Join us  

कुटुंबाचा विरोध झुगारून केलं लग्न ; सप्तपदीवेळी दिव्यांग पत्नीला पतीनं उचलून घेतलं..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 1:04 PM

Groom carries specially abled bride during pheras in ahmedabad : कुटुंबियांनं लग्नाला सहमती दिल्यानंतर महावीर सिंग यांनी तीन वर्षांपूर्वी गुजरातमधील पाटण येथील रीनलाबाशी लग्न केले.

प्रेमात पडल्यानंतर लोक काहीही करायला तयार होतात. तसंच आपल्या आवडत्या व्यक्तीवर जीव ओवाळून टाकतात.  सोशल मीडियावर असाच एक प्रसंग व्हायरल होत आहे. जे पाहून तुम्हाला या तरूणाचं खूप कौतुक वाटेल. अहमदाबादमध्ये एका वराने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले. महावीर सिंग यांच्या वधूचा सहा महिन्यांपूर्वी अपघात झाला आणि तिला पॅरालिसिस झाला. मोठ्या संघर्षानंतर कुटुंबियांनं लग्नाला सहमती दिल्यानंतर महावीर सिंग यांनी तीन वर्षांपूर्वी गुजरातमधील पाटण येथील रीनलाबाशी लग्न केले. (Groom carries specially abled bride during pheras in ahmedabad)

सहा महिन्यांपूर्वी रीनलाबा तिच्या मैत्रिणींसोबत खेळत असताना झाडाखाली पडल्याने तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला वेळीच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी तिच्या जखमा इतक्या गंभीर होत्या की तिला तिच्या शरीराचा खालचा भाग अजिबात हलवता येत नव्हता. त्यामुळे उठबस करणं कठीण झालं होतं. तिला एकाजागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठीही इतरांची मदत घ्यावी लागायची.

मंदिराबाहेर स्कूटी सुरू करायला गेली; थेट देवाच्या चरणाशी आदळली, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले....

रीनलाबाच्या पालकांना तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली कारण त्यांना महावीरच्या पालकांच्या आक्षेपांची भीती होती. कुटुंबीयांनी एकत्र येऊन लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला. तथापि, 31 ऑक्टोबर रोजी तिच्या वाढदिवसाला महावीरने रीनलाबावरचे आपले प्रेम कबूल केले आणि सांगितले की काहीही झाले तरी मला तिच्याशी लग्न करायचे आहे. 1 डिसेंबर रोजी महावीरच्या कुटुंबीयांच्या आक्षेपानंतरही त्यांनी अहमदाबादमध्ये रीनलाबासोबत लग्न केले. हिंदू लग्नात पारंपारिक प्रथा असलेल्या सप्तपदीदरम्यान , महावीरने तिला उचलून घेतले कारण कारण तिला चालायला जमत नव्हतं. सोशल मीडियावर ही लवस्टोरी चर्चेचा विषय ठरली असून तरूणावर कौतकाचा वर्षाव केला जात आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल