२ दिवसांत आपण सगळेच या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. वर्ष सरताना आपण गेल्या वर्षात कमावलेल्या आणि गमावलेल्या गोष्टींचा हिशोब मांडतो. इतकेच नाही तर येत्या वर्षात आपण काय करायला हवे, काय टाळायला हवे याचीही गणिते मांडतो. अशातच IAS ऑफीसर असलेल्या सुप्रिया साहू यांनी एक पोस्ट आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्या जंगलातील वाघ आणि हत्ती या प्राण्यांकडून आपण कोणते गुण आवर्जून घ्यायला हवेत याविषयी सांगतात. या दोन्ही प्राण्यांकडून अंगिकारण्याचे गुण सांगतानाच सुप्रिया यांनी वाघाचा आणि हत्तीचा अतिशय सुंदर असा व्हिडिओही आपल्या पोस्टमधून शेअर केला आहे (IAS Officer Life Lessons From Tiger and Elephants For New Year).
प्राणी हा आपल्या समाजजीवनाचा एक महत्त्वाचा भाग असून त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. मात्र आपण आपल्याच नादात जगत राहतो आणि अनेकदा निसर्गाकडे पाहायचे राहून जाते. पण निसर्ग वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला काही धडे देत असतो आणि ते आपण वेळीच घ्यायला हवेत असा संदेश साहू यांना या पोस्टमधून द्यायचा आहे. यामध्ये तुम्ही आणखीही गोष्टी अॅड करु शकता असे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे. आता नवीन वर्षात अशा कोणत्या गोष्टी आपण या प्राण्यांकडून घेऊ शकतो त्या ५ गोष्टींची लिस्ट त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केली आहे. त्या गोष्टी म्हणजे...
New year lessons to learn from Tigers
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) December 26, 2022
1. Be unique & your own person
2.Walk as if you own the world
3.Agility power & courage for survival
4. Eat only when hungry, never kill to show off power
4.Patience,perseverance pays
Pl add more. Film-by @shaazjung for TN #NewYearLessonspic.twitter.com/tj7IcNrcRl
वाघाकडून शिकण्यासारख्या गोष्टी...
१. तुम्ही तुमच्यासारखेच आणि तरी सगळ्यांमध्ये युनिक असाल असा प्रयत्न करा.
२. जगाचे मालक तुम्ही आहात असे चाला (असा अविर्भाव ठेवा)
३. जगण्यासाठी चपळता आणि धैर्य उरी बाळगा
४. तुमच्या भूकेइतकेच खा (कमवा), आवश्यकता नसताना कोणाला मारु नका (म्हणजेच कमवू नका)
५. संयम आणि चिकाटी कायम ठेवली तरच तुम्हाला गोष्टी मिळतात.
New Year lessons to learn from elephants
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) December 24, 2022
1.Heavy weight but do not throw weight around
2.Intelligent but no show off
3.Powerful but restrained untill provoked
4.roll in mud,take long baths
5. Eat your heart out but take long walks 😊@ParveenKaswan do add more #NewYearlessonspic.twitter.com/m3G3AG8ZVj
हत्तीकडून शिकण्यासारख्या गोष्टी...
१. तुमचे वजन जास्त असेल तरी इतरांना त्याचे ओझे होऊ देऊ नका.
२. तुमच्याकडे असलेल्या बुद्धीमत्तेचा शो ऑफ करु नका
३. नको तिथे तुमची शक्ती दाखवू नका, संयमी राहा
४. बराच वेळ आंघोळ करा.
५. भरपूर खा पण तितकेच चाला