भारताच्या पहिल्या सत्याग्रही महिला म्हणून ओळखल्या जात असलेल्या सुभद्रा कुमारींचा जन्म १६ ऑगस्ट १९०४ ला झाला. सुभद्राकुमारी चौहान फक्त ६ वर्षांच्या होत्या. त्यावेळी त्यांना अस्पृश्यतेचा पहिला अनुभव आला. अस्पृश्यतेचा विरोध करण्यासाठी त्यांनी त्याच्या आईसह अनेकदा भांडणं केली. जेव्हा आईनं ऐकले नाही तेव्हा,''आई आता तू धरतीचे २ तुकडे करून टाक'', असं म्हणायच्या. आज त्यांच्या जयंती निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना सलाम केला आहे. न्यूझीलंडस्थित कलाकार प्रभा मल्ल्या यांनी हे खास डूडल तयार केले आहे.
१९२३ मध्ये निर्भय सक्रियतेमुळे त्या पहिल्या महिला सत्याग्रही बनली, हीच महिला राष्ट्रीय मुक्तीच्या लढ्यात अटक करण्यात आलेल्या अहिंसक विरोधी वसाहतवाद्यांतील भारताची सामुहिक सदस्या बनली. स्वातंत्र्याच्या लढाईत १९४० च्या दशकात त्यांनी क्रांतिकारी विधाने करणे चालू ठेवले. एकूण ८८ कविता आणि ४६ लघुकथा त्यांनी प्रकाशित केल्या.
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी...झाँसी की रानी.. ही प्रचंड गाजलेली कविता आजही शाळांमध्ये शिकवली जाते. झाशीच्या राणीवरची ही अप्रतिम कविता सुभद्रा कुमारी चौहान यांनी रचली होती. समीक्षक रविनंदन सिंह सांगतात की, ''सुभद्रा कुमारी चौहान केवळ इयत्ता नववीपर्यंत शिकू शकल्या. त्यानंतर १९१९ मध्ये त्याचं लग्न लावून देण्यात आलं. एका वर्षानंतर पतीसह गांधींच्या असहकार चळवळीत त्यांनी उडी घेतली. त्याचवेळी महादेवी वर्मा सहावी इयत्तेत प्रवेश करून त्याच ठिकाणी आल्या होत्या. दोघांना एकाच खोलीचे वाटप करण्यात आले. एके दिवशी सुभद्राजींनी पाहिले की महादेवी डायरीत लपलेले काहीतरी लिहित आहेत.
जेव्हा त्यांनी डायरी दाखवायला सांगितली, तेव्हा महादेवीने ती लाजून दाखवली नाही. यावर सुभद्राकुमारी यांनी त्यांची डायरी हिसकावून घेतली आणि पाहिली, त्यात कविता होत्या. हे पाहून सुभद्रा कुमारी खूप खुश झाल्या आणि त्यांनी संपूर्ण वसतिगृहात फिरून विद्यार्थ्यांना डायरी दाखवली आणि महादेवींच्या काव्यलेखनाला प्रोत्साहन दिले.''
अशा प्रकारे महादेवी वर्मा यांच्यातील कवयित्री शोधण्याचे श्रेय सुभद्राकुमारी चौहान यांना जाते. १५ फेब्रुवारी १९४८ मध्ये सुभद्राकुमारी यांचा मृत्यू झाला. आज, चौहान यांची कविता ऐतिहासिक प्रगतीचे प्रतीक म्हणून भारतीयांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचे साहित्य भावी पिढ्यांना सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्यास प्रोत्साहित करते.