Join us  

काय सांगता, साडी नेसवून देणं हे आता घसघशीत पैसे मिळवून देणारं करिअर होऊ शकतं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 1:30 PM

How Dolly Jain Went From A Housewife To Celebrity Saree Draper : तुम्हाला उत्तम साडी नेसता येत असेल किंवा दुसऱ्याला साडी नेसवता येत असेल तर एक नवीन करिअरसंधी आता उपलब्ध आहे.

अगं बाई किती तो गोंधळ, निऱ्या बरोबर आल्याचं नाही, पदर डाव्या की उजव्या खांद्यावर? साडी नेसायची म्हटलं की नुसता घोळ. साडी हा भारतीय महिलेचा पारंपरिक पोषाख आहे. साडी नेसल्यावर जितकी सुंदर दिसते तितकीच ती नेसणे म्हणजे महाकठीण काम असते. अनेक महिलांना साडी नेसायला आवडते परंतु व्यवस्थित नेसता येत नाही. त्यामुळे साडी नेसणं टाळलं जातं. परंतु साडी नेसवणं हेदेखील आता उत्तम करिअर होऊ शकतं. त्याला साडी ड्रेपिंग असे म्हणतात. कुणी स्टायलिस्ट असतात. ते फक्त साडी नेसवण्यात स्पेशलायझेशन करतात. तर कुणी साडी कशी नेसायची याचे ऑनलाइन क्लासेसही घेतात. सेलिब्रिटींच्या लग्नात, विशेष कार्यक्रमात, सिनेमात हे साडी ड्रेपर काम करतात. त्यामुळे नव्या काळात साडी ड्रेपिंग हे एक उत्तम पैसा मिळवून देणारे करिअर ठरते आहे. काही हजार रुपयांपासून साडी नेसण्याची फी घेतली जाते(How Dolly Jain, An Indian Housewife Turned Into A Celebrity Saree Draper).

गरोदरपणात ‘तिने’ केला १४ देशांचा प्रवास, वर्षाच्या बाळाला घेऊनही फिरतेय एकटी जगभर, कारण...

हल्ली इन्स्टाग्रामसह सर्वत्र अनेक साडी ड्रेपर्सची पेजेस दिसतात. ते ऑनलाइन पैसे घेऊन आणि कधीकधी मोफतही साडी नेसण्याचे ट्युटोरिअल्स घेतात. साडी ड्रेपिंगच्या जगात एक नाव चर्चेत असतं ते म्हणजे डॉली जैन(Dolly Jain). त्या सेलिब्रिटी साडी ड्रेपर आहेत.  बॉलिवूडसह अनेक बड्या उद्योगपतींच्या पत्नी डॉली जैनकडून साडी नेसून घेतात. १५ वर्षांपूर्वी डॉलीने इंडियन आर्ट ऑफ ड्रेपिंगची सुरुवात केली होती. आता डॉलीची मोठी टीम आहे. त्यांच्या कामाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये(The Limca Book of Records) झाली आहे.

भांड्याची बँक सुरु करणारी एक तरुणी! प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी ‘तिने’ काय केलं पाहा...

त्यांनी  एकच साडी ८० विविध प्रकारे नेसण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कलेची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये(The Limca Book of Records) करण्यात आली होती. त्याचबरोबर डॉलीचा एक साडी साडे अठरा सेकंदात नेसवण्याचा रेकॉर्डही आहे. इतरांना साडी नेसवता यावी यासाठी त्यांनी घरात एक पुतळा आणला होता. त्या पुतळ्याला साडी नेसवण्याची प्रॅक्टिस करत त्यांनी आणखी एक विक्रम केला होता. एकच साडी तब्बल ३२५ प्रकारे नेसवून त्यांनी स्वतःचाच जुना विक्रम मोडला होता. श्रीदेवी ते ईशा अंबानी, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, यांच्या लग्नात त्यांना साडी नेसवली होती. हे झालं एक उदाहरण. मात्र साडी ड्रेपिंग हे नवीन अत्यंत चांगले पैसे मिळवून देणारं काम ठरु शकतं.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी