Lokmat Sakhi >Inspirational > आजारांनी छळलं, बहिरेपणा आला तरी न हरता जगली जगातली ‘फास्टेट वूमन’ गुगलने केला सलाम

आजारांनी छळलं, बहिरेपणा आला तरी न हरता जगली जगातली ‘फास्टेट वूमन’ गुगलने केला सलाम

Google Doodle Remembers Kitty O'Neil, The "Fastest Woman In The World" किट्टी ओ’नील या स्टंट वूमनला गुगलने सलाम केला, शारीरिक व्यंगावर मात करुन त्या धाडसी आयुष्य जगल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 01:49 PM2023-03-24T13:49:00+5:302023-03-24T13:50:08+5:30

Google Doodle Remembers Kitty O'Neil, The "Fastest Woman In The World" किट्टी ओ’नील या स्टंट वूमनला गुगलने सलाम केला, शारीरिक व्यंगावर मात करुन त्या धाडसी आयुष्य जगल्या

Google Doodle Remembers Kitty O'Neil, The "Fastest Woman In The World" | आजारांनी छळलं, बहिरेपणा आला तरी न हरता जगली जगातली ‘फास्टेट वूमन’ गुगलने केला सलाम

आजारांनी छळलं, बहिरेपणा आला तरी न हरता जगली जगातली ‘फास्टेट वूमन’ गुगलने केला सलाम

किट्टी ओ’नील. या अमेरिकेन स्टंट वूमन या नावाने प्रसिद्ध होत्या. आज त्यांचा ७७ वा वाढदिवस. गुगलने त्यांचे डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली आहे. किट्टी ओ’नील स्टंट वूमन तर होत्याच पण त्या एक रेसिंग ड्रायव्हरदेखील होत्या. लहान वयातच त्यांना अनेक आजार झाले. त्यातून बहिरेपणा आला. पण तरीही जिद्दीने त्यांनी आपली स्वप्न पूर्ण केली. त्यांना ''द फास्टेस्ट वूमन अलाइव्ह'' हा खिताब मिळाला होता(Google Doodle Remembers Kitty O'Neil, The "Fastest Woman In The World").

किट्टी ओ’नील यांचा जन्म २४ मार्च १९४६ रोजी कोपर्स क्रिस्टी, टेक्सास, अमेरिकेमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ‘जॉन ओ’नील’ असे होते. तर आईचे नाव ‘पॅटसी कॉम्प्टन ओ’नील’ असे होते. त्यांचे वडील युनायटेड स्टेट आर्मी एअर फोर्स मध्ये अधिकारी होते. किट्टी ओ’नील लहान असतानाच वडिलांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या आईनेच त्यांचे पालनपोषण केले.

बघावं ते नवलंच! लेकीसह आई, सासू, आजीही गर्भवती, पाहा व्हायरल व्हिडिओची गोष्ट

वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांना बहिरेपणा आला, व वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना अनेक आजारांनी ग्रासले. ऐकणं बंद झालं तर लेकीला आईने लिप सिंक शिकवले.

गालावर खळी...प्रत्येकाच्या गालावर खळी का पडत नाही? खळी पडण्याचे नेमके कारण काय..

किट्टी ओ’नील यांनी वॉटर स्कीइंग आणि मोटारसायकल रेसिंग यांसारख्या हाय-स्पीड स्पोर्ट्समध्ये सहभाग नोंदवला.  उंचावरुन उडी आणि हेलिकॉप्टरमधून उडी मारणे यासारखी धोकादायक कृत्ये देखील केली. ७०च्या दशकात त्यांनी मोठ्या पडद्यावर स्टंट करायला सुरुवात केली. द बायोनिक वुमन (1976), वंडर वुमन (1977-1979), आणि द ब्लूज ब्रदर्स (1980) यासह चित्रपट आणि टीव्ही मालिकांसाठी त्यांनी स्टंट डबल म्हणून काम केले.

करोडोंची मालकीण असलेली कंगणा ६०० रुपयांची साडी नेसते आणि म्हणते..

स्टंट्स अनलिमिटेड या हॉलिवूडमधील, टॉप स्टंट कलाकारांसाठी असलेल्या संस्थेमध्ये सामील होणाऱ्या त्या पहिल्या महिला. त्यांच्या जीवनावर १९७९साली बयोपिक ही तयार झाला. ''द किट्टी ओ’नील स्टोरी असे बयोपिकचे नाव होते. वयाच्या ७२व्या वर्षी त्यांचा युरेका, साउथ डकोटा येथे मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हा न्यूमोनियामुळे झाल्याचे समजते.

Web Title: Google Doodle Remembers Kitty O'Neil, The "Fastest Woman In The World"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.