Join us  

उत्तरप्रदेशात बायका म्हणाल्या आता बास ! 'ग्रीन आर्मी' शिकवतेय बायकांना छळणाऱ्यांना धडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 3:24 PM

How 'Green Army' in ghoonghats is liberating women in UP villages : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडायची म्हणून तयार झालेल्या ग्रीन आर्मीची गोष्ट....

'ग्रीन आर्मी' हे वनविभागातील एखाद्या डिपार्टमेंटचे किंवा उपक्रमाचे नाव नसून महिलांवर होणारा घरगुती हिंसाचार रोखणाऱ्या महिला संघाचे नाव आहे. होय ! आपण अगदी बरोबर वाचलं आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील कुशियारी गावात हातात काठ्या घेऊन आणि स्वसंरक्षण तंत्राचे प्रात्यक्षिक करणाऱ्या महिलांच्या गटाचे नाव आहे 'ग्रीन आर्मी'. भारतीय संस्कृतीत आजही महिला कितीही शिकली किंवा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली तरीही ती मोकळेपणाने स्वतःचे जीवन जगू शकत नाही. आजही भारतीय संस्कृतीत पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेला अपवाद नाही. स्त्री कितीही शिक्षित होऊन पुढे गेली तरीही तिच्याकडे मालकीची वस्तू, उपभोगाचे साधन याच दृष्टिकोनातून पाहिले जाते(In UP villages, a ‘Green Army’ in ghoonghats is liberating women, one abusive husband at a time).

नवविवाहितांची हत्या, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडापद्धती, महिलांना शिक्षित न करणे, अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ यांसारख्या अनेक लहान - मोठ्या हिंसाचारातून स्त्रियांना जावे लागते. हाच हिंसाचार रोखण्यासाठी कुशियारी गावातील बहुतेक दलित, आदिवासी आणि इतर मागास जातीतील स्त्रिया आता पुढे सरसावल्या आहेत. वर्षानुवर्षे डोक्यावर घूंगट घेण्याची पद्धत असो किंवा इतर काही घरगुती हिंसा या सर्व महिला आपला पदर कमरेला खोचून ताठ मानेन हा हिंसाचार थांबवण्यासाठी एकजूट होऊन कार्य करताना दिसत आहेत. या सर्व महिला हिरव्या रंगांच्या साड्या नेसून हातात लाठ्या - काठ्या घेऊन सुरुवातीला समजुतीची शिकवण देत, आणि गरज पडली तर हातातील लाठी उगारुन आपल्यावर होणारा अन्याय, अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या हातांतील लाठ्या मारण्यासाठी नसून विश्वास आणि समर्थनासाठी आहेत. परंतु जेव्हा गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात, तेव्हाच या काठ्या शस्त्र म्हणून बाहेर पडतात.

गरोदरपणात ‘तिने’ केला १४ देशांचा प्रवास, वर्षाच्या बाळाला घेऊनही फिरतेय एकटी जगभर, कारण..

२०१४ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाचे (BHU) माजी विद्यार्थी, रवी मिश्रा यांनी गावांतील महिलांना एकवटून 'ग्रीन आर्मी' ची स्थापन केली. समाजातील मागासलेल्या वर्गातील महिलांना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीतून बाहेर येण्यासाठी तसेच स्वतःवर होणाऱ्या अत्याचार, लैंगिक आणि घरगुती हिंसाचाराच्या विरोधात भूमिका घेण्यास सक्षम करण्यासाठी या 'ग्रीन आर्मी' ची सुरुवात करण्यात आली. 

घसघशीत पगार, कार्पोरेट जॉब, ब्राइट करिअर ‘तिनं’ सोडलं आणि.. करिअरचं वाटोळं झालं की भलं?

ग्रीन आर्मी बद्दल अधिक सांगताना रवी मिश्रा म्हणतात, हा उपक्रम प्रामुख्याने अन्याय, हिंसाचार करणाऱ्या पुरुषांचे समुपदेशन करून आणि कधीकधी वेळ पडल्यास हातांतील लाठ्या - काठ्यांचा वापर शस्त्रे म्हणून करुन पुरुषांना वठणीवर आणण्याचे मुख्य कार्य करतात. याचबरोबर गेल्या काही वर्षांत यूपीच्या अनेक गावांमध्ये दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन कमी करण्यात या 'ग्रीन आर्मीला' यश आले आहे. सध्या ग्रीन आर्मीमध्ये अंदाजे एकूण  १,८०० महिला कार्यरत आहेत. हा महिलांचा संघ हातात काठी घेऊन जरी असला तरीही अहिंसा हा त्यांचा प्राथमिक मुद्दा आहे. या स्त्रिया केवळ गावांतील कौटुंबिक अत्याचार थांबवत नाहीत तर हुंडाप्रथा आणि अंधश्रद्धाविरुद्ध देखील लढतात. मुलींच्या शिक्षणासाठीही त्या काम करतात. त्यांचे कार्य केवळ पुरुषांना त्यांच्या जीवनातून बहिष्कृत करणे नाही, तर त्यांच्या गावांची स्थिती सुधारणे हे देखील महत्वाचे कार्य आहे. याचबरोबर येणाऱ्या भविष्य काळात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करून त्या दृष्टिकोनातून देखील काम करत आहे.

'नमकवाली है हम'! उत्तराखंडातल्या पर्वत रांगांमधलं नैसर्गिक मीठ जगानं खावं म्हणून राबणाऱ्या महिलेची गोष्ट...

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी