(Image Credit- The Better India)
४० वर्षांपूर्वी ओडीसाच्या संबलपूरमधील रहिवासी असलेल्या संतोषिनी मिश्रा आपलं कुटुंब आणि जबाबदारी सांभाळण्यासाठी दुसऱ्याच्या घरी जेवण बनवायला जायच्या. त्यावेळी घराच्या चार भिंतींच्या बाहेर पडून काम करणं ही खूप मोठी गोष्ट होतं. पण आर्थिक स्थिती फारशी बरी नसल्यानं त्यांना नाईलाजानं घराबाहेर पडावं लागलं.
बेटर इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, ''मी एक चांगली स्वयंपाकीण होते, म्हणून मी ही नोकरी स्वीकारली आणि फक्त मेहनत करत राहिली. '' तेव्हा जरी लोकांच्या घरी अन्न शिजवून सुरुवात केली असेल, पण आज वयाच्या ७४ व्या वर्षी जेव्हा लोक निवृत्त होऊन विश्रांती घेतात. तेव्हा केटरिंगचा व्यवसाय चालवणाऱ्या संतोषिनी यांनी वयातही स्वत:ला व्यस्त ठेवलं आहे. या कामातून त्यांनी सुमारे 100 जणांना रोजगारही दिला आहे. लग्नसोहळा असो, वाढदिवस असो किंवा इतर कोणतेही समारंभ असो, संतोषिनी यांचे स्वयंपाकघर ही शहरातील अनेकांची पहिली पसंती असते.
त्यांना या कामाची विशेष ओढ आहे, कारण या कामामुळे त्यांना वाईट काळात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास मदत झाली. माझी आईसुद्धा खूप चांगली स्वयंपाकीण आहे आणि तिच्या स्वयंपाकाच्या कलेमुळे आम्हाला चांगले आयुष्य मिळाले आहे, असं त्या सांगतात.
संतोषिनी यांचे पती पानाचे दुकान चालवायचे, पण गंभीर आजारामुळे त्यांचे काम बंद पडले.
त्यानंतर संतोषिनी यांना कुटुंबासाठी काम करणं भाग पडलं. तेव्हापासून आजतागायत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, मुलांचे शिक्षण आणि पतीच्या उपचाराचा खर्च त्या एकट्याने उचलत आहेत. 2012 मध्ये नऊ वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतरही त्यांनी बिनधास्तपणे काम सुरू ठेवले.