कवी, लेखक किंवा इतर कोणीही कलाकार कालपरत्वे जगाचा निरोप घेतात. पण त्यांच्या कलाकृती, साहित्यकृती मात्र चिरकाल त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत राहतात. असंच काहीसं आहे गुगलने (google) ज्यांना आज सलाम केला आहे त्या केरळी अम्मांचं. ज्येष्ठ साहित्यिका, लेखिका बालमणी अम्मा यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त गुगलने गुगल डुडल तयार करून त्यांचा विशेष सन्मान केला आहे. केरळच्या (Kerala) कलाकार देविका रामचंद्रन यांनी हे गुगल डूडलचं (google doodle) डिझाईन तयार केलं आहे.
बालमणी अम्मांविषयी थोडंसं...- १९ जुलै १९०९ रोजी मद्रास येथे बालमणी अम्मांचा जन्म झाला. कोणतंही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेलं नव्हतं. पण तरीही त्यांच्या लेखणीची प्रतिभा अलौकिक होती. त्यांचे मामा नलप्पट नारायण मेनन हे त्याकाळचे ख्यातनाम कवी होते. त्यांच्याकडे बघूनच बालमणी यांच्या लिखाणाची सुरुवात झाली. - 'Koppukai' ही त्यांची पहिली कविता १९३० साली प्रसिद्ध झाली. त्यानंतर जसं जसं त्यांचं लिखाण वाढू लागलं तसतशी अम्मा म्हणूनच त्यांची ओळख वाढत गेली. 'muthassi' म्हणजेच मल्याळम कवितेची आजी असं म्हणून त्यांना एक आगळाच मान मिळाला.
- पद्मभूषण, साहित्य अकादमी, सरस्वती सन्मान असे मानाचे पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलं आहे.- त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्या प्रांतात अनेक कवयित्री, लेखिका घडत गेल्या. त्यांच्या कन्या कमला दास यादेखील ख्यातनाम लेखिका म्हणून नावाजलेल्या आहेत.