आईच्या पावलावर पाऊल ठेवत मुलांनी यश मिळवले तर कोणत्याही आईसाठी ही गोष्ट अतिशय अभिमानास्पद असते. डॉक्टर, इंजिनिअर किंवा अगदी वकील, बिझनेसमन यांची मुले लहानपणापासून आपल्या आईवडिलांना ठराविक काम करताना पाहत असतात. त्यांचे काम पाहताना आपणही मोठेपणी अशीच कामगिरी करावी अशी सुप्त इच्छा या मुलांच्या मनात निर्माण होते. पालकांनी आखलेली रेष आणखी मोठी करण्याचे काम त्यांची मुले करत असतात त्यामुळे पालकांनाही एक वेगळेच समाधान असते. मेजर स्मिता चतुर्वेदी यांच्या बाबतीतही हीच गोष्ट घडली असून त्यांची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी घडली आहे (Indian Army Mother Son Inspiring Story of Major Smita Chaturvedi Ota Chennai).
Maj Smita Chaturvedi(Retd) reminisces her old days of being a Cadet in the illustrious Academy and ecstatic about her son re-enacting the glorious script of joining Army like herself. @adgpi@artrac_ia@smritiirani@MinistryWCD@DefenceMinIndia@IaSouthern@PIB_India@DDNewslivepic.twitter.com/yoi7AoyVMq
— Defence PRO Chennai (@Def_PRO_Chennai) July 30, 2022
ज्या प्रशिक्षण आई आपले सैन्यदलाचे प्रशिक्षण पूर्ण करुन बाहेर पडली आणि तिने सैन्यदलाच्या माध्यमातून देशाची सेवा केली. त्याच संस्थेतून तब्बल २७ वर्षांनी स्मिता यांचा मुलगा प्रशिक्षण घेऊन बाहेर पडला आहे. या संस्थेचे नाव आहे चेन्नई ऑफीसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी. २७ वर्षांपूर्वी स्मिता यांनीही या संस्थेतून खडतर असे प्रशिक्षण पूर्ण करुन आपल्या देशसेवेला सुरुवात केली होती. आज त्याच ठिकाणी आपला मुलगा पाहून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या दोघांच्या कार्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असून लोकांनी या अनोख्या गोष्टीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क कार्यालयाकडून याबाबतची माहिती ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. एका आई आणि मुलाची प्रेरणादायी कहाणी असल्याने या ट्विटला नेटीझन्सकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
A rare euphoric moment for a Lady Officer:
— Defence PRO Chennai (@Def_PRO_Chennai) July 30, 2022
Major Smita Chaturvedi (Retd) Commissioned from Officers Training Academy, Chennai before 27 years in 1995, saw her son getting Commissioned in the same manner in the same Academy today. @artrac_ia@SpokespersonMoD@DefenceMinIndiapic.twitter.com/hGRaAbQS0k
ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे, एका महिला अधिकाऱ्यासाठी अतिशय सुंदर क्षण मेजर स्मिता चतुर्वेदी (निवृत्त). ज्यांनी २७ वर्षांपूर्वी १९९५ मध्ये चेन्नईच्या ऑफीसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीतून कमीशनवर नियुक्त झाली होती. आज त्या आपल्या मुलाला याच संस्थेतून अधिकारी म्हणून बाहेर पडताना पाहत आहेत. या दोघांचा एक फोटो या ट्विटमध्ये शेअर करण्यात आला आहे. मुलाची निवड झाल्याने आपण खूप खुश आहोत आणि त्यामुळे आपल्याला आपले जुने दिवस आठवत असल्याचे त्या म्हणाल्या. या ट्विटवर लोकांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी या दोघांचे अभिनंदन करत कौतुक केले आहे.