Lokmat Sakhi >Inspirational > गुगलने ज्यांना सलाम केला त्या केरळी अम्मा नक्की कोण? पद्मभूषण पुरस्कारानेही झाला आहे त्यांचा सन्मान

गुगलने ज्यांना सलाम केला त्या केरळी अम्मा नक्की कोण? पद्मभूषण पुरस्कारानेही झाला आहे त्यांचा सन्मान

Balamani Amma: मंगळवारी दिवसभर ज्यांचं गुगल डुडल जगभरात गाजत होतं, त्या बालमणी अम्मा म्हणजे नेमक्या कोण, याची उत्सूकता अनेकांमध्ये दिसून आली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 08:10 PM2022-07-19T20:10:07+5:302022-07-19T20:11:30+5:30

Balamani Amma: मंगळवारी दिवसभर ज्यांचं गुगल डुडल जगभरात गाजत होतं, त्या बालमणी अम्मा म्हणजे नेमक्या कोण, याची उत्सूकता अनेकांमध्ये दिसून आली...

Google doodle of great poet Balamani Amma, Who known as the grandmother of Malyalam poetry | गुगलने ज्यांना सलाम केला त्या केरळी अम्मा नक्की कोण? पद्मभूषण पुरस्कारानेही झाला आहे त्यांचा सन्मान

गुगलने ज्यांना सलाम केला त्या केरळी अम्मा नक्की कोण? पद्मभूषण पुरस्कारानेही झाला आहे त्यांचा सन्मान

Highlightsत्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्या प्रांतात अनेक कवयित्री, लेखिका घडत गेल्या. त्यांच्या कन्या कमला दास यादेखील ख्यातनाम लेखिका म्हणून नावाजलेल्या आहेत. 

कवी, लेखक किंवा इतर कोणीही कलाकार कालपरत्वे जगाचा निरोप घेतात. पण त्यांच्या कलाकृती, साहित्यकृती मात्र चिरकाल त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत राहतात. असंच काहीसं आहे गुगलने (google) ज्यांना आज सलाम केला आहे त्या केरळी अम्मांचं. ज्येष्ठ साहित्यिका, लेखिका बालमणी अम्मा यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त गुगलने गुगल डुडल तयार करून त्यांचा विशेष सन्मान केला आहे. केरळच्या (Kerala) कलाकार देविका रामचंद्रन यांनी हे गुगल डूडलचं (google doodle) डिझाईन तयार केलं आहे.

 

बालमणी अम्मांविषयी थोडंसं...
- १९ जुलै १९०९ रोजी मद्रास येथे बालमणी अम्मांचा जन्म झाला. कोणतंही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेलं नव्हतं. पण तरीही त्यांच्या लेखणीची प्रतिभा अलौकिक होती. त्यांचे मामा नलप्पट नारायण मेनन हे त्याकाळचे ख्यातनाम कवी होते. त्यांच्याकडे बघूनच बालमणी यांच्या लिखाणाची सुरुवात झाली. 
- 'Koppukai' ही त्यांची पहिली कविता १९३० साली प्रसिद्ध झाली. त्यानंतर जसं जसं त्यांचं लिखाण वाढू लागलं तसतशी अम्मा म्हणूनच त्यांची ओळख वाढत गेली. 'muthassi' म्हणजेच मल्याळम कवितेची आजी असं म्हणून त्यांना एक आगळाच मान मिळाला. 


- पद्मभूषण, साहित्य अकादमी, सरस्वती सन्मान असे मानाचे पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलं आहे.
- त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्या प्रांतात अनेक कवयित्री, लेखिका घडत गेल्या. त्यांच्या कन्या कमला दास यादेखील ख्यातनाम लेखिका म्हणून नावाजलेल्या आहेत. 


 

Web Title: Google doodle of great poet Balamani Amma, Who known as the grandmother of Malyalam poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.