Lokmat Sakhi >Inspirational > तांदूळ-नागली पिकवणाऱ्या ओडिसातल्या महिलेला जी २० परिषदेचे आमंत्रण येते तेव्हा.. जगणं बदलवून टाकणारी ‘भरड’ गोष्ट!

तांदूळ-नागली पिकवणाऱ्या ओडिसातल्या महिलेला जी २० परिषदेचे आमंत्रण येते तेव्हा.. जगणं बदलवून टाकणारी ‘भरड’ गोष्ट!

G20 Summit Invitation To Raimati Ghiuria:आदिवासी आयाबायांचं जगणं बदलवून टाकणाऱ्या ‘भरड शाळेच्या’ रैमती घिरुरियांना जी २० परिषदेचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यांची ही प्रेरणादायी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2023 06:22 PM2023-09-07T18:22:22+5:302023-09-07T18:23:14+5:30

G20 Summit Invitation To Raimati Ghiuria:आदिवासी आयाबायांचं जगणं बदलवून टाकणाऱ्या ‘भरड शाळेच्या’ रैमती घिरुरियांना जी २० परिषदेचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यांची ही प्रेरणादायी गोष्ट

G20 summit: Tribal woman farmer Raimati Ghiuria from Odisha’s Bhumia community receives invitation | तांदूळ-नागली पिकवणाऱ्या ओडिसातल्या महिलेला जी २० परिषदेचे आमंत्रण येते तेव्हा.. जगणं बदलवून टाकणारी ‘भरड’ गोष्ट!

तांदूळ-नागली पिकवणाऱ्या ओडिसातल्या महिलेला जी २० परिषदेचे आमंत्रण येते तेव्हा.. जगणं बदलवून टाकणारी ‘भरड’ गोष्ट!

Highlightsएक साधी शेतकरी महिला. ती ही दुर्गम आदिवासी भागातली. तीन मुलांची आई. पण मनात आणलं तर एक स्त्री आपल्या अवतीभोवतीचं जग किती बदलू शकते याचं रैमती या आदर्श उदाहरण आहे.

दिल्ली येथे होणाऱ्या जी २० परिषदेसाठी ओडिशातील भूमिया समाजातील रैमती घिऊरिया या ३६ वर्षीय आदिवासी शेतकरी महिलेला आमंत्रण मिळाले आहे ही बातमी तर तुम्ही वाचलीच असेल (G20 Summit Invitation To Raimati Ghiuria). आता जिथे देशोदेशीचे म्होरके येणार तिथे ही महिला काय करणार असा प्रश्न जर कुणाला पडला असेल तर त्याचं उत्तर हेच की आपल्या समाजातील ताकद अजून आपल्याला कळलेली नाही. रैमती घिऊरिया यांचं कामच असं बोलकं आणि महत्त्वाचं आहे की हा सन्मान त्यांना लाभला याचा अभिमानच वाटावा.

 

आपल्याला जी २० परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण थेट सरकार धाडेल असं कधी रैमती यांनाही वाटलं नसेल. मात्र ९ आणि १० सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात त्या सहभाी होतील. मिलेट्स अर्थात श्रीधान्य म्हणजेच भरड धान्यासंदर्भात त्यांनी केलेल्या कामाची सरकारने दखल घेत हे आमंत्रण पाठवलं आहे. 

 

कोण आहेत रैमती?
एक साधी शेतकरी महिला. ती ही दुर्गम आदिवासी भागातली. तीन मुलांची आई. पण मनात आणलं तर एक स्त्री आपल्या अवतीभोवतीचं जग किती बदलू शकते याचं रैमती या आदर्श उदाहरण आहे. त्यांच्या नाैगुडा नावाच्या गावात त्यांनी शेती करता करता तांदळाचे ७२ देशी वाण जगवले. भरड धान्याची ३० देशी वाणं जगवली. लागवड केली. आपल्या गावातल्या महिलांना शिकवले. त्या शेतीतून या महिलांचं आयुष्य बदलू लागलं. गेली अनेक वर्षे त्या भरड धान्य जगवत आहेत. २०१२ पासून त्यांनी एक भरड शाळाच सुरु केली आणि तिथं त्या भरड लागवडीचे धडे देतात. आता तर भरड धान्य शेतकऱ्यांची एक सोसायटीही त्यांनी उभी केली आहे. त्यांचं हे सारं काम पाहूनच त्यांना देशोदेशी एक्सपर्ट समोर आपला अनुभव सांगण्याचं आमंत्रण मिळालं आहे.

 

नवी दिल्ली येथील इंडियन एग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात ही परिषद होणार आहे. शेती आणि तंत्रज्ञान तसेच भरड धान्याचे उत्पादन आणि संदर्भात केले जाणारे वेगवेगळे प्रयोग याविषयी या परिषदेत चर्चा होणार आहे. भरड धान्याचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांच्यापासून करता येणारे पदार्थ रैमती त्या परिषदेत स्वत: करुन दाखवणार आहेत. नाचणीचे पीक घेण्याची आधुनिक पद्धत आणि नाचणीच्या पदार्थांची माहिती देतील. तसेच ओडिशा मिलेट मिशनतर्फे केल्या जाणाऱ्या शेतीविषयक वेगवेगळ्या प्रयोगांबाबतही त्या माहिती देतील. शेती करताना वेगवेगळे तंत्रज्ञान वापरल्यामुळे पिकांना आणि शेतकरी म्हणून स्वत:ला कसा फायदा होतो, याविषयीचा त्यांचा स्वतःचा अनुभवही त्या सांगणार आहेत. शेतीमध्ये जर नवीन तंत्रज्ञान आणले तर एखाद्या सामान्य शेतकऱ्याचे जीवन कसे बदलू शकते, याचं प्रतिनिधित्व म्हणून रैमती या परिषदेत उपस्थित राहतील. असे स्वामीनाथन फाउंडेशनचे शास्त्रज्ञ प्रशांत परिदा यांनी सांगितले.

 

Web Title: G20 summit: Tribal woman farmer Raimati Ghiuria from Odisha’s Bhumia community receives invitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.