Lokmat Sakhi >Inspirational > आईच्या वाढदिवशी क्रिकेटपटू वेदानं केलं लग्न! कोरोनानं आई आणि बहिणीला हिरावलं, लेकीचं आईला इमोशनल गिफ्ट...

आईच्या वाढदिवशी क्रिकेटपटू वेदानं केलं लग्न! कोरोनानं आई आणि बहिणीला हिरावलं, लेकीचं आईला इमोशनल गिफ्ट...

Indian cricketer Veda Krishnamurthy gets married on late mother's birthday : आपल्या दिवंगत आईच्या वाढदिवसादिवशी आपल्या प्रियकरासोबत लग्न गाठ बांधून आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 04:22 PM2023-01-16T16:22:33+5:302023-01-16T16:41:11+5:30

Indian cricketer Veda Krishnamurthy gets married on late mother's birthday : आपल्या दिवंगत आईच्या वाढदिवसादिवशी आपल्या प्रियकरासोबत लग्न गाठ बांधून आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Indian cricketer Veda Krishnamurthy gets married on late mother's b'day. | आईच्या वाढदिवशी क्रिकेटपटू वेदानं केलं लग्न! कोरोनानं आई आणि बहिणीला हिरावलं, लेकीचं आईला इमोशनल गिफ्ट...

आईच्या वाढदिवशी क्रिकेटपटू वेदानं केलं लग्न! कोरोनानं आई आणि बहिणीला हिरावलं, लेकीचं आईला इमोशनल गिफ्ट...

आपला वाढदिवस हा प्रत्येकासाठीच एक खास क्षण असतो. सगळेचजण आपल्या या खास दिवसाचे अगदी उत्तमरित्या नियोजन करतात. कुणी आपल्या वाढदिवसादिवशी मोठी जंगी पार्टी देऊन तर कुणी काही वेगळे सामाजिक कार्य करून किंवा दान धर्म करून आपल्या या वाढदिवसाची आठवण ठेवतात. भारतीय क्रिकेट टिम मधील महिला खेळाडू वेदा कृष्णमूर्ति आणि तिने लिहिलेली एक खास इंस्टाग्राम पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. भारतीय महिला संघाची खेळाडू वेदा कृष्णमूर्ति गुरुवारी विवाहबंधनात अडकली आहे. आपल्या दिवंगत आईच्या वाढदिवसादिवशी आपल्या प्रियकरासोबत लग्न गाठ बांधून आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत(Indian cricketer Veda Krishnamurthy gets married on late mother's b'day).

वेदा कृष्णमूर्ति हिने नक्की काय केलं आहे?  
भारतीय महिला क्रिकेट टिममधील हरहुन्नरी खेळाडू म्हणून ओळखली जाणारी वेदा कृष्णमूर्ति हिने आपल्या दिवंगत आईच्या वाढदिवसादिवशी आपल्या प्रियकरासोबत लग्न गाठ बांधली आहे. वेदा कृष्णमूर्तीने तिची आई चेलुवांबा देवी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.वेदाच्या आईचे २०२१ मध्ये कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर तिची बहीण वत्सला शिवकुमार हिनेही कोरोनामुळे प्राण गमावला होता. आपली आई आणि बहीण यांच्या आठवणीत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने आपल्या लग्नाची गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. वेदा कृष्णमूर्ति हिने कर्नाटकचा रणजी क्रिकेटपटू अर्जुन होयसालासोबत लग्नबंधनात अडकली आहे. वेदाचा नवरा हा देखील एक उत्तम क्रिकेटपटू आहे. 

इंस्टाग्रामवर आई व बहिणीसाठीची खास पोस्ट शेअर... 
इंस्टाग्रामवर वेदा कृष्णमूर्तिने तिच्या लग्नाची घोषणा केली आहे. तिने पोस्ट शेअर करत लिहिले आहे, 'आई हे तुझ्यासाठी आहे. तुझा वाढदिवस नेहमीच खास असेल.' वेदाने तिच्या दिवंगत बहिणीसाठी म्हटलं आहे की 'लव्ह यू अक्का'.

अत्यंत सध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज
वेद आणि अर्जुन यांनी बेंगळुरू येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात अत्यंत साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करत लग्नाचे विधी पूर्ण केले. यावेळी हे दोघेही अत्यंत साध्या कपड्यांमध्ये दिसले. कुटुंबातील काही सदस्य आणि जवळच्या मित्रमंडळीच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले.

अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव... 
वेदाने सोशल मीडियावर फोटोसोबत खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे.महत्त्वाची बाब म्हणजे वेदाच्या दिवंगत आईच्या वाढदिवसाच्या दिवशी या दोघांनी रेशीमगाठ बांधली आहे. हे समजताच वेदाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे अभिनंदन केले आहे. यासोबतच अनेक सेलिब्रिटींनीही शुभेच्छा दिल्या आहेत.भारतीय महिला क्रिकेट टीमची पूर्व खेळाडू झूलन गोस्वामी हिने "अभिनंदन ब्रो" अशी कमेंट करत वेदाचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे स्पिनर राजेश्वरी गायकवाड हिने देखील तिचे अभिनंदन करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  

अर्जुनने असं केलं प्रपोज... 
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अर्जुन आणि वेदा यांची ही लव्हस्टोरी फारच चर्चेत होती. खरंतर गेल्या वर्षी भारतीय महिला क्रिकेट टीम टी - २० सीरीज खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर असताना वेदा या दौऱ्यात अनुपस्थित होती. यादरम्यान, कर्नाटकचा रणजी क्रिकेटपटू अर्जुन होयसाला याने उंच हिरव्यागार पर्वतांवर जाऊन वेदाला प्रपोज केले होते. तेव्हा वेदाने लगेच अर्जुनला हो असे उत्तर पण दिले होते. अर्जुनने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर, आणि तिने 'हो' म्हटले अशा कॅप्शन सहित एकमेकांना रिंग घालतानाच फोटो शेअर केला होता. दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन प्रेम कहाणीतील खास चॅप्टरचे काही फोटो शेअर केले आहेत. याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

Web Title: Indian cricketer Veda Krishnamurthy gets married on late mother's b'day.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.