Lokmat Sakhi >Inspirational > फक्त माणूस म्हणून मानानं जगू द्या! ब्यूटी पार्लर सुरु करणाऱ्या ट्रान्सजेंडरची इमोशनल गोष्ट

फक्त माणूस म्हणून मानानं जगू द्या! ब्यूटी पार्लर सुरु करणाऱ्या ट्रान्सजेंडरची इमोशनल गोष्ट

From being teased for being a transgender to opening her Salon : Deepa Bhaskar Emotional Story ट्रान्सजेंडरचं ब्यूटी पार्लर म्हणून आपली ओळख जपत ठामपणे आयुष्य जगणारी एक मानवी गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2023 03:59 PM2023-03-06T15:59:56+5:302023-03-06T16:02:54+5:30

From being teased for being a transgender to opening her Salon : Deepa Bhaskar Emotional Story ट्रान्सजेंडरचं ब्यूटी पार्लर म्हणून आपली ओळख जपत ठामपणे आयुष्य जगणारी एक मानवी गोष्ट.

From being teased for being a transgender to opening her Salon : Deepa Bhaskar Emotional Story | फक्त माणूस म्हणून मानानं जगू द्या! ब्यूटी पार्लर सुरु करणाऱ्या ट्रान्सजेंडरची इमोशनल गोष्ट

फक्त माणूस म्हणून मानानं जगू द्या! ब्यूटी पार्लर सुरु करणाऱ्या ट्रान्सजेंडरची इमोशनल गोष्ट

भारतीय समाजात स्त्री, पुरुष व तृतीयपंथी यांना समान अधिकार आहेत. मात्र समाजाकडून त्यांचा नेहमी अपमान होतो. मात्र या गोष्टींना झुगारून अनेकजण आपलं जगणं शोधतात आणि ताठ मानेनं जगतात. पण विचार करा कुणा तृतीयपंथी व्यक्तीसाठी ब्यूटी पार्लर सुरु करणं किती अवघड असेल? आपल्या हातात कला असली तरी लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवावा म्हणून किती काम करावं लागलं असेल. पण त्यातही यशस्वीपणे आपली वाट शोधणाऱ्या दीपा भास्कर गांगुर्डे. त्यांची ही गोष्ट.

हरजिंदगी या वेबसाईटने दीपा भास्कर गांगुर्डे यांच्याशी बातचीत करून, त्यांची ही प्रेरणादायी कहाणी जाणून घेतली, व त्यांनी ब्यूटी पार्लर उघडण्याचा निर्णय कसा घेतला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे(From being teased for being a transgender to opening her Salon : Deepa Bhaskar Emotional Story).

बालपण कसं गेलं?

''माझे बालपण अनेक संकट आणि संघर्षामधून गेलं. माझा जन्म नाशिकमध्ये एका गरीब कुटुंबात झाला. माझ्या लहानपणी माझी आई लाकूड वेचण्याचं काम करायची. घरातील परिस्थिती हलाखीची होती. मी शाळेत मुलींसोबत बोलायचो, तेव्हा वर्गमित्र खूप चिडवायचे. या कारणामुळे मला शाळा सोडावी लागली. पण त्या सगळ्या गोष्टी मागे सोडून, स्वत:ला खंबीर बनवत मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मला लहानपणी बांगड्या घालायला प्रचंड आवडायचे आणि मुलींसारखे कपडे घालायलाही आवडायचे, त्यामुळे माझे कुटुंबीय आणि काही नातेवाईकांनी माझ्यासोबत बोलणं टाळलं.''

बिहारच्या रुक्मिणीची कमाल! बाळांतपणानंतर केवळ ३ तासांनी पोहचली दहावीचा पेपर द्यायला, शाबास...

ब्यूटी पार्लर सुरु करण्यासाठी फॅमिलीचा पाठींबा मिळाला?

''मी माझे स्वतःचे ब्यूटी पार्लर सुरू करेन, असे मला कधीच वाटले न्हवते. या व्यवसायात मला माझ्या कुटुंबीयांनी फारसा पाठींबा दिलेला नाही. या काळात मला लोकांकडून खूप टोमणे ऐकून घ्यावे लागले. मी इतरांनाही माझ्यासारखे बनवीन असे लोकं म्हणायचे. या सर्व गोष्टी ऐकून मी खचलो होतो, पण हळूहळू मी माझ्या कामाने लोकांमध्ये वेगळी ओळख निर्माण करू लागले. माझ्या कामाचे अनेक महिलांनी कौतुक केलं. त्यामुळे मला खूप आनंद झाला. मनापासून एखादी गोष्ट करायला जा, यश तुमचे नक्की होईल.''

पार्लर सुरु करण्याची कल्पना कुठून सुचली?

''याआधी मी अनेक कंपन्यांमध्ये इंटरव्यू दिले होते, पण ट्रान्सजेंडर असल्यामुळे मला नकार मिळत गेला. त्यानंतर मी पार्लर सुरू करण्याचा निर्णय घेतला. ब्यूटीशियन बनण्याची इच्छा होती, पण माझ्याकडे फारसे ब्यूटी प्रोडक्ट्स नव्हते. सुरुवातीला टीव्हीवर येणाऱ्या कार्यक्रमांतून शिकण्याचा प्रयत्न केला. यानंतर जनशिक्षण संस्थेतून  कोर्स पूर्ण केला आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली.''

सांगा, माझी उंची किती असेल? असं तरुणीने ट्विटरवर विचारलं आणि एकाने उत्तर देत सांगितलं..

आयुष्यात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?

''मी आयुष्यात अनेक समस्यांचा सामना केला, व आजही अनेक समस्यांना तोंड देत आहे. परंतु, अशीही काही माणसे आयुष्यात आली ज्यांनी प्रोत्साहन देऊन पुढे जाण्यासाठी आधार दिला. ट्रान्सजेंडर समुदायाच्या लोकांनाही मी त्यांच्यात सामील व्हावे अशी इच्छा होती, मात्र मला घरोघरी जाऊन पैसे मागायचे न्हवते. मला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता, हे माझे स्वप्न होते. मला ट्रान्सजेंडरप्रती असलेला समाजाचा दृष्टीकोन बदलायचा आहे. ट्रान्सजेंडर लोकं देखील व्यवसाय करू शकतात आणि इतरांना प्रेरित करू शकतात हे दाखवून द्यायचे आहे.''

लहानपणी काय बनण्याचे स्वप्न पाहिले होते?

''मला लहानपणापासून मेकअप आर्टिस्ट बनण्याचे स्वप्न होते. मी माझ्या सोसायटीतल्या अनेक वधूंवर मेकअप करण्यासाठी जायचो. मेकअपपासून केसांच्या हेअरस्टाइलपर्यंत मला सगळं जमायचं. त्यानंतर मला या कोर्सची माहिती मिळाली, या कोर्समधून मला अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. मी खूप मेहनत घेतली आणि या क्षेत्रात माझे करिअर घडवले. तसेच सामाजिक कार्य करून जे गरीब आहेत त्यांना मी मदत करतो.''

अतिशय देखण्या आणि फिट अभिनेत्री पाहा रोज ब्रेकफास्ट काय करतात? कोणते पदार्थ खातात..

काय सांगाल?

''समाजातील सर्व लोकांनी हे समजून घेणं फार महत्वाचे आहे, की ट्रान्सजेंडर देखील एक माणूस आहे, त्यांनी आदर दिला पाहिजे. ज्या लोकांच्या घरात ट्रान्सजेंडर मुले जन्माला येतात, त्यांनी त्याला पूर्णपणे स्वीकारायला हवे. जेणेकरुन मुलाला आपले घर सोडून दुसरीकडे जावे लागणार नाही. प्रत्येक जण ज्याप्रमाणे एकमेकांना आदर देतात, त्याच प्रमाणे आमच्या समाजाला आदर मिळावा हीच इच्छा.''

Web Title: From being teased for being a transgender to opening her Salon : Deepa Bhaskar Emotional Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.