Lokmat Sakhi >Inspirational > ५० कंपन्यांनी जॉब नाकारल्यानंतर २४ वर्षांच्या भारतीय तरुणीला गुगलने दिली ऑफर; पॅकेजचा आकडा ऐकाल तर..

५० कंपन्यांनी जॉब नाकारल्यानंतर २४ वर्षांच्या भारतीय तरुणीला गुगलने दिली ऑफर; पॅकेजचा आकडा ऐकाल तर..

जिद्द असावी तर अशी...इतक्यांदा अपयश येऊनही न खचता स्वत:वर विश्वास ठेवून तयारी करत राहणे ठरले फायद्याचेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 01:58 PM2022-02-14T13:58:13+5:302022-02-14T15:02:40+5:30

जिद्द असावी तर अशी...इतक्यांदा अपयश येऊनही न खचता स्वत:वर विश्वास ठेवून तयारी करत राहणे ठरले फायद्याचेच...

Google offers 24-year-old Indian girl after 50 companies refuse her job; If you listen to the package number .. | ५० कंपन्यांनी जॉब नाकारल्यानंतर २४ वर्षांच्या भारतीय तरुणीला गुगलने दिली ऑफर; पॅकेजचा आकडा ऐकाल तर..

५० कंपन्यांनी जॉब नाकारल्यानंतर २४ वर्षांच्या भारतीय तरुणीला गुगलने दिली ऑफर; पॅकेजचा आकडा ऐकाल तर..

Highlightsविशेष म्हणजे संप्रीतिला गुगलच्या आधी मायक्रोसॉफ्टनेही नोकरीची ऑफर दिली होती. ५० मुलाखतींमध्ये अपयश आल्यानंतर अचानक तिला चार ठिकाणांहून नोकरीच्या ऑफर्सही आल्या होत्या. वर्षाला १ कोटी १० लाख रुपयांची म्हणजेच महिन्याला जवळजवळ ९ लाखांच्या आसपास पगार तिला ऑफर करण्यात आला.

ठरवलं तर आपण आपलं उद्दीष्ट नक्कीच साध्य करु शकतो. एका २४ वर्षाच्या भारतीय तरुणीने हे सिद्ध करुन दाखवले आहे. शिक्षण पूर्ण झालं की तरुणांची नोकीर शोधण्याची गडबड सुरू होते, त्याचप्रमाणे संप्रीति यादव (Sampriti Yadav) हिने आपले कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी शोधायला सुरुवात केली. सुरुवातीला तिलाही अनेक कंपन्यांकडून नकार आला. मात्र त्यामुळे न खचता ती दरवेळी नव्या उत्साहाने तयारी करुन कंपन्यांच्या मुलाखती देत राहीली. अखेर एक दिवस असा आला की नियतीनेही तिच्या जिद्दीचे कौतुक केले आणि तिला थेट गुगलसारख्या (Google) कंपनीत नोकरी मिळाली. इतकेच नाही तर सुरुवातीलाच तिला मिळालेले पॅकेज पाहून ती आणि तिचे कुटुंबिय अक्षरश: अवाक झाले. मात्र यामागे तिची मेहनत घेण्याची असलेली तयारी आणि जिद्द कामी आली हे नक्की. 

(Image : Google)
(Image : Google)

संप्रीति मूळची बिहारच्या पाटणा येथील आहे. दिल्ली टेक्नोलॉजिकल यूनिव्हर्सिटीमधून संप्रीतीने २०२१ मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. तेव्हापासून ती नोकरीच्या शोधात होती. आपल्याला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एखाद्या नामांकीत कंपनीमध्ये नोकरी करायची आहे असं तिने ठरवलं होतं. त्यानुसार ती बऱ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये मुलाखती देत होती, यामध्ये गुगलचाही समावेश होता. जवळपास ५० कंपन्य़ांच्या मुलाखती झाल्यानंतर तिला गुगलकडून खास ऑफर मिळाली आणि तिच्या कष्टाचे सार्थक झाले. गुगलने या तरुणीला थोडेथोडके नाही तर तब्बल एक कोटी १० लाखांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. गुगलच्या मुलाखतीच्या एकूण नऊ फेऱ्या झाल्या. या फेऱ्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि वेगवेगळ्या विषयांवर उमेदवारांच्या आकलन शक्तीची चाचणी घेण्यात आली. संप्रीतिने या मुलाखतीमध्ये चांगली कामगिरी करत सर्व फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या, त्यानंतर गुगलने तिला ही गलेलठ्ठ पगाराची ऑफर दिली. 

वर्षाला १ कोटी १० लाख रुपयांची म्हणजेच महिन्याला जवळजवळ ९ लाखांच्या आसपास पगार तिला ऑफर करण्यात आला. १४ फेब्रुवारीपासून २४ वर्षीय संप्रीति गुगलमध्ये रुजू होणार आहे. विशेष म्हणजे संप्रीतिला गुगलच्या आधी मायक्रोसॉफ्टनेही नोकरीची ऑफर दिली होती. ५० मुलाखतींमध्ये अपयश आल्यानंतर अचानक तिला चार ठिकाणांहून नोकरीच्या ऑफर्सही आल्या होत्या. मात्र तिने गुगलची ऑफर स्वीकारली. आपल्या या मुलाखतींबाबत सांगताना संप्रीति म्हणते, “मुलाखतींच्या वेळेस माझा फार गोंधळ उडायचा. मात्र पालक आणि जवळचे मित्र यांनी मला कायमच चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मी रोज अनेक तास मोठ्या कंपन्यांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी वाचन करायचे. ”असं ती सांगते.

(Image : Google)
(Image : Google)

गुगलच्या मुलाखतीसाठी आपण बरीच तयारी केल्याचं संप्रीति सांगते. सर्वच स्तरांमध्ये मला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची मी समाधानकारक उत्तरं दिली. त्यामुळेच माझी निवड झाली. मोठ्या पॅकेजपेक्षा गुगलच्या लंडनमधील कार्यालयामध्ये काम करण्याची आपल्याला संधी मिळणार असल्याने आपण अधिक समाधानी असल्याचं संप्रीति सांगते.

Web Title: Google offers 24-year-old Indian girl after 50 companies refuse her job; If you listen to the package number ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.