Lokmat Sakhi >Inspirational > १३ वर्षांची फौजिया झाली खांडवातल्या मुकबधिर लोकांचा आधार.. लहानग्या पोरीची कमाल

१३ वर्षांची फौजिया झाली खांडवातल्या मुकबधिर लोकांचा आधार.. लहानग्या पोरीची कमाल

Inspiring Story of Fauziya: मध्यप्रदेशातील खांडवा परिसरात राहणारी लहानशी फौजिया आता त्या परिसरातील मूक- बधिर लोकांचा आधार झाली आहे. बघा त्यांच्यासाठी ती नेमकं काय- काय करतेय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 03:34 PM2022-09-10T15:34:42+5:302022-09-10T15:39:33+5:30

Inspiring Story of Fauziya: मध्यप्रदेशातील खांडवा परिसरात राहणारी लहानशी फौजिया आता त्या परिसरातील मूक- बधिर लोकांचा आधार झाली आहे. बघा त्यांच्यासाठी ती नेमकं काय- काय करतेय..

Fauziya in Khandwa working strongly for the deaf people... Look at her amazing work | १३ वर्षांची फौजिया झाली खांडवातल्या मुकबधिर लोकांचा आधार.. लहानग्या पोरीची कमाल

१३ वर्षांची फौजिया झाली खांडवातल्या मुकबधिर लोकांचा आधार.. लहानग्या पोरीची कमाल

Highlights....... तेव्हापासून फौजियाचे कार्य लोकांना समजले आणि त्यानंतर तिच्याकडे येणारा मदतीसाठीचा ओघ आणखीनच वाढत गेला. image credit- theprint.in

 

 

फौजियाचे वडील फारुख आणि आई फातेमा हे दोघेही मूक- बधिर. त्यामुळे त्यांच्याशी कसा संवाद करायचा, हे तिला चांगलंच माहिती होतं. ती त्यांच्याशी किती सराईतपणे बोलतेय, हे त्या भागातल्या काही अधिकाऱ्यांनी पाहिलं आणि मग त्यानंतर वयाच्या आठव्या वर्षीपासूनच अनेक सरकारी एजन्सी, अधिकारी यांच्याकडून तिला आमंत्रण येऊ लागलं.  परिसरातील मूक- बधीर लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी, ते काय बोलतात, काय सांगतात हे त्या अधिकाऱ्यांना सांगण्यासाठी फौजिया (Fauziya) काम करते. आता तर सरकारी अधिकारी आणि मूकबधिर लोक यांच्यातला दुवा म्हणून फौजिया काम करते आहे. 

 

बुरहानपुर येथे असे ही केले होते काम...
बुरहाणपूर येथे मूकबधिर मुलांची शाळा आहे. या शाळेतील मुलांशी तेथील शिक्षक गैरवर्तन करायचे. मुलांकडून अनेक कामे करून घेतली जायची. ही घटना सगळ्यात पहिले फौजियाने उघडकीस आणली होती. पोलीस ठाण्यात तक्रारी करून कोर्टकचेरी करून तिने या घटनेचा पाठपुरावा केला आणि आरोपींना शिक्षा देण्यास भाग पाडले. तेव्हापासून फौजियाचे कार्य लोकांना समजले आणि त्यानंतर तिच्याकडे येणारा मदतीसाठीचा ओघ आणखीनच वाढत गेला. 

 

मूकबधिर लोकांना अशी मदत करते फौजिया..
बँका, कोर्ट, पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा इतर कोणत्याही खाजगी, सरकारी कार्यालयात जर मूकबधिर लोकांना काहीही अडचणी आल्या तर त्या सोडविण्यासाठी फौजिया त्यांच्यासाठी कायम हजर असते.

एकदम बोअर झालंय लाइफ? नात्यातला रोमांसच संपला? अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय, छान सोपा उपाय

अगदी बँकेत एखाद्याला पासबूक भरायला मदत करण्यापासून ते एखाद्याची सरकारी कार्यालयात अडलेली कामे मार्गी लावण्यापर्यंत अनेक प्रकारची कार्यालये फौजिया करते. एखाद्या मूकबधिर व्यक्तीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असेल, तर त्याच्यासाठी दाद मागायला, त्याच्यावरील अन्याय दूर करायला फौजिया त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. 

 

Web Title: Fauziya in Khandwa working strongly for the deaf people... Look at her amazing work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.