अँजलिना जोली. (angelina jolie ) जगभरात तिचे दिवाने कमी नाही. तिचा अभिनय, तिच्या अदा, तिचं सौंदर्य या साऱ्याचीच चर्चा होते. त्यासोबत चर्चा होते तिच्या पालकत्वाची आणि जगभरात ती करत असलेल्या कामांची. आता सध्या ती पाकिस्तानात आहे. पाकिस्तानात यंदा आलेला प्रचंड पूर, भयानक विध्वंस, माणसांची वाताहात हे सारं भयाण आहे. जगभरातून लोकांनी सोशल मीडियात कमेंट्स करत सहानुभूती दर्शवली पण अँजलिना जोली. तिथंच थांबली नाही.तर स्वत: पाकिस्तानात पोहचली. दुर्गम भागात, वाडी वस्त्यांवर जात तिनं प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली. हेलावून गेली.. सेलिब्रिटींनी संवेदना जाग्या ठेवत स्वत:ला माणूसकीशी जोडून घेणं काय असतं याचं एक चित्र आहे अँजलिना जोली.
(Image : google)
पाकिस्तानात फिरुन जे चित्र पाहिले त्यावर अँजलिना जोली म्हणाली, ‘हा असा पूर हा असा विध्वंसं मी कधीही पाहिलेला नव्हता. मी आजवर पाकिस्तानात अनेकदा आले, इथल्या माणसांनी अफगाण निर्वासितांना आसरा दिला. मुळात आपल्याकडे साधनं कमी असताना इतरांना आसरा देणं ही मोठीच गोष्ट आहे. आता आलेलं है नैसर्गिक संकट याकडे कुणा एका देशाचे संकट म्हणून पाहू नये हे निसर्गाचे, बदलत्या हवामानाचे संकट आहे. हवामन बदलाचा त्रास होणार होणार असं आपण म्हणत होतो. पण आता तो त्रास प्रत्यक्ष व्हायला लागला आहे. श्रीमंत देशांसाठीही हा वेकअप कॉल आहे. आता तरी आपण पर्यावरणाची काळजी घेणार का, जागतिक हवामान बदलाचा हा प्रश्न आहे. गरीब देशांसमोरचे प्रश्न गंभीर होत आहेत.’
अँजलिना जोली थेट आणि स्पष्ट बोलते. ती नुसती सुंदर गुडिया नाही तर तिला तिची स्पष्ट भूमिका आहे. ती कुणाला पटो ना पटो, अँजलिना जोली मात्र ठाम असते आपल्या विचारांवर.
सध्या पाकिस्ताानात फिरत असताना ती तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन तिथली माहिती पोस्ट करते आहे. पैसा आणि ग्लॅमरच्या पलिकडे या कामाकडे पहायला हवं असं तिला वाटतं.