Join us  

सुटीत सहज म्हणून क्लास लावला अन् थेट गोल्ड मेडलपर्यंत मजल मारली... नेमबाज अवनी लेखराची खरीखुरी गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2023 1:24 PM

Inspirational story of Indian Para Shooter: पॅरालिम्पियन आणि रायफल नेमबाज असणाऱ्या तसेच पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल मिळविणारी पहिली महिला खेळाडू असणाऱ्या अवनी लेखराची ही गोष्ट... एखादा छंद मनापासून जोपासला तर तो तुम्हाला किती उंच घेऊन जाऊ शकतो, याचं हे उत्तम उदाहरण...

ठळक मुद्देतिथलं वातावरण आणि त्या खेळांचं स्वरुप तिला मनापासून आवडलं आणि तिने तो खेळ अगदी आवडीने आत्मसात केला.

उन्हाळी सुट्ट्या लागल्या की मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी करायला, छंद पुर्ण करायला वेळ मिळतो. विद्यार्थांमध्ये कधी कोणत्या कलेबाबत, खेळाबाबत आवड निर्माण होईल, काही सांगता येत नाही. त्यामुळे हल्ली बरेच पालक मुलांना वेगवेगळ्या कलांचे, वेगवेगळ्या खेळांचे किमान बेसिक कळावे, याबाबत आग्रही असतात. असाच प्रयत्न नेमबाज अवनीच्या पालकांनीही केला. त्याचीच ही गोष्ट.. (Inspirational story of Indian Para Shooter Avani Lekhra) उन्हाळी सुटीत तिला नेमबाजीच्या वर्गाला त्यांनी पाठवले. या खेळाबाबत तिला आवड निर्माण झाली. आणि नंतर खेळात प्राविण्य मिळवत तिने जे काही केलं ते आज सगळा भारतच मोठ्या कौतूकाने बघतो आहे. (From summer vacation hobby to gold medal)

 

पॅरालिम्पियन आणि रायफल नेमबाज म्हणून आज अवनी भारतभर ओळखली जाते. तिने टोकियो २०२० पॅरालिम्पिकमध्ये १० मीटर रायफल स्टँडिंगमध्ये पहिले सुवर्णपदक आणि ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. ती सध्या महिलांच्या १० मीटर एर रायफल स्टँडिंग एसएच१ मध्ये जागतिक क्रमांक २ वर आहे.

कुंडीतल्या मातीला बुरशी आली- किडे झाले? १ सोपा उपाय, मातीतलं इन्फेक्शन दूर होईल- झाडं जोमात वाढतील

hindustantimes यांच्याशी झालेल्या मुलाखतीत बोलताना ती म्हणाली की ती जेव्हा ११ वर्षांची होती तेव्हा म्हणजेच २०१२ साली तिचा अपघात झाला आणि तिच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली. त्यामुळे कंबरेच्या खालचा भाग बधीर झाला. यालाच पॅराप्लेजिया असं म्हणतात.

 

अपघातानानंतर एक- दोन वर्षांनी तिच्या वडिलांनी तिला उन्हाळी सुटीत तिरंदाजी, नेमबाजी यांच्या प्रशिक्षण वर्गात घातले. तिथलं वातावरण आणि त्या खेळांचं स्वरुप तिला मनापासून आवडलं आणि तिने तो खेळ अगदी आवडीने आत्मसात केला. तिची खेळातली गती पाहून पालकांनी आणि प्रशिक्षकांनीही तिला प्रोत्साहन दिले.

ऐकली होती का कधी सफरचंदाची इडली? हा विचित्र प्रयोग पाहून नेटिझन्स हैराण, बघा व्हायरल व्हिडिओ

तेव्हापासून ते आजपर्यंत तिने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. Khelo India Para Games सारख्या स्पर्धा आज खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म झाल्या असून त्यातून अनेक खेळाडू तयार होतील, अस विश्वासही तिने व्यक्त केला.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीगोळीबारपॅरालिम्पिक स्पर्धा