Join us  

जय हिंद! नेव्हीतील महिला अधिकाऱ्यांची कमाल, ५ महिला अधिकाऱ्यांनी केले मिशन फत्ते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2022 1:24 PM

Five Women Officers Navy: भारतीय नौदलाच्या INAS 314 या फ्रंटलाईनमधील ५ महिला अधिकाऱ्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे आणि  नौदलाच्या इतिहासात एक नवे गौरवशाली पान जोडले आहे.. 

ठळक मुद्देपहिल्यांदाच अशा पद्धतीचे मिशन फक्त महिला अधिकारी असलेल्या टीमने पुर्ण केले. त्यामुळे त्यांचे विशेष कौतूक होत आहे.

बुधवार दि. ३ ऑगस्ट हा दिवस भारतीय नौदलाच्या दृष्टीने अतिशय गौरवशाली ठरला. कारण INAS 314 या फ्रंटलाईनच्या ५ महिला अधिकाऱ्यांनी एक दमदार कामगिरी पार पडली. या पाचही जणींनी मिळून Dornier 228 aircraft नियंत्रित केले आणि त्यांच्यावर सोपविण्यात आलेले maritime reconnaissance and surveillance mission फत्ते केले. याअंतर्गत काही  सागरी भागांची पाहणी करणे आणि हालचालींवर नियंत्रण ठेवणे, असे काम करण्यात येते. पहिल्यांदाच अशा पद्धतीचे मिशन फक्त महिला अधिकारी असलेल्या टीमने पुर्ण केले. त्यामुळे त्यांचे विशेष कौतूक होत आहे. या मिशनसाठी त्यांनी पोरबंदर येथील नेव्हल कॅम्पवरून उत्तर अरबी समुद्रात उड्डाण केले. 

 

लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा यांनी या टीमचे नेतृत्व केले. लेफ्टनंट शिवांगी, लेफ्टनंट अपुर्वा गीते, वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट पुजा पांडा, वरिष्ठ लेफ्टनंट पुजा शेखावत यांचा यात सहभाग होता. हे मिशन यशस्वी झालं यामागचं कारण त्यांचं उत्तम झालेलं ग्राऊंड ट्रेनिंग होतं. ही मोहीम यशस्वी झाली आहे, त्यातून आता विमान वाहतूक संवर्गातील अधिक महिला अधिकारी अशी  कामगिरी करण्याची प्रेरणा घेतील, अशी अपेक्षा नौदलाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

 

अर्थात महिला अधिकाऱ्यांनी दमदार कामगिरी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही महिला अधिकाऱ्यांनी अनेक उल्लेखनिय कार्य केले आहे, असेही नौदलातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. डॉर्नियर २२८ हे एक बहुद्देशिय वाहतूक विमान असून ते वजनाला हलके आहे. १९८०- ९० च्या दशकात जर्मन डिझाईननुसार ते घडविण्यात आले होते. आता त्याचे पुढचे सुधारित मॉडेल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी तयार केले आहे.  

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीमहिला