(Image credit-Casino guiden, WION)
भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू आज आपला २७ वा जन्मदिवस साजरा करत आहे. ८ ऑगस्ट १९९४ ला इंफाळमध्ये जन्मलेली मीराबाई आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिचा यावर्षीचा वाढदिवस हा खूप खास आणि अविस्मरणीय असणार आहे. काही दिवसांपूर्वी मिराबाईनं टोकिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवत इतिहास रचला. मीराबाई ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी दुसरी भारतीय महिला वेटलिफ्टर आहे. मीराबाई चानूबाबत खूप कमी लोकांना हे माहीत आहे की, ती आपल्या बॅगमध्ये नेहमी देशाची माती ठेवते. इतकंच नाही तर परदेशात गेल्यानंतरही गावातील तांदळांचा भात खाते.
ऑलिम्पिकमचा प्रवास मीराबाईसाठी सोपा नव्हता. २००६ मध्ये वेटलिफ्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशानं तिनं एकॅडमी जॉइन केली. ही एकॅडमी तिच्या घरापासून जवळपास २० किमी दूर होती. ट्रक ड्रायव्हर्सकडून लिफ्ट घेत मिराबाई तिथपर्यंत पोहोचत होती जेणेकरून जास्त खर्च होणार नाही. ओलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर मिराबाईनं या ट्रक ड्रायव्हर्सना मिठाई भरवत त्यांचे आभार मानले.
(Image Credit- Saikhom Mirabai Chanu/Instagram)
मीराबाई चानूला ६ भाऊ बहिण आहेत. अशात वडीलांच्या कमी पगारात सगळ्यांचे पालनपोषण करून चानूचं स्वप्न पूर्ण करणं सोपं नव्हतं. तरिही प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मीराबाईनं आपलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आकश पाताळ एक केलं आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचली.
२०१८ मध्ये एका गंभीर पाठीच्या दुखापतीनंतर मीराबाई काळजीत होती की ती पुन्हा कधीही उठू शकणार नाही, परंतु ती पुढे जात राहिली. ''मी माझ्या समुदायासाठी धडपडत आहे'', 'असं 26 वर्षांच्या तरुणांनी सांगितलं होतं. जी आज अनेक तरुण मुलांसाठी प्रेरणा बनली आहे.
मीराबाईंच्या म्हणण्यानुसार, 'फिट होण्यासाठी योग्य वेळ किंवा जागा गरजेची आहे असं नाही. तुमच्यातला अॅथलीट जागा करा आणि जगाला आपले खेळाचे मैदान बनवा. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवल्यास तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.' नेहमी 'उच्च लक्ष्य ठेवा.' स्वत: वर विश्वास ठेवल्यास ध्येय गाठण्यास काहीच वाटत नसलेल्या मीराबाई सांगते.