.