Join us  

Inspirational Stories : बीडी कारखान्यातील मजूर महिलेच्या मुलीनं YouTube पाहून MBBS परीक्षेत मिळवलं यश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 5:10 PM

Hrika from nizamabad passed and excelled in mbbs exams : युट्यबवर व्हिडिओ पाहून एमबीबीएसची परिक्षा दिली आणि घवघवीत मिळवलं.

स्वप्न पाहण्याची इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्हीही काहीही साध्य करू शकता. प्रतिकुल परिस्थितीतून मार्ग काढत यशाचं शिखर गाठणाऱ्या या तरूणीची काहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या मुलीनं युट्यबवर व्हिडिओ पाहून एमबीबीएसची परिक्षा दिली आणि घवघवीत मिळवलं. हैदराबादमधील माजी खासदार कविता काल्वाकुंतला यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. (Hrika from nizamabad passed and excelled in mbbs exams via youtube preparation single mother who is beedi worker)

या तरूणीचं नाव हरिका असून हैदराबादच्या निजामाबादची ती रहिवासी आहे. तिची आई एका बिडीच्या कारखान्यत मजूरीचं काम करते.  अथ्थक प्रयत्नांच्या जोरावर तिनं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहिलं.  आपल्या स्वप्नांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या सर्वांसाठीच हरिकाचा प्रवास प्रेरणादायी आहे. 

वरूण धवनला झालेला व्हेस्टिबुलर हाइपोफंक्शन हा आजार आहे काय? समजून घ्या लक्षणं

माजी खासदार कविता कल्वाकुंतला यांनी बीडी कारखान्यातील कामगार हरिका आणि तिच्या आईची  भेट घेऊन आर्शीवाद दिले आणि शिक्षणासाठी पुरेपूर आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.  त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या तरूणीच्या यशाबद्दल माहिती दिली.  आजकाल तरूण मुलं मुली  चोवीस तास फोनचा वापर करतात. अशात फोनचा वापर अभ्यासाठी करून एमबीबीएसची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या हरिकानं तरूणांपुढे उत्तम उदाहरण ठेवले आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया